पिंपळे सौदागरमध्ये मोफत सांधेदुखी उपचार व नशामुक्ती शिबिराचे उद्घाटन
उन्नती सोशल फाऊंडेशन आणि ब्रम्हचैतन्य क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन
पिंपरी : उन्नती सोशल फाऊंडेशन आणि ब्रम्हचैतन्य क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथे मोफत सांधेदुखी उपचार व नशामुक्ती शिबिराचे उदघाटन आज करण्यात आले. १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर असे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उदघाटन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ब्रम्हचैतन्य क्लिनिकचे डॉ. ओंकार बाबेल, राजस्थान औषधालयाचे महेश लोखंडे, श्री संजय भिसे व्हा. चेअरमन यशदा रिअलिटी ग्रुप, श्री रमेश वाणी, डॉ सुभाषचंद्र पवार, श्री अशोक वारकर या मान्यवरांसह पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये पाठदुखी, कंबर दुखी,गुडघे, मान, हाता-पायाचे सांधे याची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर...