डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह ऑनलाइन उपक्रमांनी साजरा
औंध : पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम, वाड्मय मंडळ उद्घाटन समारंभ, ऑनलाईन व्याख्यान, ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धा, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, ऑनलाईन नाट्यवाचन स्पर्धा, ऑनलाईन कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब यांनी सांगितले.
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्...










