पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा

पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. शिवरायांच्या संदर्भात असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे. दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधी मध्ये ही प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न होणार आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या शिवप्रेमींना ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे आपले जीवनमान उंचावले आहे. त्यातील एक भाग म्हणजे सोशल मिडीयाचा समाजावर निर्माण झालेला प्रभाव, याचा प्रकर्षाने विचार करावा लागेल. तरूणाई सोशल मिडीयाच्या आभासी जगात भरकटून जाताना दिसत आहे. या तरू...
केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन 
पिंपरी चिंचवड

केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

पिंपरी, पुणे (दि. ६ फेब्रुवारी २०२३) : केंद्रातील मोदी सरकारच्या आशीर्वादामुळे गौतम अदानी हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती ठरले होते. हिंडेनबर्ग कंपनीने अदानी उद्योग समूहाची पोलखोल केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. जनतेचा पैसा धोक्यात असतानाही मोदी सरकार उद्योगपती मित्रासोबत आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली. पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी चंद्रशेखर जाधव बोलत होते. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गौरव चौधरी, सरचिटणीस विशाल कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख व कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकारवर टिका करताना जाधव पुढे म्हणाले...
डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
पिंपरी चिंचवड

डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

पिंपरी, दि.३१ (लोकमराठी) - डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर डॉ . डी. वाय पाटील विद्यापीठ ,पुणे संलग्नित डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद , हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , पिंपरी पुणे येथे दि. १ फेब्रुवारी (बुधवार) रोजी ते २० फेब्रुवारी (सोमवार) २०२३ पर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराची वेळ स.९ ते दु. ४ वा. पर्यंत असेल. रविवारी सुट्टी राहील. कृपया रुग्णांनी याची नोंद घ्यावी. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून संधिवात, आमवात, पक्षघात, वातरक्त, मधुमेह, दमा, केस गळणे,- पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा, सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा -सल्ला मार्गदर्शन , बालपक्षघात, पोटदुखी, जन्तांचा त्रास, लहान मुलांमधील त्वचा विकार, मुलांचे वजन न वाढणे- भूक न लागणे , शय्यामूत्रता (अंथरुणात लघवी करणे) इ....
आदित्य बुक्की याने राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग आणि पॅनक्रेशन क्रीडा प्रकारात पटकावले सुवर्णपदक
पिंपरी चिंचवड, क्रीडा

आदित्य बुक्की याने राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग आणि पॅनक्रेशन क्रीडा प्रकारात पटकावले सुवर्णपदक

मास रेसलिंग क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून मिळवले रौप्य पदक पिंपरी, दि. 1 फेब्रुवारी 2023 : १० वी ए आय टी डब्ल्यू पी एफ राष्ट्रीय ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र संघटनेच्या संघाद्वारे पिंपरी चिंचवड शहरातून आदित्य मल्लिकार्जुन बुक्की याने ८० किलो वजन गटात बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, आणि पॅनक्रेशन या तिन्ही क्रीडा प्रकारात भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला. त्याने बेल्ट रेसलिंग आणि पॅनक्रेशनमध्ये सुवर्णपदक तर मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे. दिनांक १९ ते २२ जानेवारी दरम्यान शिर्डी येथील सिल्वर ओक लॉन्स (जिल्हा अहमदनगर) येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा ए आय टी डब्ल्यू पी एफ ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रिएशन फेडरेशनच्या मान्यतेखाली अहमदनगर ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन यांनी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये भ...
पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशनच्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशनच्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपळे सौदागर : मोफत महाआरोग्य शिबिरात सहभागी झालेले नागरिक. त्यावेळी उपस्थित कुंदा भिसे व संजय भिसे. पिंपळे सौदागर : उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ब्रहमचैतन्य आयुर्वेद क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत महाआरोग्य आयुर्वेदीक तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवारी येथे करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात बधिरपणा, हाता पायाला मुंग्या येणे, संधीवात, पोटाचे आजार, मणक्यांचे आजार, दमा, अस्थमा, मुळव्याध, त्वचाविकार, स्त्रियांचे आजार, अम्लपित्त, डोके दुखी, अर्धशिशी (माईग्रेन), सर्दी व खोकला, वारंवार शिंका येणे आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले. त्याप्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उद्योजक संजय भिसे, डॉ. सुभाषचंद्र पवार, विलास जोशी, अनिल कुलकर्णी, सतिश पिंगळे, विवेकानंद लीगाडे, सुरेश कुंजीर, सागर बिरारी, सुभाष पाटील...
सडलेला मेंदू आणि विकृत मानसिकता असलेल्या प्रवृत्तीला ठेचून काढा – कविता अल्हाट
पिंपरी चिंचवड

सडलेला मेंदू आणि विकृत मानसिकता असलेल्या प्रवृत्तीला ठेचून काढा – कविता अल्हाट

भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीची तीव्र निदर्शने बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : महाराष्ट्र ही संतांची भूमी असण्यासोबतच सुसंस्कृत असे पुरोगामी राज्य आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जाणिवपूर्वक सातत्याने राज्यातील महापुरूषांचा अपमान केला जात आहे. आता तर विरोधी पक्षातील नेत्यांचाही अपमान भाजपचे आमदार करत आहेत. महागाई, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्‍नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच आक्षेपार्ह आणि वाद्‌ग्रस्त विधाने करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आहे. आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला. शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह असे विधान केले होते. याच्...
पिंपळे सौदागरमध्ये स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपळे सौदागर : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप (MLA Laxman Jagtap) यांना पिंपळे सौदागर येथे दुख:मय वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयात बुधवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) अध्यक्षा कुंदा भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष रमेश वाणी, आनंद हास्य क्लब राजेंद्रनाथ जयस्वाल, अल्कोवे सोसायटीचे अध्यक्ष विजय भांगरे, शरद दाऊतखानी, कल्पना बागुल, तात्या शिनगारे, उत्तर महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाचे संपर्क प्रमुख मनोज ब्राम्हणकर, श्रीकृष्ण निलेगावकर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्याप्रसंगी लक्ष्मणभाऊ यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करताना अनेकांना भावना अनावर झाल्या. लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली ...
महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचारा विरोधात आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम 
पिंपरी चिंचवड

महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचारा विरोधात आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : महाराष्ट्र संपूर्ण देशात वाढलेली महागाई, तरुणांच्या हाताला नसणारे रोजगार, त्याच बरोबर केंद्र, राज्य आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचा वाढलेला भ्रष्ट्राचार, भाजपा नेत्यांकडून थोर पुरुषांविषयी वारंवार केली जाणारी अपमान जनक वक्तव्य, आधीच बेरोजगारी वाढली असताना महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग-धंदे, शहरात वाढलेली गुन्हेगारी या ज्वलंत विषयांवर जनतेत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जन जागर यात्रेचे आज (दि. ५ जानेवारी) पिंपरी चिंचवड शहरात आगमन होत आहे. यानिमित्ताने जन जागर कोपरा सभेचे आयोजन केलेले आहे. या जन जागर यात्रे निमीत्ताने डिलक्स चौक, पिंपरी येथे दुपारी ०३:०० वाजता, खंडोबा माळ, आकुर्डी येथे सायंकाळी ०४:३० वाजता, गोसावी हॉस्पीटल, रूपीनगर&nbs...
गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा..
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा..

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्कपिंपरी, (दि. २६) : पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेट जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालकांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा निर्णय दोन दिवसांत मागे घ्या अन्यथा शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिला. देशभक्तीचे ढोंग करणारे भाजपचे नेते दुसरीकडे देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्या लोकांकडे शहर सोपविणार असल्याने पिंपरी चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच या कपंनीशी संबंधीत आजी- माजी संचालक हे हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असून झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतील गुन्हेगारी कारवायांमध्ये ते गुंतलेले आहेत, असेही गव्हाणे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व गुन्ह्यांचा आम्ही पर्दाफाश कऱणार आह...
गंभीर गुन्ह्यातील व्यक्तींकडे शहराचे केबल नेटवर्क सोपविण्याचा भाजपचा घाट – अजित गव्हाणे
पिंपरी चिंचवड

गंभीर गुन्ह्यातील व्यक्तींकडे शहराचे केबल नेटवर्क सोपविण्याचा भाजपचा घाट – अजित गव्हाणे

भाजपचा हजारो कोटी लुटण्याचा डाव रोखण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.. बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) : अत्यंत गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींच्या ताब्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या केबल इन्टरनेट नेटवर्क देण्याचा घाट स्मार्ट सिटी प्रशासनामार्फत घातला जात आहे. भ्रष्टाचार करण्याच्या खटाटोपात पिंपरी-चिंचवड शहराची वाट लावण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. शहरातील नागरिकांच्या खासगी आयुष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदर निविदा त्वरित रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे शेखर सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या धक्कादायक प्रकाराबद्दल आपली भूमिका मांडताना अजित गव्हाणे यांनी नागरिकांच्या हितापेक्षा आपली तुंबडी...