पिंपरी चिंचवड

सप्तर्षी समग्र दिव्यांग अभियानाअंतर्गत तिसरे दिव्यांग कागदपत्रे सहयोग शिबिर संपन्न
पिंपरी चिंचवड

सप्तर्षी समग्र दिव्यांग अभियानाअंतर्गत तिसरे दिव्यांग कागदपत्रे सहयोग शिबिर संपन्न

पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन प्रकल्प कार्यालय रहाटणी येथे दिव्यांग बांधवांची विविध कागदपत्रे काढण्यासाठी होणारी गैरसोय कमी व्हावी व त्यांना आवश्यक दाखले व कागदपत्रे तसेच दिव्यांगांसंबधीत असणाऱ्या शासकीय व इतर योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली मिळावा याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये त्यांना दिव्यांग दाखले (युडीआयडी) मिळण्यासाठी नोंदणी, निरामय आरोग्य योजना अंतर्गत क्लेम /वैद्यकीय खर्चाचे कागदपत्राची स्वीकृती, रेल्वे सवलत नोंदणी, शासकीय शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य, दिव्यांग मुलांचे व कुटुंबाचे टॅक्स सवलत व भविष्य आर्थिक नियोजन मार्गदर्शन इ. सुविधा देण्यात आल्या. या शिबिरास पिंपरी चिंचवड विभागातील जवळपास 65 दिव्यांग बांधवानी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच सप्तर्षी फाउंडेशन सोबत दिव्यांग व्यक्तींच्या पालकांनी सुद्धा स्वयंसेवक म्हणून या कार्यासाठी आपली सेवा दिली. ...
नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच कुंदाताईंची राजकीय वाटचाल यशस्वी होईल – आ. लक्ष्मण जगताप
पिंपरी चिंचवड

नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच कुंदाताईंची राजकीय वाटचाल यशस्वी होईल – आ. लक्ष्मण जगताप

कोविड काळात कुंदाताईंनी नागरिकांसाठी जीवाचे रान केले - हभप ऋषिकेश महाराज चोरगे कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आ. जगताप याहस्ते उदघाटन पिंपरी : उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कुंदाताई यांनी पिंपळे सौदागर परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने त्यांचे सामजिक कार्य आजही सुरूच आहे. या कामांमुळेच सौदागरवासीयांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले आहे. नागरिकांच्या पाठिंब्यामुळे सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रातील त्यांची वाटचाल सोपी होईल, अशा शब्दात चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी कुंदाताई भिसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पिंपळे सौदागर येथे कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. पी. के. स्कूलच्या प्र...
भक्ती शक्ती समुह शिल्पाजवळ शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड, सामाजिक

भक्ती शक्ती समुह शिल्पाजवळ शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्याची मागणी

निगडी : भक्ती शक्ती समुहशिल्पाजवळ सार्वजनिक शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव व जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके यांनी केली आहे. याबाबत महापौर माई ढोरे व महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी २ फेब्रुवारी रोजी संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्पाचे दर्शन व संत तुकाराम महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली पहावयास मिळाली, काही ठिकाणी फर्शीच्या जॉईंट मधील सिमेंट निघालेले तर काही फरश्या निम्म्या तुटलेल्या अवस्थेत दिसल्या. तसेच अती संवेनशील बाब म्हणजे या परिसरात अनेक पर्यटक विशेष म्हणजे महीला, मुले व ज्येष्ठ नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी शौचालया...
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिपंरी चिंचवड शहराची कार्यकारणी गठीत
पिंपरी चिंचवड

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिपंरी चिंचवड शहराची कार्यकारणी गठीत

चिंचवड : येथील दिनकर गजाबा भोईर व्यायाम शाळा येथे दोन फेब्रुवारी रोजी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिपंरी चिंचवड शहर कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्यकारणी सदस्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक रमेश हांडे उपस्थित होते तसेच पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते तसेच मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे हे उपस्थित होते. प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील पिपंरी चिंचवड शहर संघटन पुनर्बांधणीची प्रक्रिया जोमाने सुरू करून शहराचे नवनिर्वाचित महानगर अध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांना पदी नियुक्त करून कार्यकारणी गठित करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. अनेक शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रासाठी समाजउ...
उन्नतिच्या माध्यमातून सोसायटीतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर माझा भर – कुंदा भिसे
पिंपरी चिंचवड

उन्नतिच्या माध्यमातून सोसायटीतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर माझा भर – कुंदा भिसे

पिंपळे सौदागरमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संकेतस्थळ आणि हेल्पलाईनचे अनावरण पिंपरी : महिला सक्षमीकरणाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या कुंदा भिसे यांनी पिंपळे सौदागर परिसरात नवचैतन्य निर्माण केले आहे. त्यांच्या अफाट कार्याने नागरिकदेखील प्रभावित होत आहेत. सामजिक कार्यात नेहमीच त्यांचे एक पाऊल पुढे राहिले आहे. नागरिकांच्या समस्या असो की उत्सव यात हिरीरीने पुढाकार घेऊन सोसायटीतील नागरिकांमध्ये एकजुटीची भावना निर्माण करण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. नगरसेवक नसताना देखील जनसेवेचा वसा हाती घेऊन प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी त्या कायम झटत आल्या आहेत. त्यांच्या या कार्याला दाद द्यावीच लागेल, असे प्रतिपादन माजी नगरसेवक तथा बांधकाम क्षेत्रातील प्रसिध्द उद्योजक शंकर जगताप यांनी केले. पिंपळे सौदागर येथील नागरिकांना समस्या तत्काळ सोडविण्या...
वीज बिलात तोडपाणी करत महावितरण अधिकाऱ्यांचा लाखोंचा भ्रष्टाचार | माहिती अधिकार कार्यकर्त्यांने उघड केला धक्कादायक प्रकार
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

वीज बिलात तोडपाणी करत महावितरण अधिकाऱ्यांचा लाखोंचा भ्रष्टाचार | माहिती अधिकार कार्यकर्त्यांने उघड केला धक्कादायक प्रकार

https://youtu.be/V88Zbup-cjE रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : लॉकडाऊन काळात अंदाजे मीटर रिडींगद्वारे आलेले अव्वाच्या सव्वा बिल नंतर तोडपाणी करून लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाला आहे. पिंपरीतील माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश रोचिरमानी यांनी हा धक्कादायक प्रकार उघड केला आहे. मात्र, या प्रकाराची तक्रार रोचिरमानी यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊनही महावितरणकडून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी आहे की, रोचिरमानी यांना महिन्याला अडीच ते तीन हजार रुपये येणारे वीज बिल, मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० दरम्यान ३४ हजार रुपये आले. या बिलाबाबत रोचिरमानी यांनी महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयात भरपुर चकरा मारल्या. मात्र, बिल बरोबर असल्याचे सांगत बिलात कमी होणार नाही. असे रो...
रसिकांच्या प्रेमावर कवित्व हे तरलेलं अस – कवी अनंत राऊत
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

रसिकांच्या प्रेमावर कवित्व हे तरलेलं अस – कवी अनंत राऊत

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. या वेळी ‘कवितेतील जगणं आणि जगण्यातल्या कविता’ या विषयावर सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. त्यावेळी ते म्हणाले की, “रसिकांच्या प्रेमावर कवित्व हे तरलेलं असतं केवळ खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही. शब्दांना वेदनेची झालर असत नाही तो पर्यंत कवी होता येत नाही.” या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड हे होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले की, ‘जागतिकीकरणात इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे प्रत्येकाने आपल्या मातृभाषेच्या संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या मराठी भाषेत अभंग, ओवी, भारुडे, विराण्या, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार, कथा, कादंबरी, ललित साहित्य व लोकसाहित्याने परिपूर्ण असलेला ...
या भाईची पोलीसांनी मस्ती उतरवली | हात जोडून मागितली माफी
पिंपरी चिंचवड

या भाईची पोलीसांनी मस्ती उतरवली | हात जोडून मागितली माफी

पिंपरी : थेरगाव क्वीनसोबत अश्लील भाषा आणि धमकीचे रील बनवणारा तिचा मित्र कुणाल राजू कांबळेला पिंपरी सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल हा साक्षीसह इंस्टाग्रामवरील रील बनवायचा. याअगोदर साक्षी हेमंत श्रीश्रीमल (१८) आणि साक्षी राकेश कश्यप (१८) यांना अटक करण्यात आली होती. तिघांवर कलम २९२, २९४, ५०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. https://youtu.be/FqUzC63XV1A गेल्या काही दिवसांपासून अश्लील भाषा वापरून आणि इंस्टाग्रामवर धमकीचे रील बनवणाऱ्या थेरगाव क्वीनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, त्यांचा साथीदार मित्र कुणाल हा फरार होता. त्याला पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली. थेरगाव क्वीनचे ४१ हजार फॉलोअर्स असून ते अधिक वाढवण्याच्या प्रयत्नात ...
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

पिंपरी : शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी खासदार गजानन धरमसी बाबर (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता. २) दुपारी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. गेली तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक झाली. सायंकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पिंपरी चिंचववड शहरात शोककळा पसरली. बाबर यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११ वाजता निगडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे बंधू मधुकर बाबर यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री, उद्योजक धीरज आणि सुरज ही दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकर बाबर, प्रकाश बाबर हे त्यांचे धाकटे बंधू तर, माजी नगरसेविका शारदा बाबर या भावजयी होत. पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेच्या स्थापनेपासून संघटना रुजविण्यापर्यंत बाबर यांचे मोठे योगदान...
महिला पोलिसांप्रमाणेच सर्व क्षेत्रातील महिलांना कामाचे आठ तास करा : सायली नढे
पिंपरी चिंचवड

महिला पोलिसांप्रमाणेच सर्व क्षेत्रातील महिलांना कामाचे आठ तास करा : सायली नढे

महाविकास आघाडी सरकारचे महिला कॉंग्रेसने केले अभिनंदन पिंपरी : महिला पोलिसांना कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी निभावताना शारिरीक तसेच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. याचा विचार करुन महाविकास आघाडी सरकारने १ फेब्रुवारी पासून महिला पोलिसांना कामाचे तास कमी करुन आठ तासांची ड्युटी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसने अभिनंदन केले असून तसे पत्र पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिले आहे. यावेळी छाया देसले, सुप्रिया पोहारे, भारती घाग, आशा भोसले, सोनाली गिरी आदी उपस्थित होते. या पत्रात पुढे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस पक्ष एक महत्वाचा घटक पक्ष आहे. कॉंग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष आहे. कॉंग्रेसने नेहमीच महिलांचा आदर आणि सन्मान केला ...