पिंपरी चिंचवड

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानासाठी काळेवाडीत शिवसैनिकांचे विशेष योगदान
पिंपरी चिंचवड

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानासाठी काळेवाडीत शिवसैनिकांचे विशेष योगदान

पिंपरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने संपूर्ण काळेवाडी भागांमध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे. दरम्यान, हे अभियान राबवत असताना सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची शरीर तापमान चाचणी व ऑक्सिजन पातळी चाचणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. काळेवाडी भागातील नागरिकांना या अभियानाचा जास्तीत जास्त व्हावा यासाठी काळेवाडीतील चिंचवड विधानसभा प्रमुख हरेशआबा नखाते, काळेवाडी शिवसेना विभाग प्रमुख गोरख पाटील, उपविभाग प्रमुख गणेश वायभट, रहाटणी विभाग प्रमुख प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, शाखाप्रमुख नरसिंग माने, उपविभाग संघटक रविकिरण घटकार, दत्ता गिरी, काळेवाडी विभाग संघटिका भाग्यश्री मस्के यांच्...
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात व सेकंड कॅम्पसमध्ये साजरी
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात व सेकंड कॅम्पसमध्ये साजरी

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात उत्साहात पार पडली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी ऑनलाईन सेशनद्वारे विद्यार्थ्यी व प्राध्यापक यांना आण्णाच्या जीवनावर आधारीत माहिती दिली. कोरोनाच्या काळात कर्मवीरांच्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाने सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळून कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा, वर्कृत्व स्पर्धा, काव्यवाचन, गीतगायन व छायचित्र स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन केले होते. महाविद्यालयात सकाळी प्राचार्यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पुतळ्याला हार घालून आजच्या जयंती सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर प्राचार्यांनी जयंतीनिमीत्त आयोजीत सर्व स्पर्धांचा ऑनलाईन आढावा घेतला. तसेच कर्मवीरांच...
बहुजन समाजाच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कानाडोळा? – युवराज दाखले
पिंपरी चिंचवड

बहुजन समाजाच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कानाडोळा? – युवराज दाखले

पिंपरी : बहुजन समाजाच्या प्रामुख्याने मातंग समाजाच्या प्रगतीकडे व प्रश्नांकडे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे कानाडोळा तर करित नाहीत ना? अशी शंका शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा अखंड बाराबलुतेदार समाज बांधव महासंघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी व्यक्त केली आहे. याबाबत दाखले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये भाजपा-शिवसेना सरकार गेल्यानंतर नव्याने शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस तसेच इतर राजकिय पक्ष व अपक्ष आमदारांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे. मात्र, या सरकारच्या काळामध्ये बहुजन व अखंड बाराबलुतेदार समाज बांधवानवर प्रामुख्याने मातंग समाजावर अन्याय होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्यातील आमदा...
पिंपरी चिंचवड : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कोरोना रुग्ण व मृत्यू संख्येत वाढ – मारूती भापकर
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कोरोना रुग्ण व मृत्यू संख्येत वाढ – मारूती भापकर

कोरोनाबाबत गांभीर्याने विचार व तज्ञांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली मागणी पिंपरी : शहरात कोरोना रुग्णसंख्या ६० हजारांवर गेली असून कोरोना बळींची संख्या एक हजारांहून अधिक झाली आहे. दिवसाला २० ते २५ रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी अत्यंत वेगाने वाढतच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासनाचा गलथाण व भोंगळ कारभार आणि योग्य समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे कोरोना बाबत गांभीर्याने विचार व तज्ञांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोर...
शिक्षणासाठी निधी वाढविला तरच साक्षरता मोहीम प्रभावी होऊ शकते – डॉ. संजय खरात
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

शिक्षणासाठी निधी वाढविला तरच साक्षरता मोहीम प्रभावी होऊ शकते – डॉ. संजय खरात

महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा पिंपरी : "घोकंमपट्टीच्या पुढे जाऊन ज्ञानाचे उपयोजन, प्रकटीकरण केले पाहिजे. साक्षरतेसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजेत. शिक्षणासाठी दिला जाणारा निधी मोठ्या प्रमाणात वाढविला तरच साक्षरता मोहीम प्रभावी होऊ शकते. समाजासाठी, साक्षरतेसाठी प्राध्यापकांनी आपली सर्व संसाधने वापरली पाहिजेत" असे प्रतिपादन पुणे-गणेशखिंड येथील माॅडर्न काॅलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी केले. आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानविस्तार कार्यक्रम महात्मा फुले महाविद्यालय येथे आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य खरात बोलत होते.&n...
पिंपरी चिंचवडमधील लाॅकडाऊनच्या अफवेवर विश्वास ठेवू नये – आयुक्त
पिंपरी चिंचवड, वायरल

पिंपरी चिंचवडमधील लाॅकडाऊनच्या अफवेवर विश्वास ठेवू नये – आयुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तथापि सोशल मिडीयामध्ये प्रसारीत होत असलेल्या याबाबतच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याने यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे....
प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान

प्रा. डॉ. किरण मोहिते पिंपरी : महात्मा फुले महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील प्राध्यापक किरण बापू मोहिते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नुकतीच पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे. 'नाबार्ड अधिकोषाचे आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासातील योगदानाचे चिकित्सक अध्ययन' या विषयावर प्रा. मोहिते यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी येथील संशोधन केंद्रात आपला अभ्यास पुर्ण केला. अण्णासाहेब वाघेरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओतूर येथील डॉ. तानाजी साळवे यांनी त्यांचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर...
प्रहार जनशक्ती पक्षाच्या पिंपरी चिंचवड सहचिटणीसपदी चंद्रकांत उदगीरे यांची निवड
पिंपरी चिंचवड

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पिंपरी चिंचवड सहचिटणीसपदी चंद्रकांत उदगीरे यांची निवड

पिंपरी : प्रहार जनशक्ती पक्षाच्या पिंपरी चिंचवड सहचिटणीस पदी चंद्रकांत उदगीरे यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा संघटक शिवश्री निरज कडू पाटील यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या आदेशावरून तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ व पक्ष प्रवक्ते अजय महाराज बारस्कर यांच्या सुचनेवरून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत चंद्रकांत उदगीरे म्हणाले की, प्रहार जनशक्ती पक्षमध्ये नंदकिशोर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर सहचिटणिस व कामगार उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. माझ्यावर जो विस्वास ठेवला आहे. त्या विस्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रहार जनशक्ती म्हणजेच गोरगरिब जनतेचे प्रश्न सोडवणे त्यांना निस्वार्थपणे न्याय मिळ...
सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला हा निर्णय
पिंपरी चिंचवड

सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला हा निर्णय

पिंपरी : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या भेटीसाठी अनेक राजकीय व्यक्ती, पदाधिकारी, नागरिक गर्दी करत आहेत. पोलीस आयुक्तालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्तांच्या सदिच्छा भेटीसाठी येऊ नये, असे फर्मान त्यांनी जनसंपर्क अधिकारीद्वारे देण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना भेटण्याचा अनेक जण आपापल्या परीने आटापिटा करत आहेत. फोटोसाठी मास्क न घालता, सोशल डिस्टसिंगचेही तीनतेरा वाजवताना दिसत आहेत. त्यामुळे हे सर्व पाहता शिस्तप्रिय कृष्ण प्रकाश यांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे लक्ष्यात येताच नागरिक आणि इतर राजकीय व्यक्तींनी सदिच्छा भ...
शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे – डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे – डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे

शिक्षक दिनानिमित्त 'यशस्वी' संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनार संपन्न पिंपरी : शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. कॅप्टन.सी.एम.चितळे यांनी व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त 'यशस्वी' संस्थेच्या वतीने आयोजित 'कौशल्य विकासात शिक्षकांची भूमिका' या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिक्षक हा बदलाचा महत्वपूर्ण घटक असून शिक्षकांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा अध्यापन शैलीद्वारे अभ्यासाला पोषक वातावरण निर्मिती करण्याची कला अवगत करायला हवी. सध्या इंटरनेटमुळे माहितीचा प्रचंड साठा अवघ्या एका क्लिकवर सहज उपलब्ध होत असताना आपण विद्यार्थ्यांना वेगळे काय शिकवू शकतो, कशा पद्धतीने शिकवू शकतो याचा विचार सर्व शिक्षकांनी कर...