माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची – स्वाती महाळंक
स्वाती महाळंक यांचे स्वागत करताना संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, यावेळी त्यांच्यासमवेत डावीकडून संस्थेचे संचालक संजय छत्रे व राजेश नागरे
यशस्वी एज्युकेशन' सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित 'संवाद शिक्षकांशी'कार्यशाळा संपन्न
पिंपरी, ता. ०५ सप्टेंबर २०२२ : माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असून त्यादृष्टीने शिक्षकवर्गाने स्वतःला अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सेंटर फॉर इन्स्टिट्यूशनल बिल्डींग्स अँड लिडरशिप स्टडीजच्या कार्यकारी प्रमुख स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने चिंचवड येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'संवाद 'शिक्षकांशी' या एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतान...