महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शितल सुर्यवंशी, चेतना सातवंडे, मेघा शिंदे, विजया घाटके यांनी पटकावला प्रथम क्रमांक
पिंपरी : कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर शासनाचे अनेक निर्बंध होते. त्यामुळे कोणतेही सण-उत्सव साजरा केले गेले नाहीत. मात्र, कोरोनाचे सावट कमी झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट, रांगोळी व मेहंदी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच काळेवाडीत पार पडला. त्यावेळी कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी, गॅस वितरण करणारे डिलेव्हरी बॉय व पत्रकारांचा कोविड योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते, शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, महिला शहराध्यक्षा अश्विनी बांगर, विद्यार्थी सेना शहराध्...










