भक्ती शक्ती समुह शिल्पाजवळ शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्याची मागणी
निगडी : भक्ती शक्ती समुहशिल्पाजवळ सार्वजनिक शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव व जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके यांनी केली आहे.
याबाबत महापौर माई ढोरे व महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी २ फेब्रुवारी रोजी संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्पाचे दर्शन व संत तुकाराम महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली पहावयास मिळाली, काही ठिकाणी फर्शीच्या जॉईंट मधील सिमेंट निघालेले तर काही फरश्या निम्म्या तुटलेल्या अवस्थेत दिसल्या.
तसेच अती संवेनशील बाब म्हणजे या परिसरात अनेक पर्यटक विशेष म्हणजे महीला, मुले व ज्येष्ठ नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी शौचालया...