पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
पुणे, सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करीत आहेत. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी लॉक डाऊनचे पालन करीत, गरीब आणि गरजू कामगार वर्गाला तोंडाला बांधण्याचा मास आणि जीवनावश्यक अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले. तसेच कोवीड १९ या साथीच्या रोगासंदर्भात समाजात जनजागृतीचे कामही केले. कोरोना या साथीच्या रोगाची लक्षणे कोणती?, कोरोना या रोगाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स राखणे, वैयक्तीक स्वच्छता राखण्यासाठी वारंवार साबनाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुने. वस्तू व सामानाची स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करणे. तसेच इतरत...
PUNE : कोरोना प्रतिबंधासाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
पुणे

PUNE : कोरोना प्रतिबंधासाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊल पुणे : पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील. राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. श्री.अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. श्री. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. श्री. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त तर, श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्वेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून...
Lockdown : 39 किलोमीटरचा प्रवास करून सर्पमित्राने केली आजी व चिमुरड्यांची सुटका (व्हिडीओ)
पुणे, मोठी बातमी

Lockdown : 39 किलोमीटरचा प्रवास करून सर्पमित्राने केली आजी व चिमुरड्यांची सुटका (व्हिडीओ)

लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे : उरूळी कांचनजवळील एका घरात भलामोठा साप शिरला, आणि सगळ्यांचीच पाचावर धारणा झाली. आतील सर्वांनी घराबाहेर पळ काढला. मात्र, घरातील खाटेवर असलेल्या वयोवृद्ध आजीजवळ दोन चिमुरड्यांनी आसरा घेतला. अशा घाबरलेल्या परिस्थितीत कोणालाच काही कळेना. त्याचवेळी सर्पमित्र लक्ष्मण पांचाळ यांना फोन करून कळविण्यात आले. लॉकडाऊन असतानाही पांचाळ व त्यांची पत्नी सीमा यांनी चिंचवड येथून 39 किलोमीटरचा प्रवास करत सापाला पकडून जंगलात सोडून दिले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. शनिवारी (ता. 25) दुपारी ही घटना घडली. उरूळी कांचन जवळील महाराजा आकादमी येथे एका घरात सुमारे सात फुट लांबीचा साप शिरला. त्यावेळी सर्वांनीच घरातून धुम ठोकली. मात्र, दोन चिमुरड्यांनी घरातच खाटेवर असलेल्या आजीजवळ जीव मुठीत धरून...
देशभरातील दुकाने सुरू होणार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडची बंदच राहणार
पुणे

देशभरातील दुकाने सुरू होणार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडची बंदच राहणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णयमास्क बंधनकारक, ५० टक्के कर्मचारी, सोशल डिस्टन्सिंगचे बंधन मुंबई : देशभरात लॉकडाऊनमध्ये आजपासून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, ५० टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. त्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील दुकाने तुर्तास सुरू होणार नाहीत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रेसनोटनुसार, गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र ...
Coronavirus : पुणे, पिंपरीत पाच रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात ११६ नवे रुग्ण
पुणे

Coronavirus : पुणे, पिंपरीत पाच रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात ११६ नवे रुग्ण

पुणे : पुणे शुक्रवारी दिवसभरात पुणे शहरात चार, तर पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे, पिंपरी आणि परिसरातील मृतांची संख्या ७१ झाली आहे. दिवसभरात पुणे शहरात १०४ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२ असे ११६ नवे रुग्ण आढळले असून परिसरातील एकूण रुग्णसंख्या ११०१ वर पोहोचली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी रात्री याबाबत माहिती दिली आहे. ससून रुग्णालयात उपचार घेणारे ४० आणि ६३ वर्षीय, तर इतर खासगी रुग्णालयात उपचार घेणारे ४० आणि ५२ वर्षीय रुग्ण शुक्रवारी दगावले. या सर्व रुग्णांना श्वासोच्छ्वासाचे तसेच हृदयरोगाशी संबंधित गुंतागुंतीचे आजार होते. पिंपरी-चिंचवडमध्ये ६५ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुणे शहरातून शुक्रवारी १६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४६ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधून एकूण २१ रुग्ण बरे होऊन घरी गेले ...
लेखक डी.सी. पांडे यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप
सामाजिक, पुणे

लेखक डी.सी. पांडे यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

पुणे : कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. अशा परिस्थित गोरगरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी लेखक व प्राध्यापक डी. सी. पांडे सर यांनी पुढाकार घेत वाघोली व खराडी परिसरात गरजूंना अन्नधान्य वाटप केले. खराडी पोलिस ठाण्याच्या मार्फत खराडी लेबरकॅम्प व दर्गा परिसरात अन्न धान्य वाटप करण्यात आले. तसेच वाघोली पोलिस ठाण्याच्या मार्फत गरीब व गरजू नागरिकांना अन्न धान्य वाटप केले. त्यावेळी खराडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तापरे व विश्वास पाटील, वाघोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन अटकरे, डी.सी.पांडे सर, डॉ. सरीता पांडे, सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले, प्रविण दिवटे व सागर गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, डी.सी.पांडे हे प्रसिद्ध लेखक असून त्यांच्या आयआयटी जेईई आणि एनईईटी परीक्षेसाठी 13 पेक्ष...
पत्नीशी भांडण केल्यास होऊ शकते विलगीकरण
पुणे

पत्नीशी भांडण केल्यास होऊ शकते विलगीकरण

पुणे (लोकमराठी) : टाळेबंदीमुळे घरात पती-पत्नी यांच्यात सतत भांडणे होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पत्नीशी भांडण करणाऱ्या पतीला आता विलगीकरणाची शिक्षा देण्यात येणार आहे. कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात ही नवी क्लृप्ती राबविण्यात येत आहे. टाळेबंदीत आता जोडप्यांची भांडणे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घरामध्ये पती आणि पत्नीची सतत भांडण होत असल्याचे समोर आले आहे. पत्नीशी भांडणाऱ्या पतीला समज देण्यात येईल आणि तरीही त्याने ऐकलं नाही, तर थेट पोलिसांच्या मदतीने त्याचे संस्थात्मकरीत्या विलगीकरण करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात आदेश काढला आहे. टाळेबंदीच्या काळात घरामध्ये पती-पत्नी यांच्यातील वाद वाढल्याने असा आदेश काढावा लागला, अशी माहिती त्यांनी दिली आहे. कर...
PUNE : पुण्याचे तापमान चाळिशीपार!
पुणे

PUNE : पुण्याचे तापमान चाळिशीपार!

File photo पुणे (लोकमराठी) : पुणे शहर आणि परिसरातील दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा यंदाच्या हंगामात प्रथमच चाळिशीपार गेला आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने पुणेकरांना दिवसा घरातही उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडय़ाचा सामना करावा लागतो आहे. वाढलेल्या तापमानासह थंडावा मिळविण्यासाठी घरातील वातानुकूलित यंत्र आणि पंख्यांचा वापर वाढला आहे. तापमानातील ही वाढ कायम राहणार असून, पुढील आठवडाभर दिवसाच्या तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहरासह परिसरामध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवडय़ात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास होता. याच कालावधीत राज्यात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढल्याने ढगाळ स्थिती निर्माण झाली. त्यात शहराच्या क...
मद्याचा ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे

मद्याचा ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे (लोकमराठी) : टाळेबंदी काळात अवैधरीत्या परराज्य आणि जिल्ह्य़ांमधून पुण्यात मद्य आणण्याच्या प्रकरणांमध्ये, तसेच शहरासह जिल्ह्य़ात मद्याची वाहतूक केल्याच्या प्रकरणांमध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मद्य तसेच वाहने वगैरे मिळून तब्बल ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी २०१ गुन्हे दाखल झाले असून ४५ जणांना अटक करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी लागू करण्याआधीच पुण्यात करोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जमाव आणि संचारबंदी लागू केली होती. याबरोबरच जिल्हाधिकारी राम यांनी शहरासह जिल्ह्य़ातील मद्यविक्रीची दुकाने, तसेच मद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश प्रसृत केले होते. परिणामी २० मार्चपासून मद्...
अभिनेते सयाजी शिंदे यांची बालमित्रांना निसर्ग संवर्धनाची साद
पुणे

अभिनेते सयाजी शिंदे यांची बालमित्रांना निसर्ग संवर्धनाची साद

पुणे (लोकमराठी) : अभिनेते व निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांची बालमित्रांना निसर्ग संवर्धनाची साद घालत, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पुरस्कृत व आई निर्मिती संस्था आयोजित 'निसर्ग संवर्धन काळाची गरज' या विषयांतर्गत व्हिडिओ स्वरूपात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही वक्तृत्व स्पर्धा १५ वर्षा खालील बालमित्रांसाठी (मुले/मुली) आहे. त्यासाठी दोन मिनिटांचा व्हिडीओ असणे गरजेचे आहे. "निसर्ग आपला नातेवाईक आहे. आणि त्याला सोडून आपण जे काही करत आहोत, त्याचेच परिणाम आपण कोरोना जन्य परीस्थिती तुन भोगत आहोत. तर बालमित्रांनो निसर्ग संवर्धनासाठी, निसर्ग आपला नातेवाईक मानुन स्पर्धेसाठी आपल्या कलाकृती पाठवा" असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे. कवीता, नाटक, गीत, निबंध, विनोद यापैकी कोणत्याही एका प्रकारात आपल्या कलाकृती 9226789883 या नंबरवर व्हॉट्स ॲपद्वारे किंवा aainirmiteesanstha@gmail.com य...