पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये लसीकरण शिबिराला उत्तम प्रतिसाद
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये लसीकरण शिबिराला उत्तम प्रतिसाद

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी covid-19 लसीकरण शिबिर 15 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. या लसीकरण शिबिराचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी नियमित मास्क वापरला पाहिजे. स्वतःच स्वतःची काळजी घ्या. लसीकरणाची सुविधा महाविद्यालयात सुरू झाली आहे. त्याचा लाभ घ्या. असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ.शंतनू जगदाळे यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी दिलीप आबा तुपे होते. या लसीकरणासाठी कार्यक्रमाचे संयोजन प्रा. तृप्ती हंबीर, प्रा. विक्रम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री यांनी केले. आभार डॉ. संजय जगताप यांनी मानल...
मावळ तालुका गुणवंत शिक्षका पुरस्काराने सुमेधा काळे सन्मानित
पुणे

मावळ तालुका गुणवंत शिक्षका पुरस्काराने सुमेधा काळे सन्मानित

पुणे : शिक्षण विभाग पंचायत समिती मावळ, सभापती, उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्य यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिरदे या गावात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सुमेधा काळे यांचा गुणवंत शिक्षका हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शिरदे हे मावळ तालुक्यातील अतिदुर्गम असे गाव असून सुमेधा काळे या मागील तीन वर्षांपासून तेथे ज्ञानदानाचे काम करत आहेत. तेथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी त्या सदोदित प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून पंचायत समिती मावळने त्यांना सन्मानित केले. माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी भाजपा राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचबर...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये #AIR Next स्पर्धेचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये #AIR Next स्पर्धेचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : देशाच्या विकासात युवकांचे स्थान मोलाचे आहे. युवकांना संधी मिळावी म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपले विचार व्यक्त करावेत. असे विचार आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजीत बागल यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमधील मराठी विभाग आणि आकाशवाणी केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त "युवकांसाठी #AIR Nxt विशेष स्पर्धा 2021-22" तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त भाषण स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा व कथाकथन इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी, स्पर्धा प्रमुख मुजमिल पटेल यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, युवकांमधील टॅलेंट शोधण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आह...
समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी – प्रा. डॉ. संदीप कांबळे
पुणे, शैक्षणिक

समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी – प्रा. डॉ. संदीप कांबळे

हडपसर (प्रतिनिधी) : पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतो. लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता सुरू केली. समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी. मुखवटे धारण करणारी पत्रकारिता नसावी. समताभाव निर्माण करणारा विचार वर्तमानपत्रातून व्यक्त झाला पाहिजे. असे विचार प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी व्यक्त केले. हडपसर येथील एस. एम .जोशी कॉलेजमध्ये पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन माध्यमातून ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग व मास कमुनिकेशन अँड जर्नालिझम या विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे बोलत होते. ते म्हणाले की, "लोकशाही संस्कृतीला पोषक जबाबदार नागरिक तयार करण्याचे काम पत्रकार करतात. लेखणीच्या...
सेवेला जात-धर्म, पक्ष-पंथ नसतो – डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे

सेवेला जात-धर्म, पक्ष-पंथ नसतो – डॉ. श्रीपाल सबनीस

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे: "सेवेला जात-धर्म, पक्ष-पंथ नसतो, सेवा हे समर्पण असून डाव्या किंवा उजव्या विचारसरणीच्या शिक्क्याने सेवाभाव बाधीत करणे अयोग्य असते" असे उद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे व ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नामदेव कांबळे यांना भारत सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते 'पद्मश्री' या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन व मातंग साहित्य परिषदेच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सबनीस बोलत होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. श्रीपाल यांच्या हस्ते मानपत्र देवून गौरवण्यात आले...
एस .एम .जोशी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस .एम .जोशी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती समारंभ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : भारताच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. आज सर्व क्षेत्रात मुलींनी आपले श्रेष्ठत्व दाखवले आहे. कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही शिक्षणावर मोजली जाते. फुले दांपत्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानामुळेच आज महिला वर्ग शिकत आहे. समाज सुधारणेचे कार्य शिक्षणामुळे होऊ शकते. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमधील सावित्रीबाई फुले जयंती समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर येथील मानसशास्त्र विभागाच्या डॉ.योगिता खेडकर यांनी "स्त्री-पुरुष समानता" या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मानाचे, समतेचे स्थान मिळायला पाहिजे. आज स्त्रियांना समान संध...
भिसे भिसे अ‍ॅक्वाच्या द्वितीय शाखेचे सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे व सुहास बालवडकर यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे

भिसे भिसे अ‍ॅक्वाच्या द्वितीय शाखेचे सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे व सुहास बालवडकर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : बालेवाडी येथील जिजाऊ इंटरप्रायजेस आणि वॉटर सप्लायर्स व्यवसायच्या द्वितीय शाखेचे उद्घाटन यशदा रिएलटी ग्रुप व उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे व सुहास बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तात्या बालवडकर, विवेक भिसे, प्रफुल जांभुळकर, वैष्णव भिसे, हृतिक नढे, मयूर काळे, प्रज्वल जांभुळकर, अजित भिसे, शुभम मेटकर, अनिकेत फुरंगे, ऋषिकेश होणे, हेमा भिसे, विजया भिसे, जयश्री जांभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिजाऊ एन्टरप्राइसेस भिसे अ‍ॅक्वा यांच्या नवीन शाखेच्या यशस्वी वाटचालीसाठी संजय भिसे यांनी सदिच्छा दिल्या. दरम्यान, भिसे अ‍ॅक्वाच्या प्रथम शाखेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने आता भिसे अ‍ॅक्वाची दुसरी शाखाही सुरू करण्यात आली आहे....
पुण्याच्या संशोधकाने भारतीय निवडणूक प्रशासन कार्यपद्धतीमध्ये सुचविले बदलः यामुळे ४५ लाख निवडणूक कर्मचाऱ्यांचा २३ मिनिटांचा वाचणार वेळ
पुणे

पुण्याच्या संशोधकाने भारतीय निवडणूक प्रशासन कार्यपद्धतीमध्ये सुचविले बदलः यामुळे ४५ लाख निवडणूक कर्मचाऱ्यांचा २३ मिनिटांचा वाचणार वेळ

पुण्याच्या संशोधकाने भारतीय निवडणूक प्रशासन कार्यपद्धतीमध्ये सुचविले बदलः यामुळे ४५ लाख निवडणूक कर्मचाऱ्यांचा २३ मिनिटांचा वाचणार वेळ पुणे : भारत हा लोकशाही प्रधान देश आहे .लोकशाही म्हटली की निवडणुका आल्याच .निवडणूक प्रशासन ही एक स्वतंत्र व्यवस्था आहे .मतदान प्रक्रियेतील दिवस महत्त्वाचा असतो .त्यामुळे आपल्या देशाची लोकशाही पुढील पाच वर्षे टिकून असते .मतदान प्रक्रियेच्या दिवशी सकाळ ६ ते रात्री ९ किंवा १० वाजेपर्यंत कामकाज चालते. मतदान यंत्र ,व्ही व्ही पेट यंत्र ,बँलेट बॉक्स ,माहिती भरलेले फार्म हे निवडणूक आयोगाकडे जमा केले जातात .यातील प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत किचकट व महत्त्वाची असते .याचा अप्रत्यक्षपणे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ताण असतो .एखादी जरी चूक झाली तरी मतदान प्रक्रिया नंतर पुन्हा घ्यावी लागते .अशी उदाहरणे आहेत .यामुळे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर चौकशी समिती, निलंबन ,बडतर्फ ...
कालीचरणविरूद्ध कुठेही केस करा, त्या केसेस मोफत चालविणार – ऍड. असीम सरोदे
मोठी बातमी, पुणे

कालीचरणविरूद्ध कुठेही केस करा, त्या केसेस मोफत चालविणार – ऍड. असीम सरोदे

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरण महाराज (kalicharan maharaj arrested) याला अखेर अटक करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कालीचरणच्या विरोधात महाराष्ट्रात कुठेही पोलीस तक्रारी करण्यात येतील किंवा न्यायालयात केसेस दाखल करण्यात येतील. त्यांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. असे आवाहन विधीज्ञ ऍड. असीम सरोदे यांनी केले आहे. ऍड. असीम सरोदे यांनी आपल्या फेसबुक खात्यावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कालीचरण या उथळ व धर्मांध व्यक्तिविरोधात महाराष्ट्रात कुठेही मोफत केसेस चालविण्यासाठी मी आमच्या वकिलांच्या टीमसोबत कायदेविषयक कामकाज बघू. केवळ लोकवर्गीणीतून प्रवास खर्च करावा. लोकशाही रक्षणासाठी विषारी हिंदू व विषारी मुस्लिमांना थांबविणे, रोखणे, कायद्याची आडकाठी आणणे आ...
खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक
पुणे, मोठी बातमी

खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक

सावकार नानासाहेब गायकवाड विरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे आरोपींचा फिर्यादीलाच अडकवण्याचा डाव उघड पुणे : औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल प्रकरणावर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी आणि खंडणी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे (वय 35, रा. ए/31 हजारे सदन, लुंकड हॉस्पिटलजवळ, दापोडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. बेकायदेशीररित्या सावकारी पद्धतीने पैसे देवून अवास्तव पद्धतीने व्याज आकारणी करत तसेच खंडणी मागत ती न दिल्यास सामाजिक बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे स्वप्नील बालवडकर (रा. बालेवाडी) यांनी तक्रार केली होती. त्यानूसार वाळके आणि हजारे यांच्या विरोधात चतु:श्रृंगी पोलीस...