पिंपरी चिंचवड

शिवजयंती निमित्त काळेवाडीत रॉयल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम | तरूणांना करिअर मार्गदर्शन तर महिला योजनांची केली जनजागृती
पिंपरी चिंचवड

शिवजयंती निमित्त काळेवाडीत रॉयल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम | तरूणांना करिअर मार्गदर्शन तर महिला योजनांची केली जनजागृती

काळेवाडी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : रॉयल फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त मुलांना खाऊ वाटप, तरूणांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले तर महिलांना विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच रॉयल फाउंडेशनच्या माध्यमातून काळेवाडीत मोहल्ला क्लिनिक सुरू केले जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. भारत माता चौक व रॉयल एकता चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे, ज्येष्ठ सल्लागार प्रकाश नांगरे, आनंद काटे, नरेंद्र नांगरे, पंकज पाटोळ, अशोक गायकवाड, खजिनदार गणेश नांगरे, प्रथम नांगरे, विक्की साळवे, अमित बोंगाळे, सागर पवार, विजय साळवे, सिद्धार्थ कसबे, रिहान शेख, सागर शेठ, अक्षय ताम्हणकर, निखिल ताम्हणकर, उध्दव डेरवणकर, आशा नांगरे, राधा काटे, न...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घराघरांत हवा – कुंदाताई भिसे
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घराघरांत हवा – कुंदाताई भिसे

पिंपळे सौदागर येथील कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी पिंपरी : शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र करुन स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी दिलेला एकतेचा वारसा नव्या पिढीने जतन केला पाहिजे. शिवराय सर्वांसाठी प्रेरणा शक्ती आणि स्फूर्ती देणारे उर्जास्त्रोत आहेत. संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी शत्रूवर मात केली. त्यांचा आदर्श सर्वानीच घेतला पाहिजे. जगभरात ज्यांच्या कुशल राज्य कारभाराची ओळख आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घराघरांत व्‍हावा, असे मत उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात ...
काळेवाडीत शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात

काळेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडीत भव्य शिवजयंती उत्सव २०२२ सोहळा उत्साहात पार पडला. छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महिलांनी शिवजन्माचा पाळणा म्हटला तसेच शिव वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन अष्टविनायक सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळ तसेच अनिल पालांडे, प्रताप सुर्वे व सोमनाथ नळकांडे यांच्या वतीने करण्यात आले. जयंती निमित्ताने डॉ. शैनाझ शेख यांच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग आप्पा बारणे, हरेश आबा नखाते, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडागळे, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका निता पाडाळे, रवी लांडगे, माजी नगरसेवक प्रमोद...
शिवजयंती निमित्त चिंचवडमध्ये गरजूंना कपडे वाटप
पिंपरी चिंचवड

शिवजयंती निमित्त चिंचवडमध्ये गरजूंना कपडे वाटप

चिंचवड : मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने केशवनगर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. जेष्ठ नागरिक पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, आरती व शिवस्तोत्र म्हणत विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना कपडे वाटप करण्यात आले. तसेच पेढे वाटून शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. त्यावेळी महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, राजू कोरे, गणेश बच्चे, गोपाळ शिंदे, गौरव पवार, पोपट बच्चे, श्रीकृष्ण माळी, राजू ततापुरे, विजय कदम, रोहिणी बच्चे, गीता कोरे, अर्चना बच्चे, श्रावणी बच्चे, आसावरी बच्चे, अमित धारणे, सीताराम माळी, राजेश दहिवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अनेकांनी महाराजांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आयोजक मधुकर बच्चे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्व मान्यवर व नागरिका...
रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज – बाबा कांबळे
पिंपरी चिंचवड

रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज – बाबा कांबळे

कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने शिवजयंती उत्साहात पिंपरी : रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, असे बजावून रयतेची काळजी घेणारे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांचे विचार आजच्या काळात देखील जोपासले जात आहेत. आज देशाची झालेली वाताहत पाहता शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच देशाला उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी नगरसेवक विक्रांत लांडे पाटील, समीर मासुळकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर तुषार हिंगे, नग...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे शिवचरित्राचे वाटप
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे शिवचरित्राचे वाटप

थेरगाव : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही शिवरायांची जयंती पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेले शिवचरित्राचे तसेच गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोन होता या पुस्तकांसह अनेक पुरोगामी विचारांच्या पुस्तकांचे वाटप करून शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांच्या हस्ते इतिहासाच्या पानांवर रयतेचा मनांवर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे, महान राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवरायांच्या पुतळ्यासमोर आकर्षक रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहर कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी शिवरायांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थिता...
छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : अतुलनीय वैश्विक योध्या, कुशल प्रशासक, हिंदू पद्पातशाहीचे निर्माते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. ते केवळ मराठ्यांचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रशासनाचा, गनिमी काव्याचा, युद्धतंत्राचा आज जगभर अभ्यास केला जातो. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. “छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण” या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश बोलत होते. त्यावेळी पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ...
आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लबतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी
पिंपरी चिंचवड

आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लबतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी

काळेवाडी : आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लबतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. त्यावेळी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करत होळीची पुजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यावेळी मंडळाचे संस्थापक काळुराम नढे, अध्यक्ष अतुल नढे, उपाध्यक्ष खंडु आव्हाड, प्रमोद मोरे, शाम नढे, अनिल क्षिरसागर, बजरंग नढे, महादेव मुळीक, महेश डांगे, विशाल सपकाळ,, गणेश सोनवणे, विठोबा सपकाळ, प्रकाश रणवरे, युवराज नढे, रुद्रराज नढे, पृथ्वीराज नढे, प्रविण मोहिते यांच्यासह बालचमू चिन्मय, गोलु, परमवीर, यशश्री, वैष्णवी उपस्थित होते. काळूराम नढे म्हणाले की, "हिंदू धर्मात पुर्वीपासून होळी सण साजरा केला जातो. मात्र, काळानुसार या सणात बदल होणे गरजेचे असून होळीनिमित्त प्रत्येकाने दुर्गुणांची, वाईट सवयी, व्यसने व भ्रष्टाचाराची होळी करणे आवश्यक आहे." https://youtu.be/NlhuQJb2RTQ...
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश नखाते फाउंडेशनतर्फे समाजोपयोगी उपक्रम
पिंपरी चिंचवड

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश नखाते फाउंडेशनतर्फे समाजोपयोगी उपक्रम

रहाटणी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, कोविड योद्धांचा सन्मान व हळदी-कुंकू कार्यक्रम असे विविध समाजोपयोगी उपक्रम गणेश शिवराम नखाते सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आले. या कार्यक्रमांचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश नखाते, सुमन नखाते, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर व संदीप नखाते, देविदास आप्पा तांबे, नरेंद्र माने, मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, विनोद नखाते, माधव मनोरे, दिपक जाधव, नामदेव शिंत्रे, किशोर नखाते (युवा महाराष्ट्र केसरी), निलेश नखाते (पिंपरी चिंचवड केसरी), प्रशांत मोरे, मनोज नखाते, आशुतोष नखाते, अमोल नखाते, सुभाष दराडे, नंदुशेठ गोडांबे, भगवान गोडांबे, बाळासाहेब गावडे, स्वप्निल नखाते यांच्यासह फाउं...
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टीत प्रवेश

चिंचवड : भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश हगवणे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, आप शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, ब्रह्मानंद जाधव, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश हगवणे यांनी गेली वीस वर्ष भाजपमध्ये काम केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजप पूर्वीसारखा मुंडे व महाजन यांचा पक्ष राहिला नाही, पक्षाची विचारधारा बदलली आहे. प्रदेश पातळीवरील निष्ठावंत नेते ते निष्ठावंत प्रभाग कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांवरती पक्षाने अन्याय केला आहे. येणाऱ्या काळातही बरेच कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकणार आहेत. मी अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीमधील काम बघून प्रेरित होऊन आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत मोहननगर, आनंदनगर, इंदिरानगर, प्रभाग क्रमांक १९ मधून ते आ...