पिंपरी चिंचवड

माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची – स्वाती महाळंक
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची – स्वाती महाळंक

स्वाती महाळंक यांचे स्वागत करताना संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, यावेळी त्यांच्यासमवेत डावीकडून संस्थेचे संचालक संजय छत्रे व राजेश नागरे यशस्वी एज्युकेशन' सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित 'संवाद शिक्षकांशी'कार्यशाळा संपन्न पिंपरी, ता. ०५ सप्टेंबर २०२२ : माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असून त्यादृष्टीने शिक्षकवर्गाने स्वतःला अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सेंटर फॉर इन्स्टिट्यूशनल बिल्डींग्स अँड लिडरशिप स्टडीजच्या कार्यकारी प्रमुख स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने चिंचवड येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'संवाद 'शिक्षकांशी' या एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतान...
मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा दिली – प्रकाश जाधव
पिंपरी चिंचवड

मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा दिली – प्रकाश जाधव

थेरगाव येथे मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा पिंपरी : १९९० सालापासुन मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार अशी ओळख धारण करणारी संस्था आहे. मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा दिली, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. मराठा सेवा संघाचा 32 वा वर्धापन दिन थेरगाव येथील राजमाता जिजाऊ सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा देताना बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली. या वेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मराठा सेवा संघाचे अशोक सातपुते, गजानन आढाव, मंगेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रकाश...
माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांना मातृशोक 
पिंपरी चिंचवड

माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांना मातृशोक

काळेवाडी, ता. १ सप्टेंबर : येथील माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांच्या मातोश्री रंजना जयवंत नढे (वय ५६) यांचे आज (ता. १ सप्टेंबर) पहाटे निधन झाले. काळेवाडी येथील स्मशानभूमीत सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत रंजना नढे या गेली काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने नढे कुटुंब व काळेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून त्यांनी संसार उभा करत आदर्श कुटुंब बनविले होते. राजकारण, समाजकारण, संप्रदाय आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना योग्य ते संस्कार दिले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे....
युवा नेते राहुल मदने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
पिंपरी चिंचवड

युवा नेते राहुल मदने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पिंपरी : आपण समाजाचे काही देणे लागते, या विचाराचे अनुकरण करत वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मल्हार आर्मीचे जिल्हाध्यक्ष व बहुजन समाज पार्टीचे शहर सचिव राहुल मदने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. चिंचवडेनगर येथील भोलेश्लर मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. मल्हार आर्मीचे संस्थापक -अध्यक्ष सुरेश कांबळे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, एकविरा ग्रुपचे अध्यक्ष सुधीर वाल्हेकर, महिद्रा लॉजिस्टिक कामगार युनियचे खजिनदार बिभीषण घोडेके, राजाभाऊ चिंचवडे, श्रीकांत धनगर, शिवाजी आवारे, कमलाकर गोसावी, रावसाहेब वायकुळे, नागनाथ वायकुळे, नरेश सोंडकर, मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष दिपक भोजने, विनोद बरकडे, ऑल इंडीया धनगर समाज महासंघाचे शहराध्यक्ष महावीर काळे यांच्यासह विविध मान्यवरांनी रा...
इको फ्रेंडली गणेशमूर्ती द्वारे पिंपळे सौदागरवासियांनी दिला पर्यावरण वाचवाचा संदेश
पिंपरी चिंचवड

इको फ्रेंडली गणेशमूर्ती द्वारे पिंपळे सौदागरवासियांनी दिला पर्यावरण वाचवाचा संदेश

बालचमूंसह थोरा मोठयांनी साकारल्या शाडू मातीपासून गणेशमूर्ती.. उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या गणपती महोत्सवाची परिसरात चर्चा... पिंपरी : स्वयंसेवी संस्थांनी एखादी समाजाच्या हिताची कल्पना मांडली, तिला जागरूक लोकांनी प्रतिसाद दिला आणि ती जोपासली तर किती व्यापक क्रांती होऊ शकते, याचे समर्पक उदाहरण आहे उन्नती सोशल फाउंडेशन आणि तिचा गणपती महोत्सव २०२२ अंतगर्त ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’! निसर्गावर कोणताही ओरखडा येऊ नये यासाठी परिसरातील बालचमूंसह थोरा मोठयांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती कशा बनवायच्या याची मोफत कार्यशाळा यंदाही पिंपळे सौदागर परिसरात उत्साहात पार पडली. परिसरातील जवळपास हजार नागरिकांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घेतला. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उन्नती सोशल फाऊंडेशन तथा भारतीय जनता पार्टी चिंचवड व...
पिंपळे सौदागरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे यांचा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मान
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे यांचा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मान

हा पुरस्कार समाजातील दिनदुबळ्यांच्या चरणी अर्पण करतो; भिसे यांनी व्यक्त केली कृतज्ञता पिंपरी : जनसेवा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेली अनेक वर्ष लोकांची कामे करत आलो. परमेश्वराने दिलेल्या दोन हाताने दिनदुबळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याच संधीचं सोणं झालं असून हा पुरस्कार त्याचेच प्रतिक आहे. त्यामुळे हा सन्मान पिंपळे सौदागरमधील दिनदुबळ्या, दिव्यांग, अंध-अपंग, ज्येष्ठ, कष्टकरी, कामगार वर्गातील नागरिकांच्या चरणी अर्पण करतो. त्यांनी सेवा करण्याची संधी दिली नसती तर हा सन्मान घेण्याचा योगच आला नसता, अशी भावना उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय उर्फ आबा भिसे यांनी व्यक्त केली. सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच, साकोसां महिला मंडळ, साकोसां ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संजय उर्फ आबा भिसे यांना भ...
स्वाईन फ्यूचे तातडीने मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

स्वाईन फ्यूचे तातडीने मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी

पिंपरी, ता. २५ : शहरामध्ये वाढत्या स्वाईन फ्यूच्या पार्श्वभूमिवर तातडीने मोफत स्वाईन फ्यू लसीचे लसीकरण करून घ्यावे. अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी मुख्यमंत्री, आरोग्य विभाग व महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. याबाबत तापकीर यांनी पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लू रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच रूग्ण पण दगावत आहेत. यासोबत कोविड-१९ आणि डेंग्यू रूग्णांची भर आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अपूरी पडत आहे. स्वाईन फ्लूचे वाढते रूग्ण पाहता स्वाईन फ्लूचे युद्ध पातळीवर मोफत लसीकरण होणे गरजेचे आहे. तरी तातडीने या विषयामध्ये लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, लोकांच्या आरोग्याचा योग्य तो विचार करून तात्काळ पाऊले उचलावित. असे तापकीर यांनी ई-मेल...
महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे

डॉ. कैलास जगदाळे पिंपरी : येथील रयत शिक्षण संस्था, महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा येथून नुकतेच रुजू झाले आहेत. प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी रयत शिक्षण संस्थेत २२ वर्षे वनस्पतीशास्त्र या विषयाचा विद्यार्थी प्रिय व अभ्यासू प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. याचीच दखल म्हणून रयत शिक्षण संस्थेने २० सप्टेंबर, २००७ रोजी प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती केली. गेल्या १५ वर्षांपासून एक कार्यक्षम प्राचार्य म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा, लोणंद, मंचर, उंब्रज, पुसेगाव या ठिकाणी त्यांनी कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणात्मक, मूल्यात्मक, ज्ञानात्मक व विवेकवादी विचार रुजविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन, प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट, रेमेडीयल कोच...
शासकीय व नियमानुसार नोकरीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे – संजोग वाघेरे पाटील
पिंपरी चिंचवड

शासकीय व नियमानुसार नोकरीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे – संजोग वाघेरे पाटील

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. २३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नव्याने भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने १९८४/८५ पासून नोकर भरतीत सुमारे ८५ टक्के स्थानिकांना प्राधान्य द्यावे. असे आदेश निर्गमित केलेले आहेत. असे शासन निर्णयातील आदेशात स्पष्ट सूचना देऊनही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शासन निर्णयाकडे हेतू परस्पर व जाणीवपूर्वक दुर्लक्ष कलेले आहे. ही बाब स्थानिकांच्या हक्कास व हितास बाधा आणणारी असून अतिशय गंभीर अशी आहे. यापूर्वी १९८२/८५ दरम्यान हरनामसिंह हे प्रशासक असताना या नियमांना नजरेसमोर ठेवून महापालिकेत भरती प्रक्रिया राबविण्यात आलेल्या आहेत. आपण त्या दस्तऐवज पाहण्यास हरकत नाही. पिंपरी चिंचवड शहरात राहणारे व इथेच शिक्षण (प्राथमिक) घेतलेले असावेत. त्यांचे रेशनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना हे अर्जाच्या तार...
प्रश्न विचारल्याशिवाय वैयक्तिक आणि समाज जीवनातील समस्या सुटणार नाहीत : प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया
पिंपरी चिंचवड

प्रश्न विचारल्याशिवाय वैयक्तिक आणि समाज जीवनातील समस्या सुटणार नाहीत : प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया

'वुई टूगेदर फाउंडेशन' आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात प्रतिपादन पिंपरी चिंचवड : सामाजिक कार्यकर्त्यांनी आधी स्वतःसाठी जगले पाहिजे,स्वतःच्या क्षमता आणि महत्व ओळखायला हव्यात.त्यासाठी सतत प्रश्न विचारले पाहिजेत,त्यामुळे जीवनातील समस्यांचे निवारण होईल.स्वतःबद्दल अहंकार व फुशारकी नको,नम्रता आणि ऐकून घ्यायची सवय ठेवावी,तसेच वैज्ञानिक विवेकवादी विचार मंथनातून आणि छोट्या छोट्या प्रयोगातून समाज आणि राष्ट्राची सेवा करता येईल असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव, प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व करिअर मार्गदर्शक डॉ. राजेंद्र कांकरिया, यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित 'वुई टूगेदर फाउंडेशन' कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गामध्ये 'चला जग बदलूया,समाजासाठी काहीतरी करूया.' या विषयावरील प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,समाजाती...