पिंपरी चिंचवड

माळी समाजाच्या मोफत राज्यस्तरीय वधू, वर परिचय मेळाव्याचे भोसरीत आयोजन
पिंपरी चिंचवड

माळी समाजाच्या मोफत राज्यस्तरीय वधू, वर परिचय मेळाव्याचे भोसरीत आयोजन

भोसरीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने माळी समाजाचा सोळावा वधू, वर परिचय मेळावा रविवार दि. २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास वधू, वर व पालकांना मोफत प्रवेश आहे अशी माहिती मेळावा प्रमुख शामराव गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिली आहे. या मेळाव्यात सहभाग घेण्यास इच्छुक असणा-या वधू, वर किंवा पालकांनी संस्थेचे नोंदणी कार्यालय श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन, महादेव मंदिराजवळ लोंढे आळी, भोसरी पुणे - ३९ येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७:३० पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष शांताराम ताम्हाणे व उपाध्यक्ष संतोष लोंढे यांनी केले आहे. रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजता मेळाव्याचे उद्‌घाटन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार आहे. नोंदणी केलेल्या वधू, वरांनी आपल्या पालकांसमवेत उपस्थित रहावे. नोंदणीसाठी संपुर्...
पिंपळे निलख मधिल पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा : सचिन साठे
पिंपरी चिंचवड

पिंपळे निलख मधिल पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा : सचिन साठे

विशालनगर पिंपळे निलख भागातील पाणी पुरवठा सुरळित करा अन्यता कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी इशारा दिला.बुधवारी (दि. १६ मार्च) सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलख मधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले. यावेळी माजी पोलिस पाटील भुलेश्वर नांदगुडे, विजय जगताप, भरत इंगवले, संजय बालवडकर, अनंत कुंभार, काळुराम नांदगुडे, संजय पटेल आणि अनिल संचेती आदी उपस्थित होते. आयुक्त पाटील यांना दिलेल्या निवदेनात पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बहुतांशी सर्वच भागात कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा केला जात आहे. विशेषता पिंपळे निलख आणि विशाल नगर भागात हि समस्या तीव्र आहे. वेळी अवेळी आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे विनाकारण सोसायटी आण...
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा नवी दिल्ली येथे सीईडी कडून गौरव
पिंपरी चिंचवड

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा नवी दिल्ली येथे सीईडी कडून गौरव

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा दिल्ली येथिल सीईडी (सेंटर एज्युकेशन ऑफ डेव्हलपमेंट) या संस्थेने ‘सीईडी स्टार रेटींग के - १२ स्कूल अवॉर्ड २०२१’ हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात छत्तीसगडचे माजी राज्यपाल शेखर दत्त आणि मालदिवचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. अब्दुल्ला रशिद अहमद यांच्या हस्ते एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी १२ मार्च रोजी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी इंदिरा गांधी ओपन युनिर्व्हसिटीचे माजी कुलगुरु डॉ. एम. एम. पंत, सीबीएसईचे संचालक डॉ. विश्वजीत साहा, सीबीएसईचे माजी संचालक जी. बालसुब्रमण्यम, एम. व्ही. प्रसाद राव, एनसीआरटीचे सचिव मेजर हर्ष कुमार, सीबीएसईचे सहसचिव आर. पी. सिंग आदी उपस्थित होते.‘शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी नाविण्यपुर्ण पध्दतींचा अवलंब करणारी ‘शाळा’ म्हणू...
बालाजीनगरमध्ये ड्रेनेज लाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पिंपरी चिंचवड

बालाजीनगरमध्ये ड्रेनेज लाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

भोसरी : बालाजीनगरमध्ये ड्रेनेज लाईन सतत तुंबत असल्याने घाण पाणी नागरिकांच्या घरात जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वेल्फेअर पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सांडपाणी जाण्यासाठी सुद्धा नाली नाही आणि त्यामध्ये जर ड्रेनेजचे घाण पाणी तुंबल्यावर थेट लोकांच्या स्वयंपाकघरातपर्यंत जात आहे. प्रशासनाने योग्य नियोजनबद्ध काम केलेले नाही, लहान पाईपलाईन टाकलेली असल्यामुळे वारंवार ही अवस्था होत आहे. जर पालिका याकडे दुर्लक्ष करत असेल तर वेल्फेअर पार्टी तर्फे हा मैला महानगरपालिकेत टाकला जाईल, याची जबाबदारी महापालिकेने स्विकारावी. असा इशारा वेल्फेअर पार्टीने दिला आहे....
हातावर पोट भरणार्‍या गरिबांच्या पोटावर बुलडोजर ; राष्ट्रवादी काँग्रेस संतप्त
पिंपरी चिंचवड

हातावर पोट भरणार्‍या गरिबांच्या पोटावर बुलडोजर ; राष्ट्रवादी काँग्रेस संतप्त

बाळासाहेब मुळे : लोक मराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : जाधववाडी-चिखली परिसरातील मंगळवारी (दि. १५) जाधव सरकार चौक ते आहेरवाडी चौक या रस्त्याच्या फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या सर्व पान टपरी, हातगाड्या यांच्यावरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अचानकपणे कारवाई केली. कोणतीही पुर्व नोटीस न देता बुलडोजर चालवला आणि क्रेनच्या साह्याने पानटपरी, हातगाडी उचलून जप्त करण्यात आले. आपल्या हातावरती पोट भरून जीवन जगणाऱ्या गोरगरिबांवर अचानकपणे अशाप्रकारे कार्यवाही करणाऱ्या पालिकेवर वरती सामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे. अचानकपणे झालेल्या या कारवाईमुळे रोजीरोटीवर जीवन जगणाऱ्या गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनंत सुपेकर हे लोकमराठी न्यूजशी बोलताना म्हणाले की, या अतिक्रमण कारवाई प्रकरणी आम्ही पालिका कर्मचाऱ्यांची संपर्क केला असता स्थानिक सत्ताधाऱ्यांच...
शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करणार : आ. महेश लांडगेभोसरी ते घोडेगाव पीएमपी बससेवा सुरू
पिंपरी चिंचवड

शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करणार : आ. महेश लांडगेभोसरी ते घोडेगाव पीएमपी बससेवा सुरू

पिंपरी, पुणे ( दि.14 मार्च 2022) शहर आणि परिसरातील रस्ते व दळणवळण व्यवस्था उत्तम असेल तर उद्योग, व्यवसाय व रोजगार वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करणार आहे असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले. रविवारी (दि. 13 मार्च) भोसरी बसस्थानकामध्ये मार्ग क्रमांक ३६४ भोसरी ते घोडेगांव (व्हाया मंचर, निघोटवाडी, लांडेवाडी) या पीएमपी बस मार्गाचा लोकार्पण सोहळा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे, नगरसेवक नितीन काळजे, संतोष लोंढे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, नगरसेविका भिमाताई फुगे, सोनालीताई गव्हाणे, युवा नेते योगेशभाऊ लांडगे, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे तसेच शांताराम वाघेरे, रमेश चव्हाण, काळुराम ...
वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका साजरे करतेय माझी वसुंधरा अभियान – प्रशांत राऊळ
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका साजरे करतेय माझी वसुंधरा अभियान – प्रशांत राऊळ

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका माझी वसुंधरा अभियान साजरे करत आहे. अशी टिका पर्यावरण मित्र प्रशांत राऊळ यांनी केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी महापालिका असंवेदनशील असून शहरात बेसुमार झाडांची कत्तल सुरू आहे. महापालिकेनेच पवना नदीत मैला मिश्रित पाणी सोडून तीला गटार करून टाकले आहे. शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर शहराला फक्त शिकलेलाच आयुक्त गरजेचा नसून एक जागृत, सक्रिय आणि संवेदनशील आयुक्त असणे गरजेचा आहे. असेही राऊळ यांनी म्हटले आहे. राऊळ यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाची खिल्ली उडवताना खालील मुद्दे मांडले आहेत. पंचतत्वे जल - १. पालिका हद्दीत नदीमध्ये मैला मिश्रित पाणी सोडणे २. पालिका व इतर अपुरे STP प्रकल्प ३. नदी प्रदूषण करणाऱ्या ...
संगतीमुळे उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला गेला ; प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

संगतीमुळे उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला गेला ; प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका

पिंपरी, ता. १३ : सत्ता नसताना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्ववाचा विचार होता. सत्ता आल्यानंतर संगतीच्या परिणामामुळे उद्धव ठाकरे यांचा हिंदूत्ववाचा विचार बाजूला गेला. अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रहाटणी येथे केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संगती असा उच्चार करण्याचे टाळले. रहाटणी चौक येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याचे अनावरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. १२) सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी आपल्या भाषणात ते बोलत होते. त्याप्रसंगी महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर नानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक चंद्रकांत नखाते व बाब...
प्रशासकांनी अर्थसंकल्प उपसुचेनेशिवाय मंजूर करावा : योगेश बहलसामान्य जनतेच्या महासभेत पाणी प्रश्नावर महिला सदस्या आक्रमक
पिंपरी चिंचवड

प्रशासकांनी अर्थसंकल्प उपसुचेनेशिवाय मंजूर करावा : योगेश बहलसामान्य जनतेच्या महासभेत पाणी प्रश्नावर महिला सदस्या आक्रमक

पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होतो. रात्री - अपरात्री पाणी पुरवठा तो पण कमी दाबाने मिळतो. त्यामुळे महिलांना त्रास होतो. शेकडो कोटींचे प्रकल्प महापालिका उभारते मग रावेत येथिल जल उपसा केंद्रात जनरेटर का बसवत नाही ? टँकर लॉबी कोणाच्या इशा-यावर काम करते ? अमृत योजनेतील नागपूरच्या ठेकेदारांना पोसण्यासाठी प्रकल्पात दिरंगाई केली जाते का ? झोपडपट्टीत पण वेळी - अवेळी पाणी पुरवठा केला जातो. पाच वर्षांपुर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये भाजपाने २४x७ पाणी पुरवठा देऊ असे जाहिरनाम्यात वचन दिले होते त्याचे काय झाले ? पवना जलवाहिनी बंदिस्त पाणी पुरवठा योजना पुर्ण करणार होते ? भामा - आसखेड पाणी पुरवठा योजनेचे काय झाले ? महापौरांना महिलांच्या प्रश्नांची जाणिव नाही का ? प्रत्येक प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी वरुन फोन, एसएमएस आलाच पाहिजे का ? प...
भोसरीच्या घाटात पुन्हा सुरु होणार बैलगाडा शर्यत : ॲड. नितीन लांडगे
पिंपरी चिंचवड

भोसरीच्या घाटात पुन्हा सुरु होणार बैलगाडा शर्यत : ॲड. नितीन लांडगे

पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) भाजपाचा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा दिला. मा. सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर बैलगाडा शर्यत घेण्यास परवानगी दिल्यामुळे आता लवकरच भोसरीतील घाटावर पुन्हा बैलगाडा शर्यत सुरु होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे. गुरुवारी ॲड. नितीन लांडगे यांनी पुणे जिल्हा गाडा मालक संघटनेचे अध्यक्ष भानूदास लांडगे यांच्या सह भोसरीतील घाटाची पाहणी केली व आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता बोपन्ना गट्टूवार यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक पंडीत गवळी, गाडा मालक अनिकेत विष्णू लांडगे तसेच गाडा मालक संघटनेचे पदाधिकारी व भोसरीतील गाडा मालक उपस्थित होते....