डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करीत आहेत. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी लॉक डाऊनचे पालन करीत, गरीब आणि गरजू कामगार वर्गाला तोंडाला बांधण्याचा मास आणि जीवनावश्यक अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले. तसेच कोवीड १९ या साथीच्या रोगासंदर्भात समाजात जनजागृतीचे कामही केले.
कोरोना या साथीच्या रोगाची लक्षणे कोणती?, कोरोना या रोगाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स राखणे, वैयक्तीक स्वच्छता राखण्यासाठी वारंवार साबनाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुने. वस्तू व सामानाची स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करणे. तसेच इतरत...