पिंपरी चिंचवड

युवा नेतृत्वाला संधी देण्याबाबत रहाटणीकरांचे एकमत
पिंपरी चिंचवड, राजकारण

युवा नेतृत्वाला संधी देण्याबाबत रहाटणीकरांचे एकमत

पिंपरी : सामाजिक कार्यकर्ते व निर्भया महिला मंचचे संस्थापक अध्यक्ष उल्हास कोकणे हे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३३ मधून इच्छुक आहेत. त्यानिमित्त नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी जगताप डेअरीमधील पखवान हॉटेल येथे मंगळवारी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उल्हास कोकणे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी देण्याबाबत रहाटणीकरांचे एकमत झाले. त्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह विविध सामाजिक मंडळाचे व लायन्स क्लबचे पदाधिकारी, रहिवासी सोसायटीतील नागरिक व समस्त रहाटणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना उल्हास कोकणे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे पद माझ्याकडे नसताना विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. नागरिक व विशेष करून महिल...
काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे २५० नागरिकांनी लाभ घेतला तर कोरोना प्रतिबंधक लसीकरणास मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी निगार बारसकर, प्रकाश मलशेट्टी, विरेंद्र गायकवाड, सौरभ शिंदे, काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, दशरथ वीर, रवि नांगरे, किरण नढे, पोपटशेठ नढे, विशाल नढे, सनी नढे, निर्मला खैरे, स्वाती शिंदे, सोनू दमवानी, रचना गायकवाड, प्रियंका कदम, सुरेश नढे, नवनाथ नढे, मच्छिंद्र तापकीर, दिलीप काळे, हरेश नखाते, सुजाता नखाते, आशा नांगरे, लोंढे काका, निवृत्त आरोग्य मुकादम मोरे, प्रताप सुर्वे, सुनंदा काळे, मुन्ना गुप्ता, विपुल म...
रमाई आवास योजनेसह प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टीतील त्याच जागेवर राबविण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

रमाई आवास योजनेसह प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टीतील त्याच जागेवर राबविण्याची मागणी

पिंपरी : रमाई आवास योजने सोबत प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्याच जागेवर राबविण्यात यावी. तसेच घर दुरुस्ती, बांधकाम करण्यासाठी शासकीय अनुदान देण्यात यावे. अशी मागणी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे प्रा. बी. बी. शिंदे यांनी मंगळवारी (ता. १५) महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, पिंपरी चिंचवड कार्यकारिणी महिला कार्याध्यक्षा शलन ओव्हाळ उपस्थित होते. यावेळी या विषयांकित प्रश्नावर आयुक्तांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी या दोन्हीही योजना जागेवरच राबविणार असल्याचे सांगितले. अशी माहिती प्रा. बी. बी. शिंदे यांनी दिली....
इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारून कुंदाताईंनी निर्माण केला आदर्श – महापौर माई ढोरे
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारून कुंदाताईंनी निर्माण केला आदर्श – महापौर माई ढोरे

पिंपळे सौदागरमधील उन्नती कार्यालय येथे चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडमधील मोफत चार्जिंग देणारा एकमेव पायलट प्रोजेक्ट पिंपरी : इंधनावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पर्यावरण संवर्धनाला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे निर्माण होणा-या प्रदुषणामुळे नागरिकांच्या जीवनावर दुरगामी परिणाम होत आहे. प्रदुषणाला आळा बसून पर्यावरण संवर्धन होण्यासाठी आपल्याला विधायक पाऊल उचलायला हवे. झाडे लावण्याबरोबरच कुंदाताई भिसे यांनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन सुरू करून इलेक्ट्रीक वाहणे वापरणा-यांना प्रोत्साहन दिले आहे. इलेक्ट्रीक वाहनांना न नफा न तोटा या तत्वावर मोफत चार्जिंगची सुविधा निर्माण करून कुंदाताईंनी पिंपरी-चिंचवडमध्ये आदर्श निर्माण केला आहे, अशी भावना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केली. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसरातील इलेक्ट्रीक वा...
तीन चाकाच्या सरकारचे रिक्षा चालकाकांकडे दुर्लक्ष – बाबा कांबळे
पिंपरी चिंचवड

तीन चाकाच्या सरकारचे रिक्षा चालकाकांकडे दुर्लक्ष – बाबा कांबळे

केंद्र सरकार ओला, उबेर, भांडवलदार कंपन्यांना पाठीशी घालत आहे - बाबा कांबळे पिंपरी : रिक्षा चालकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असताना ते सोडविण्याऐवजी त्यात आणखीन भर घालण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करत आहे. बेकायदेशीर दुचाकी आणून रिक्षा चालकांच्या संकटात आणखीन भर घालण्याचे काम सरकारने केले आहे. तीन चाकाच्या सरकारचे रिक्षा चालकाकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला. तर केंद्र सरकार ओला, उबेर, भांडवलदार कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचेही बाबा कांबळे म्हणाले. बेकायदेशीर दुचाकी बंद करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुणे व पिंपरीतील रिक्षा चालक मालकांनी पुणे आरटीओ कार्यालवर आंदोलन छेडले. सकाळी दहा वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या वेळी ...
संविधानात सर्व नागरिकांना श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य : सायली नढे
पिंपरी चिंचवड, राजकारण

संविधानात सर्व नागरिकांना श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य : सायली नढे

कर्नाटक सरकार विरुध्द राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार : सायली नढे पिंपरी, ता १२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता दिलेली आहे. कॉंग्रेस हा संविधानाचा आदर करणारा पक्ष आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाने, संघटनेने वा इतर धर्मियांनी हस्तक्षेप करु नये. कर्नाटक सरकारने शाळा, महाविद्यालयात हिजाब वापरण्यास आक्षेप घेतला आहे. याचा शहर महिला कॉंग्रेस तीव्र निषेध करीत आहे असे प्रतिपादन महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी केले. पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, स्वाती शिंदे, निर्मला खैरे, वैशाली गायकवाड, आशा भोसले, रचना गायकवाड, डॉ. मनिषा गरुड, प्रियांका कदम, रुक्साना सैफी, रिजव...
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांची निवड
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांची निवड

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांची आज नियुक्ती करण्यात आली. तर युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख (Imran Shaikh) आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट (Kavita Alhat) यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. याशिवाय, शहरातील तीन विधानसभानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांना पदमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मागच्या वर्षी महापालि...
काळेवाडीच्या विकासासाठी नगरविकास मंत्र्याचा सकारात्मक प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

काळेवाडीच्या विकासासाठी नगरविकास मंत्र्याचा सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी : काळेवाडीतील शिवसेना कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर यांनी नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी पालकर यांनी काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मुद्द्यांवर मंत्री शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली. मंत्री शिंदे यांनी काळेवाडीतील विकासासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करू असे आश्वासन दिले. तसेच पालकर यांना पुढील समाज कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महाड पोलादपूर माणगाव मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले, सामाजिक कार्यकर्ते दिपक तरडे, अविनाश उत्तेकर, दिनकर जाधव, निलेश मोरे, सुशील मिरगल उपस्थित होते. काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मधील प्रमुख डीपी रस्ते व खेळाचे मैदान विकसित करणे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकात (एमएम चौक) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाज...
न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये माता रमाबाई आंबेडकर व लता मंगेशकर यांना अभिवादन
पिंपरी चिंचवड

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये माता रमाबाई आंबेडकर व लता मंगेशकर यांना अभिवादन

रहाटणी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रमाबाई आंबेडकर जयंती व लता मंगेशकर यांना श्रद्धांजली सोशल डिस्टंसिन्ग पाळून साजरी करण्यात आली. रमाबाई यांच्या व लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुरुषोत्तम गाणार, बाळासाहेब शेंडगे, संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका आसावरी घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते. “करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य महासूर्याची सावली, कोटयावधींची माऊली, बाबासाहेबांची ऊर्जायनी, रामू, रमा, रमाई रंजल्या-गांजल्यांची दीन-दलितांची आई मातारमाई ह्यांनी अनेक हाल अपेष्टा, उपासमार सहन करून, कोणत्याही भौतिक सुखाचा हव्यास न धरता त्या अशिक्षित मातेने बाबासाहेबांच्या क...
उबेरवरील दुचाकी टॅक्सी चालकाला रिक्षाचालकाकडून मारहाण
पिंपरी चिंचवड

उबेरवरील दुचाकी टॅक्सी चालकाला रिक्षाचालकाकडून मारहाण

पिंपरी : उबेर दुचाकीमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय होत नाही, असा आरोप करत रिक्षा चालकांनी उबेरवरील दुचाकी टॅक्सी चालकास मारहाण केली. ही घटना पुनावळे येथे घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश कृष्णा सूर्यवंशी (२६, रा. साईनाथ कॉलनी, विनायक नगर, नवी सांगवी, मूळ रा. घाणव, ता. पाटण, जि. सातारा) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर बाबुराव शामराव पांचाळ (वय ४२), शरणबसप्पा शामराव पांचाळ (वय ३६, दोघेही रा. कोयतेवस्ती, पुनावळे), हनुमंत बिभीषण माने (वय २३, रा. पुनावळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. https://twitter.com/lokmarathi/status/1490567581064855552?t=LeXfIdxuRufghw82mZp03g&s=19...