पिंपरी चिंचवड

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व लेखक बालाजी कांबळे यांचे निधन
पिंपरी चिंचवड

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व लेखक बालाजी कांबळे यांचे निधन

पिंपरी : आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व लेखक बालाजी कांबळे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे एक सचा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हरपला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कांबळे हे रहाटणी परिसरात अनेक वर्षा पासून वास्तव्यास होते. त्यांची रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पाषाण वाकड यासह अनेक परिसरात सुरक्षा रक्षक पुरविण्याची एजन्सी आहे. सदा हसत मुखी व सर्वा सोबत मन मिळाऊ असा त्यांचा सोभाव होता. त्यांचा पार्थिवावर मुळज (तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद) या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर काही पुस्तके लिहून तयार आहेत. काही पुस्तकांचे प्रकाशन होणे बाकी आहे. ...
वीज बिल थकल्याने काळेवाडीतील जामा मशीदीचा वीजपुरवठा बंद | महावितरणविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
पिंपरी चिंचवड

वीज बिल थकल्याने काळेवाडीतील जामा मशीदीचा वीजपुरवठा बंद | महावितरणविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पिंपरी : मागील दोन महिन्यांचे १८ हजार रूपये बिल थकल्याने महावितरणने काळेवाडी-कोकणे नगरमधील जामा मशीदीचा वीज पुरवठा बंद करून वीज मीटर काढून नेले. मस्जिद ही चॅरिटेबल ट्रस्ट असून भाविकांच्या वर्गणीतून मशीदीचा सर्व खर्च केला जातो. मात्र, धार्मिक स्थळ बंद असल्याने ट्रस्टचे उत्पन्न बंद आहे. परिणामी ट्रस्ट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परंतू या बाबीचा विचार न करता महावितरणने वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे नागरिकांडून निषेध व्यक्त केला जात असून सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे मागील सुमारे दीड वर्षांपासून काळेवाडीतील जमा मशीद बंद आहे. मशीद ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. भाविक येथे नमाज पठाणसाठी येतात व त्यावेळी ते जी दहा-वीस रुपये वर्गणी देतात. या वर्गणीतून मौलाना, सहायक मौलाना व मेंटेनन्स खर्च, ल...
वाकड रोडला सार्वजनिक शौचालयाची दिपक चखाले यांची मागणी
पिंपरी चिंचवड

वाकड रोडला सार्वजनिक शौचालयाची दिपक चखाले यांची मागणी

वाकड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असून लोकसंख्येच्या प्रमाणात वाकड रोड ते वाकड चौक हा परिसर अत्यंत वर्दळीचा भाग आहे. मात्र, या तिन किलोमीटर अंतर असलेल्या भागात सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्वरीत वाकड रोडला सुलभ शौचालय तयार करण्यात यावे, अशी मागणी वाकड येथील युवा कार्यकर्ते दिपक चखाले यांनी केली आहे. याबाबत चखाले यांनी वाकडचे स्थनिक नगरसेवक मयुर कलाटे व राहुल कलाटे यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले आहे. यावेळी बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते. वाकड रोडवर आयटी पार्कची गर्दी, उच्चभ्रू सोसायट्या, परराज्यातील कामगार मोठया प्रमाणात आहे. तसेच वाकड रोड टी पाॅईंट व पान शाॅप यावरती खुप गर्दी असते. या भागातून ये-जा करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. परंतु वाकड रोड या ठिकाणी शौचालय नसल्या कारणाने मु...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिवंगत नेते दत्ता साने यांच्या निवासस्थानी अचानक भेट
पिंपरी चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिवंगत नेते दत्ता साने यांच्या निवासस्थानी अचानक भेट

पिंपरी चिंचवड (बाळासाहेब मुळे) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. ४) राष्ट्रवादीचे दिवंगत नेते दत्ता काका साने यांच्या यश निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. अजित पवार यांनी दत्ता साने यांच्या मातोश्री (आज्जी) तसेच परिवारातील सर्व सदस्यांची आस्थेने विचारपूस केली. अजित पवार नेहमीच साने कुटुंबाची विचारपूस करत असतात. प्रत्यक्ष घरी आल्या नंतर अजित पवार यांनी दत्ताकाकांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील सर्व नेते, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत दत्ता साने हे पिंपरीचिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोठे नेते, व महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांचे खूप मोठे समाजकार्य होते. कोरोना काळामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांना, परप्रांतीयांना जेवणाची सोय केली होती. तसेच धान्य वाटपही केले...
विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रकांत तापकीर यांचा वाढदिवस साजरा
सामाजिक, पिंपरी चिंचवड

विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रकांत तापकीर यांचा वाढदिवस साजरा

तब्बल २०१ रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान अनेकांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ काळेवाडी : सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप, जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर, व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी (दि. ४ सप्टेंबर) साई मल्हार मेडिकल शेजारी करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन तसेच लहान मुलांचे डॉक्टर महाले यांच्या क्लिनिकचे उद्घाटन मा. विरोधी पक्षनेते व विदयमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. महाले, राजाराम तापकीर, मल्हारीशेठ तापकीर, स्विकृत सदस्य विनोद तापकीर, हरेश तापकीर, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्या अश्विनी चंद्रकांत तापकीर, 'ग' प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर...
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पिंपरी चिंचवड, सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

काळेवाडी : साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप व जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काळेवाडी-तापकीर नगरमधील साई मल्हार मेडिकल शेजारी, तापकीर चौक येथे शनिवारी (ता. ४ सप्टेंबर) सकाळी १० ते ४ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. करोनाच्या काळामध्ये नागरिकांना अनेक आरोग्य विषयक समस्या भेडसावत आहेत. नागरिक आरोग्य विषयक समस्याकडे दुर्लक्ष करतात, आजाराचे वेळीच निदान न झाल्याने पुढे गंभीर परिस्थिती उदभवू शकते, नागरिकांची ही अडचण ओळखून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या तपासण्या होणार ई.जी.सी., रक्तातील साखरेचे प्रमाण, हाडांची ठिसूळता, शरीरातील हिमोग्लोबिन...
PCMC : काळेवाडीतील वैभव कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा
पिंपरी चिंचवड

PCMC : काळेवाडीतील वैभव कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा

काळेवाडी : विजय नगरमधील वैभव कॉलनी रस्ता खराब झाला असून साधारण मागील सात-आठ वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. अशी मागणी नागरिक करत आहेत. विजयनगर मधील सर्वात प्रथम वसलेली ही कॉलनी असून बऱ्याच वर्षापुर्वी कॉलनी रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर महापालिकेने येथील रस्त्याकडे दुर्लक्ष केले. या कॉलनीतच जैन मंदिर असल्याने अनेक वयोवृद्ध नागरिक येथे उपासनेसाठी येत असतात. मात्र, रस्ता खराब झाल्याने अनेक नागरिक पाय मुरगळून पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. असे सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी सांगितले. रहिवासी म्हणतात… "रस्ता खड्डेमय झाला असून पावसाळ्यात पाणी साचून चिखल होतो. डांबरीकरण चा...
रॉयल फाउंडेशनतर्फे काळेवाडीतील परिसराची साफसफाई
पिंपरी चिंचवड, सामाजिक

रॉयल फाउंडेशनतर्फे काळेवाडीतील परिसराची साफसफाई

काळेवाडी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने रॉयल फाउंडेशनच्या वतीने राजवाडे नगर व नढे नगर इंडियन कॉलनीतील परिसरात साफसफाई करण्यात आली. तसेच नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी रॉयरल फाउंडेशनचे आभार मानले. राजवाडे नगर भागातील आयप्पा मंदिर जवळ मोकळ्या जागेत व नढे नगर, इंडियन कॉलनीतील काही परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच अनेक नागरिक आजारी पडले असल्याच्या तक्रारीही रॉयल फाउंडेशनकडे आल्या होत्या. ही बाब लक्षात घेता, रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रवि रमेश नांगरे आणि त्यांच्या टिमने तातडीने परिसराची साफसफाई केली. रॉयल फाउंडेशनने काळेवाडीतील विविध सामाजिक समस्या सोडवण्याचा धडाका सुरू केला असून अनेक नागरिक समस्या घेऊन फाउंडेशनच्या कार्यालयात येतात. त्यांच्या समस्या सोड...
नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते व राज तापकीर यांच्या सहकार्याने डीपी रस्ता पूर्णत्वास
पिंपरी चिंचवड

नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते व राज तापकीर यांच्या सहकार्याने डीपी रस्ता पूर्णत्वास

रहाटणी : नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते व भाजप युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांच्या सहकार्याने मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित तापकीर मळा चौक ते गोडांबे कॉर्नर चौक १२ मीटर डीपी रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकारक होण्यास मोलाची मदत झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून वंचित असलेला या डीपी रस्त्याची नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते व भायुमोचे राज तापकीर यांनी प्राधान्याने निविदा प्रक्रिया करून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करत प्रशस्त असा रस्ता तयार केला आहे. या रस्त्यामध्ये फुटपाथ तयार करण्यात आला असून पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी, ड्रेनेज लाईन तसेच पिण्याची लाईन टाकण्यात आली आहे. तसेच आकर्षक असे पथदिवेही संपुर्ण रस्त्यावर लावण्यात आले आहेत. स...
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत समाजोपयोगी उपक्रम
पिंपरी चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत समाजोपयोगी उपक्रम

काळेवाडी, ता. २६ : ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजन करण्यात आले. त्यामधील आधार कार्ड दुरूस्ती, मतदान स्मार्ट करणे, आधार कार्ड स्मार्ट करणे आदी सेवांचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. तसेच ज्येष्ठ नागरिक मोफत वाचनालयाचे उद्घाटन, अन्नदान व १८ मिटर डीपी रस्त्यावर यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नगरसेवक कैलास बारणे, स्वीकृत सदस्य देविदास पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुखदेव खेडकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष धर्मा पवार, माजी मंडल अध्यक्ष प्रकाश पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वीर, दत्तात्रेय काटे मामा, ज्योतिबा कामगार मित्र मंडळाचे संस्थापक मधुकर पंधेरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव सुरेश विटकर, सामा...