पिंपरी चिंचवड

पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू – महापौर माई ढोरे
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू – महापौर माई ढोरे

पिंपरी : “पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू,” अशा शब्दात महापौर उषा माई ढोरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्तीबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपच्या वतीने आज पिंपरीत नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले भाष्य हे निंदनीय आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं शोभत नाही. त्यांना मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची किंमत कळत नसेल तर ते काँग्रेसचे अध्यक्ष करण्याच्या लायकीचे नाहीत. काँग्रेस पक्ष अशा नालायक लोकांना अध्यक्ष कर...
14 पिस्टल आणि आठ जीवंत काडतुसासह आरोपी जेरबंद | पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाची मोठी कामगिरी
पिंपरी चिंचवड

14 पिस्टल आणि आठ जीवंत काडतुसासह आरोपी जेरबंद | पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाची मोठी कामगिरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी कामगिरी केली आहे. शहरात पिस्टल सप्लाय करणाऱ्या मोठ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीकडुन तब्बल 14 पिस्टल आणि 08 जीवंत काडतुस असा एकुण 04 लाख 90 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरोडा विरोधी पथकाच्या या कामगिरी बद्दल अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी पथकाला 10 हजार रुपयांचे बक्षिस आणि प्रमाणपत्र जाहिर केले आहे. 1) आकाश अनिल मिसाळ (वय- 21 वर्ष, रा. प्रेम विला, रेणुका माता मंदिर समोर. इंद्रायणी नगर, भोसरी), 2) रुपेश सुरेश पाटील (वय- 30 वर्ष, रा. मु. पो. वडगाव बुद्रक, ता. चोपडा, जि. जळगाव) आणि 3) ऋतिक दिलीप तापकिर (वय- 26 वर्ष, रा. पांडुरंग हाईटस्, मुक्ता रेसीडेन्सी समोर, सुतारवाडी, लास्ट बस स्टॉप, पाषाण, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे ...
रहाटणीत नवीन डीपी बसवा व खचलेल्या डीपींची उंची वाढवा
पिंपरी चिंचवड

रहाटणीत नवीन डीपी बसवा व खचलेल्या डीपींची उंची वाढवा

शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप दळवी यांची महावितरणकडे मागणी रहाटणी : प्रभाग क्रमांक २७ मधील बऱ्याच भागात नवीन विद्युत डीपी बॉक्स बसविण्यात आलेले नाहीत. तर अनेक विद्युत डीपी बॉक्स खराब झाले असून बहुसंख्य डीपी बॉक्स खचले आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप दळवी यांनी महावितरणकडे केली आहे. याबाबत दळवी यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी नवीन डीपी बसवावेत म्हणून अनेक वेळा अर्ज दिले आहेत. अष्टविनायक कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, वेणाई कॉलनी, अंबिका कॉलनी, जय भवानी चौक, ज्ञानदीप कॉलनी, शिवनेरी कॉलनी, आदिनाथ कॉलनी, नथुराज कॉलनी अशा अनेक कॉलनीतील नवीन डीपी अजूनपर्यंत बसविलेले नाहीत. महावितरण नागरिकांची दुर्घटना होण्याची वाट पा...
खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून काळेवाडीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
पिंपरी चिंचवड

खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून काळेवाडीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

काळेवाडी, ता. १५ : प्रभाग क्रमांक २२ मधील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणच्या कामाला अखेर मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून शुभारंभ करण्यात आला. काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची मागील काही वर्षात अक्षरशः चाळण झालेली आहे. तसेच रहाटणी, थेरगाव, पिंपरी या आसपासच्या प्रभागात सिमेंट काँक्रिटचे रस्ते होत असताना काळेवाडीत मात्र, साधे डांबरीकरणही नव्हते. मात्र या रस्त्यांच्या कामासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते आणि विभागप्रमुख गोरख पाटील सातत्याने पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडेही त्यांनी निधीची विनंती केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. सदर खासदार निधीतून काळेवाडीतील ज्योतिबा नगर भागातील सूर्यकिरण कॉलनी, मातृछाया कॉलनी, समता कॉलनी या कॉलन्यांमधील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण...
लेखी नोटीस दिल्याशिवाय विज मीटर कनेक्शन तोडू नये : आप
पिंपरी चिंचवड

लेखी नोटीस दिल्याशिवाय विज मीटर कनेक्शन तोडू नये : आप

राज्य सरकारचे दुर्लक्ष आणि महावितरण ची हुकूमशाही : आप पिंपरी : विद्युत अधिनियमातील कलम ५६ मधील तरतुदीनुसार, विज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिलेली असते, त्या मुदतीपर्यंत ग्राहकाने बिल भरले नाही, तर विज कंपनीने ग्राहकास १५ दिवसांची डिस्कनेक्शन नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, असे असूनही महावितरणचे कर्मचारी ग्राहकांची विज परस्पर तोडत आहेत. तरी या प्रकारामध्ये आपण लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना १५ दिवसाची डिस्कनेक्शन नोटीस देण्याची सूचना करावी. अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंते उदय भोसले यांना केली. सामान्य नागरिक जर आपले बील सातत्याने व रेग्युलर भरत असेल व पहिलेच बिल काहीकारणाने भरणे अशक्य झाले त्यात महावितरणचीही कारणे असतात. अशा परिस्थितीत विज कनेक्शन न तोडता सतत दोन महिने बिल न भरल्यासच नंतर कारवाई व्हावी, तसेच नोटीस/ सूचना /१-२ दिवसाचा तरी अवधी बिल भ...
काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक महादेव मिरगल यांचे निधन
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक महादेव मिरगल यांचे निधन

काळेवाडी, ता. १४ : येथील ज्येष्ठ नागरिक महादेव लखु मिरगल (रा. ओमकार कॉलनी, विजयनगर) यांचे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. काळेवाडीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत महादेव मिरगल हे थरमॅक्स कंपनीचे माजी कामगार असून त्यांचे मुळगाव कोकणातील कुर्ला दिवेकरवाडी (ता. महाड, जि. रायगड) आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे थोरले पुत्र अनिल मिरगल रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक तर सुनिल मिरगल यांचा व्यवसाय आहे. तसेच धाकटे पुत्र सुशील मिरगल हे थरमॅक्स कंपनीत नोकरीला असून ते थरमॅक्स कामगार संघटनेचे उपाध्यक्षही आहेत. त्यांची मुलगी जयश्री शत्रुघ्न तटकरे (रा. खेड, जि. रत्नागिरी) या उद्योजक असून पुण्यातच स्थायिक आहेत. दरम्यान, काळेवाडी येथे २३ जानेव...
सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय माने यांच्यातर्फे ५०० किलो तिळगूळ वाटप
पिंपरी चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय माने यांच्यातर्फे ५०० किलो तिळगूळ वाटप

काळेवाडी : नागरिकांशी असलेल्या सामाजिक व सलोख्याच्या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते व काळेवाडीतील विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी प्रभाग क्रमांक २२ मध्ये सुमारे ५०० किलोग्रॅम तिळगूळ वाटप केले. मकरसंक्रांती निमित्त डॉ. माने यांनी राबवलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रभागातील विविध प्रश्नांवर मनसोक्त चर्चा केली. मकरसंक्रात या स्नेहवर्धक सणाचे आधुनिक अंग म्हणजे शुभेच्छापत्रांची देवाणघेवाण. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात कागदावरील शुभेच्छांची जागा सोशल मिडियाने घेतली असली तरी शाब्दिक शुभेच्छांसोबत तिळगुळ देणे आपुलकीच्या दृष्टीने गरजेचे आहे. या भावनेतून डॉ. अक्षय माने यांनी तिळगूळ वाटपाचा उपक्रम राबविला. या निमित्ताने प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना अनेक नागरिकांनी त्यांच्याशी प्रभागातील विविध प्रकारच्या समस्या व प्रभागा...
पिंपरी चिंचवड महापालिका रस्ते सफाईच्या टेंडरमध्ये बोगस ‘बँक गॅरंटी’ | फसवणूक करणाऱ्या कंपनीमागे राजकीय वरदहस्त?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड महापालिका रस्ते सफाईच्या टेंडरमध्ये बोगस ‘बँक गॅरंटी’ | फसवणूक करणाऱ्या कंपनीमागे राजकीय वरदहस्त?

https://youtu.be/s5lgHnr2iA0 सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीचा प्रताप भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांच्याकडून पर्दाफाश रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १३ : पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांसह आता बोगस ‘बँक गॅरंटी’सादर करुन महापालिकेसह संबंधित बँकेचीही मोठी फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती भाजपा नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamathe) यांनी आज पत्रकार परिषदेत चव्हाट्यावर आणली आहे. महापालिका 'अ' आणि 'ब' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते-गटर सफाईच्या निविदेतून तब्बल ५५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच नगरसेवक कामठे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत पुराव्यानिशी उघड केला होता. संबंधित सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद आणि तुळजापूर, जि. उस्मानाबाद ...
संभाजी ब्रिगेड तर्फे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड

संभाजी ब्रिगेड तर्फे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

पिंपरी : मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सलग चौथ्या वर्षी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती त्रिवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मराठावाडा जनविकास संघांचे संस्थापक-अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्रिवेणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. मोहन पवार व डॉ. अश्विनी पावर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अदिती कुलकर्णी, डॉ. सदाशिव देशपांडे तसेच इतर तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने हे मोफत आरोग्य शिबीर पुढील तीन दिवस त्रिवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी येथे सुरु राहणार आहे. या शिबिरामध्ये प्रामुख्याने महिलांसंबंधित सर्व आजार व उपचार करून यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाच लाख रुपयेपर्...
भोसरीत राजमाता जिजाऊ जंयती उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड

भोसरीत राजमाता जिजाऊ जंयती उत्साहात साजरी

दिघी : दिघीचा आदिवासी वाघ संस्थेच्या वतीने लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच नागरिकांना पेढे वाटून करून राजमाता जिजाऊ यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत रेंगडे यांनी अभिवादन करताना जिजाऊच्या कार्याची महती कथन केली. प्रत्येक जिजाऊच्या पोटी शिवराय जन्माला यावे, असे त्यांनी बोलताना आशा व्यक्त केली. त्याप्रसंगी ज्ञानेश आल्हाट, अमोल देवकर, कुंडलिक जगताप, रमेश साबळे, हरीभाऊ लबडे, सचिन दुबळे, विकास गाढवे, धनाजी खाडे, विकी अकूलवार, अभिमन्यू दोरकर, सुनील काकडे उपस्थित होते....