पुणे

प्रसिध्द छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे पुण्यात निधन
पुणे

प्रसिध्द छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे पुण्यात निधन

पुणे: मालिका,चित्रपट आणि माहितीपटांचे छाया दिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे पुण्यात अल्पशा आजाराने बुधवारी (दि.२७) निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तसेच माहेरची साडी, आत्मविश्वास, आमच्यासारखे आम्हीच, दोघी, अशा गाजलेल्या चित्रपटांचे छायादिग्दर्शन दुखंडे यांनी केले होते. हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिकेवरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्यावर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते. त्यात भूकंप, मजहब, गुलमोहर, अशा हिंदी , तर माहेरची साडी, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, मधुचंद्राची रात, आत्मविश्वास, आमच्या सारखे आम्हीच, दोघी, निष्पाप, वाजवा रे वाजवा, दे टाळी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. दुखंडे यांना ‘निष्पाप ’ या चित्रपटासाठी सर्वोत्त...
मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण
पुणे

मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण

गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली. पिंपरी : गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली. राज्यलोकलेखा समितीचे अध्यक्ष अड. सचिन पटवर्धन यांच्या शिष्टाईने पिंपळेगुरव येथील जगताप यांच्या निवासस्थांनी समेट घडवियात आला. मनोमिलनाला बारणे यांनी जगताप यांना लोटांगण घातल्याची चर्चा आहे.मावळ लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात आमदार जगताप सहभागी झाले नव्हते. उलट जगताप यांच्यासह समर्थक नगरसेवकांच्या बैठकीत बारणे यांच्या उमेदवारीला विरोध कर...
पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात
पुणे, महाराष्ट्र

पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात

सकाळी एका इच्छुकाला उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा असताना पुन्हा बैठक सुरु झाल्याने उमेदवार निवड पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात पुणे : पुणे लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्यात अखेरचा खल सुरु झाला असून जोरदार संघर्षाला सुरुवात झाली आहे. सकाळी एका इच्छुकाला उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा असताना पुन्हा बैठक सुरु झाल्याने उमेदवार निवड पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पुणे लोकसभा मतदार संघ अनेकवर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असताना अर्ज भरण्याची मुदत सुरु होऊनही त्यांना अजून उमेद...