पिंपरी चिंचवड

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते गार्गी मोरे यांचा सत्कार
पिंपरी चिंचवड, क्रीडा

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते गार्गी मोरे यांचा सत्कार

पिंपरी : कुडो वर्ल्ड कप जपान २०२२ साठी निवड झालेल्या गार्गी अरविंद मोरे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक सीमा अडनाईक, कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण प्रांत पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी, ग्लोबल इंडिया फौंडेशन उपसंचालिका ऍड. पियाली घोष, पुणे जिल्हा कुडो संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे मान्यवर उपस्थित होते....
महिलांनी न्यू होम मिनिस्टरमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत लुटला कार्यक्रमाचा आनंद
पिंपरी चिंचवड

महिलांनी न्यू होम मिनिस्टरमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत लुटला कार्यक्रमाचा आनंद

पिंपरी : सोमनाथ दादा तापकीर युवा मंचच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ३२ मधील महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण स्वराज रक्षक मालिकेतील राणू आक्काची भुमिका साकारलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे तसेच वन फोर थ्री या नवीन चित्रपटाची टीम उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ३२ मधील हजारो महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रत्येक सहभागी महिलेस एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. तसेच विजेत्या महिलांना अनुक्रमे दुचाकी, टीव्ही, कुलर, फ्रीज, सोन्याची नथ, बिजवे पैठणी अशा अनेक प्रकारच्या वस्तू भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये विजेता म्हणून शिल्पा देशमुख, दीपा मोटे, हिराबाई पाटील, करुणा उशिरे व मंगल लोणकर यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी माजी नगर...
राष्ट्रवादीच्या मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड, सामाजिक

राष्ट्रवादीच्या मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क चिंचवड, ता. ८ : महात्मा फुले नगर येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतीक हॉल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा मनिषा गटकळ यांनी केले होते. या शिबिरामध्ये बीपी, सुगर, मधुमेह आदी तपासणी व प्राथमिक औषध उपचार करण्यात आले. महात्मा फुले नगर, पूर्णा नगर, कृष्णा नगर या परिसरातील आबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात शिबिरांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आणि औषधोपचार घेतले. या शिबिरास डॉ. शुभम उंबरहांडे, डॉ. सायली जाधव, सुनीता पवार, प्रतीमा खांडेकर यांनी आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी पिंपरी चिंचवडमधील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्...
फिटनेस क्लबमधील प्रत्येक स्त्री राणी लक्ष्मीबाईच्या रुपात सामाजिक जळवळीचा भाग होईल – कुंदा भिसे
पिंपरी चिंचवड

फिटनेस क्लबमधील प्रत्येक स्त्री राणी लक्ष्मीबाईच्या रुपात सामाजिक जळवळीचा भाग होईल – कुंदा भिसे

जागतिक महिला दिनानिमित्त कुंदा संजय भिसे यांचा सन्मान युनिव्हर्सल फाईट अ‍ॅण्ड फिटनेस क्लबतर्फे कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी, ता. ८ : अधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात महिला यशाची शिखरे चढत आहे. कौटुंबिक जबाबदा-या पार पाडत असताना तिला असंख्य संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून धाडसाने मार्ग काढत ती स्वतःच्या पायावर उभी राहात आहे. हे करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी तिला सक्षम करण्याचे काम फिटनेस क्लब करीत आहे. फिटनेस क्लबमध्ये स्वसंरक्षणाचे धडे गिरवल्यानंतर प्रत्येक स्त्री झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या रुपात बाहेर पडेल, अशा शब्दांत उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा कुंदा भिसे यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या. जागतिक महिला दानानिमित्त पिंपळे सौदागर येथील युनिव्हर्सल फाईट आणि फिटनेस क्लबच्या वतीने उन्नति सोशल फाऊं...
सावित्रीची लेक कुंदाताई या शेकडो महिलांचा आधारवड – अश्विनी जगताप
पिंपरी चिंचवड

सावित्रीची लेक कुंदाताई या शेकडो महिलांचा आधारवड – अश्विनी जगताप

उन्नती सोशल फाउंडेशनच्या माधमातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न - कुंदा भिसे पिंपळे सौदागर येथे महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा ”उन्नती महिला रत्न” पुरस्काराने सन्मान पिंपरी : पिंपळे सौदागरसह शहरातील महिलांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील राहत युवतींसह त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून कार्यक्षम समाजसेविका सौ कुंदाताई भिसे करीत आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा अफाट पसारा दिवसेंदिवस विस्तारत आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक उन्नती व्हावी या ध्येयाने त्यांची वाटचाल सुरु आहे. ही सावित्रीची लेक शेकडो महिलांचा आधारवड बनू पाहत आहे. यंदा त्या पिंपळे सौदागरचे नेतृत्व करू इच्छित आहेत; त्यासाठी सर्वांनी कुंदाताईंच्या पाठीमागे उभे रहावे, असे प्रतिपादन अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उन्नती सोशल फाउंडे...
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी महिला दिनालाच महिलांचा अपमान केला – बाबा कांबळे
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी महिला दिनालाच महिलांचा अपमान केला – बाबा कांबळे

विविध मागण्यांसाठी सफाई महिला कामगारांचे महापालिका समोर ठिय्या आंदोलन पिंपरी, ता ८ : साफसफाई कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये महिला कामगारांनी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. 8 मार्च जागतिक महिला दिन जगभरामध्ये मोठ्या उत्साहात मध्ये साजरा केला जात आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील इतिहासात पहिल्यांदाच 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर ७ मार्च पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांनी ठिय्या मांडला आहे. महापालिकेने महिला दिनालाच महिलांचा अपमान केला असल्याचा संताप कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला. विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई महिला कामगारांनी रात्रभर महापालिकेसमोर रस्त्यावर झोपून आंदोलन केले. या वेळी...
सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे
पिंपरी चिंचवड

सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे

जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शाखेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन संपन्न पिंपरी, ता. ८ मार्च : अहिंसेचे काटेकोरपणे पालन करणारा जैन समाज उद्योग, व्यवसाय, व्यापारात ज्याप्रमाणे अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. सोमवारी (दि. ७ मार्च) जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक नाना काटे, जयश्री गावडे, विजय जगताप, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, डॉ. अशोक पगारिया, रमणलाल लुंकड, दिलीप सोनिगरा, राहुल मुनोत, राजेंद्र धोका, सतीश खाबिया, डॉ सुहास लुंकड, राजेंद्र चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. श्रीरंग बारणे उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की, संत, महात्म्यांनी सांगितलेल्या...
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणीत बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात
क्रीडा, पिंपरी चिंचवड

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणीत बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

रहाटणी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त देविदास आप्पा तांबे यांच्या वतीने रहाटणीतील तमारा सोसायटीमध्ये बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सोसायटीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासही रहिवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्यांना देविदास आप्पा तांबे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी तात्या शिनगारे, दीपक जाधव यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : मुली एकेरी विजेत्या - गिरीजा पाटील उपविजेता - अन्वी शर्मा ✅ मुले एकेरी विजेता - अनिरुद्ध पाटील उपविजेता - अभिनव ✅ मुले दुहेरी विजेता - अनिरुद्ध + नक्ष उपविजेता - यथार्थ + पार्थ ✅ महिला एकेरी वि...
कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र केंद्र देशात एकमेव भोसरीत : देवेंद्र फडणवीस
पिंपरी चिंचवड, क्रीडा, राजकारण

कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र केंद्र देशात एकमेव भोसरीत : देवेंद्र फडणवीस

भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन पिंपरी, ता. ७ : कुस्ती, कबड्डी सारखे देशी खेळ माणसाला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ करतात आणि त्यातूनच एक उत्तम व्यक्तिमत्व घडते. कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र प्रशिक्षण केंद्र देशात एकमेव भोसरीत उभारण्यात आले याचा आम्हाला अभिमान आहे. मागील पाच वर्षांत जी विकासकामे झाली त्या हे मोठे काम आहे. महापौर, आमदार, स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक हे अभिनंदनास पात्र आहेत. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील आणि देशाचे तसेच भोसरीचे नाव जगात मोठे करतील असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी यावेळी व्यक्त केला. भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन रविवारी (दि. ६ मार्च) सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात...
रहाटणीत रंगणार खेळ पैठणीचा | कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन
पिंपरी चिंचवड

रहाटणीत रंगणार खेळ पैठणीचा | कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन

रहाटणी, ता ७ : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ३३ मध्ये कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानच्या वतीने क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा या धमाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे शुक्रवारी (ता. ११ मार्च) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रभाग क्र. ३३ मधील खास महिलांच्या आग्रही मागणीमुळे कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये गप्पा गोष्टी रंजक खेळ सोबत कॉमेडीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या खेळाच्या माध्यमातून महिलांना भरघोस बक्षिसे जिंकता येणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी फ्रिज व पैठणी दुसऱ्या क्रमांकासाठी वाशिंग मशीन व पैठणी तिसऱ्या क्रमांकासाठी कूलर व पैठणी चौथ्या क्रमांकसाठी ओव्हन व पाचव्या क्रमांकासाठी मिक्सर, त्याचप्रमाणे अनेक उत्तेजनार्थ बक्षिसे व प्रत्येक सहभागी महिलेस...