पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शितल सुर्यवंशी, चेतना सातवंडे, मेघा शिंदे, विजया घाटके यांनी पटकावला प्रथम क्रमांक पिंपरी : कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर शासनाचे अनेक निर्बंध होते. त्यामुळे कोणतेही सण-उत्सव साजरा केले गेले नाहीत. मात्र, कोरोनाचे सावट कमी झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट, रांगोळी व मेहंदी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच काळेवाडीत पार पडला. त्यावेळी कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी, गॅस वितरण करणारे डिलेव्हरी बॉय व पत्रकारांचा कोविड योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते, शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, महिला शहराध्यक्षा अश्विनी बांगर, विद्यार्थी सेना शहराध्...
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जेष्ठांना मोफत छत्र्या वाटप
पिंपरी चिंचवड

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जेष्ठांना मोफत छत्र्या वाटप

उन्नती सोशल फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम पिंपरी सौदागर : येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष कुंदा संजय भिसे यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमूर्तमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वछता अभियान तसेच परिसरातील सुमारे एक हजार जेष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे जेष्ठांकडून कौतुक करण्यात आले. लिनियर गार्डन कोकणे चौक येथे ज्येष्ठ नागरिक व सर्व उपस्थित नागरिकांनी स्वछता अभियान उपक्रम राबविला. माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप, हभप ऋषिकेश महाराज चोरगे व समाजसेविका शारदा मुंढे यांच्या हस्ते या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थाचे विलास काटे, शिवशंभो सेवा मंडळ अध्यक्ष संपत मेटे, प्रबोधनकारक समाजसेविका शारदा मुंढे, हभप श...
VIDEO : चिखलीत आढळलेल्या १८ किलो व नऊ फुटी अजगराला मिळाले जिवनदान
पिंपरी चिंचवड

VIDEO : चिखलीत आढळलेल्या १८ किलो व नऊ फुटी अजगराला मिळाले जिवनदान

पिंपरी : चिखली येथील नेवाळे वस्ती परिसरात आढळलेल्या १८ किलो वजनाच्या व नऊ फुटी लांबीच्या अजगरास सर्पमित्रांमुळे जीवनदान मिळाले. ही घटना रविवारी (ता. ३ ऑक्टोबर) रात्री घडली. https://youtu.be/Dx5cyP5ffkw वर्ल्ड फॉर नेचरचे वन्यजीव संरक्षक वैभव करूंद यांना रात्री अडीचच्या सुमारास नेवाळे यांनी संपर्क साधून मोठा अजगर आढळल्याची माहीती दिली. माहीती मिळताच वैभव करूंद घटनास्थळी निघाले. त्यांगा वाटले त्या ठिकाणी घोणस जातीचा साप असेल, कारण बऱ्याचदा लोक घोणस दिसल्यानंतर अजगर आला आहे. अशी माहाती कळवतात परंतु, नेवाळे वस्तीमध्ये पोहोचल्यानंतर करूंद आश्चर्यचकीत झाले. कारण, अजगर हा शहरी भागात आढळत नाही. एवढ्या मोठ्या अजगरास पकडणे एकट्याला शक्य झाले नसल्याने करूंद यांनी विशाल पाचूडे यांची मदत घेऊन अजगरास पोत्यामध्ये टाकले. त्यानंतर अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी मुळशी तालुक्यातील उरवडे ...
‘एक दिवस सुखाचा’ जेष्ठ नागरिकांनी अनुभवला एक आगळा वेगळा कार्यक्रम
पिंपरी चिंचवड

‘एक दिवस सुखाचा’ जेष्ठ नागरिकांनी अनुभवला एक आगळा वेगळा कार्यक्रम

नगरसेविका उषामाई काळे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे व कांचन मुव्हीज यांच्यातर्फे केले होते आयोजन काळेवाडी : नगरसेविका उषामाई काळे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे, कांचन मुव्हीज परिवार पुणे व अल-हम्द एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्हफेअर सोसायटी खारघर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंदू लॉन्स येथे "एक दिवस सुखाचा" हा जेष्ठ नागरिकांसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम शनिवारी (ता. २) पार पडला. या कार्यक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून आनंद घेतला. नगरसेवक संतोष कोकणे, माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे, सज्जी वर्की, गोरख कोकणे, संगिता कोकणे, संजय नरळकर, नाथा काळे, सामाजिक कार्यकर्ते अजीमोघीन बक्य, अल-हम्द एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी खारघर मुंबईचे मेहबुब कासार, स्वरनूपुर इन्स्टिटयूट ऑफ डान्स अँड मुसिकच्या राजेश्वरी गुरव, देवमाणूस फेम अभिनेता अंकुश मांडेकर व देवमाणूस फ...
मुलाची वडिलांना आगळ्या-वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली
पिंपरी चिंचवड

मुलाची वडिलांना आगळ्या-वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड खान मालक संघटनेचे दिवंगत अध्यक्ष लक्ष्मण भिमराव भोसले उर्फ तात्या यांना त्यांचे चिरंजीव अमित भोसले यांची स्तुत्य उपक्रमातद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. माजी महापौर हनुमंतराव भोसले यांचे बंधू तसेच विद्यमान नगरसेवक राहुल भोसले यांचे चुलते व युवा नेते अमित भोसले यांचे वडील दिवंगत लक्ष्मण (तात्या) भीमराव भोसले अध्यक्ष मोशी खाणमालक संघटना यांचे ११ सप्टेंबर २०२१ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. तात्यांना गेल्या सहा वर्षापासून यकृताच्या विकाराने ग्रासले होते. त्यांना दिवसाआड डायलिसिसची गरज होती. त्यासाठी तात्यांचे चिरंजीव अमित भोसले यांनी डायलिसीस मशिन आरो प्लांट व आयसीयू बेडची घरीच व्यवस्था केली होती. तात्यांच्या निधनानंतर या सर्व वस्तू ज्यांची किंमत जवळपास बारा लाख रुपये आहे. या सर्व वस्तू अमित भोसले यांनी तात्यांच्या स्मरणार्थ श्री मार्तंड देवस्था...
होय, मी रस्ता बोलतोय..! पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्सबाजी
पिंपरी चिंचवड

होय, मी रस्ता बोलतोय..! पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्सबाजी

पिंपरी : 'आता नागरिकांची एकच मागणी, रस्ता व नगरसेवक नवीन हवा. होय, मी रस्ता बोलतोय!' अशा आशयाचे फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून नगरसेवकांवर यामधून रोष दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी रस्ते आणि नगरसेवक दोन्ही नवीन हवे आहेत, असा एकंदरीत सूर यामधून उमटत आहे. वाकड सारख्या परिसरात असे फ्लेक्स लागल्याने नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली असून राजकीय वातावरण देखील तापले आहे. हे फ्लेक्स कोणी लावले? का लावले? कोणाला उद्देशून लवळे? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात असला तरी यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकीत वाकड परिसरात जोरदार राजकीय आखाडा पहायला मिळणार असल्याचे यावरून दिसते. प्रभाग रचना निश्चित होताच आता आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बिगुल वाजू लागले आहे. वाकड परिसरात कोणी अज्ञात व्यक्तीने होय. मी रस्ता बोलतो...
KALEWADI : धोकादायक चेंबरची रॉयल फाउंडेशनतर्फे दुरूस्त
पिंपरी चिंचवड

KALEWADI : धोकादायक चेंबरची रॉयल फाउंडेशनतर्फे दुरूस्त

काळेवाडी : ज्योतिबानगरमधील ड्रेनेज चेंबरच्या भोवती तयार झालेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होत होती. तसेच दुर्गंधीही येत होती. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत रहदारीसही धोका निर्माण झाला होता. याची दखल घेत या धोकादायक चेंबरची रॉयल फाउंडेशनच्या पाठपुरावामुळे दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी रॉयल फाउंडेशनचे आभार मानले. मातृछाया कॉलनी व साई श्रद्धा कॉलनीतील प्रत्येकी दोन आणि जयहिंद कॉलनीतील एक अशा पाच चेंबरच्या भोवती साधारणपणे एक ते दीड फुट खोल खड्डे तयार झाले होते. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले. त्यामध्ये एकाचा पाय मोडला तर एकाची चारचाकी गाडी अडकली होती. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात होते. स्थानिक नागरिकांनी रॉयल फाउंडेशनकडे ही समस्या मांडल्यानंतर रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य...
गुणवंत कामगार पांडुरंग जगताप यांचे निधन
पिंपरी चिंचवड

गुणवंत कामगार पांडुरंग जगताप यांचे निधन

पिंपरी : काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप यांचे वडील पांडुरंग बाबुराव जगताप (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. २९ सप्टेंबर ) निधन झाले. दशक्रिया विधी रविवारी (दि. ०३ ऑक्टोबर) मुळ गावी निळूज-बेलसर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुन- नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांना ३० वर्ष गरवारे वालरोप कंपनीमध्ये काम केल्याबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला होता....
बोऱ्हाडेवाडीतील धोकादायक झाडाची छाटणी करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

बोऱ्हाडेवाडीतील धोकादायक झाडाची छाटणी करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड (बाळासाहेब मुळे) : बोऱ्हाडेवाडी-विनायक नगर येथील कॉलनी क्रमांक एकमध्ये एक कडुलिंबाचे झाड रस्त्यावरती झुकले आहे. त्यामुळे ते कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून या झाडाची छाटणी करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांकडून या झाडाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवले. पण याकडे कानाडोळा केला जात आहे. महापालिकेकडेही तक्रार दिलेली आहे. जवळच मराठी माध्यमाची महापालिकेची व एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असते. हे झाडं रस्त्यावरती झुकलेले असल्याने जोरदार वाऱ्यामध्ये ते पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर महापालिका उद्यान विभागाने झाडाच्या छाटण्याची व्यवस्था करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे....
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू व खंदे समर्थक अरुण पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड, राजकारण

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू व खंदे समर्थक अरुण पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्यभर भाजपला गळती सुरूच पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांचे अत्यंत विश्वासू व खंदे समर्थक भाजपचे सांगवी काळेवाडी माजी मंडल अध्यक्ष अरुण पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी उपसभापती राजू लोखंडे, वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, उद्योजक बालाजी पवार, शंकर तांबे, अमोल नागरगोजे, उद्योजक रवी बांगर, गोरख सानप, सामाजिक कार्यकर्ते किशोर आट्टरगेकर, अमोल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते अनिसभाई पठाण, विजय वडमारे (अध्यक्ष, धनंजय मुंडे युवा मंच पिंपरी चिंचवड शहर), सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर झुमके, सामाजिक कार्यकर्...