सामाजिक

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन
पुणे, सामाजिक

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन

हडपसर : (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अनंत चतुर्दशीनिमित्त निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हडपसर परिसरातील गणपतींचे हौदात विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून सहकार्य केले. यावेळी निर्माल्य संकलन करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमास प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात प्रा. स्वप्नील ढोरे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. दिनकर मुरकुटे यांनी सक्रीय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलनाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवून जनजागृतीचे कार्य केले....
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यमानाने बुद्ध रूप मूर्ती स्थापना कार्यक्रम संपन्न 
सामाजिक

क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यमानाने बुद्ध रूप मूर्ती स्थापना कार्यक्रम संपन्न

रहाटणी : येथील शाळे मध्ये "बुध्दरुपाची प्रतिष्ठापना" (स्थापना) भंते धम्मानंदजी (पारणेर) व भंते पट्टीसेनजी यांच्या हस्ते केली. यावेळी रहाटणी गावातील ज्येष्ठ मान्यवर आयु रघुनाथ भालेराव, विठाबाई चाबुकस्वार, सारनाथ बुध्द विहार अध्यक्ष शांताराम भालेराव, कुरुळी गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा कांबळे, बौध्दाचार्य गोरख रोकडे, तात्या शिनगारे, चैतन्य हस्य क्लबचे प्रमोद देशमुख व इतर सदस्य, भारतीय बौध्दजन विकास समिती सदस्य प्रदिप पवार, मिलिंद जाधव, प्रमोद गायकवाड, राजेश भालेराव, इंजि. विजय कांबळे (अध्यक्ष बानाई ) व प्राध्यापक वसंत चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार यांचे संपूर्ण कुटुंब व मित्र परिवारव इतर सदस्य उपस्थित होते. या ऐतिहासीक कार्यक्रमात नेत्रदीपक, विराट, शांततेचे प्रतीक असलेल्या तीन फूट तीन इंच सम्यक गौतम बुद्धरूप मूर्तीचे अनेक अनुयाईंच्या उपस्थितीत महाबुद्ध वंदना म्हणून भंतेंच्या हस्ते अ...
मल्हार आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल मदने यांची निवड
सामाजिक

मल्हार आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल मदने यांची निवड

पिंपरी : आज समाजासाठी नेतृत्व करणारे अनेक आहेत. पण त्यातच प्रामाणिक आणि सचोटीने नेतृत्व करणारे फार कमी आहेत. त्याचबरोबर आता नेतृत्व करणारे लोकांच्या गरजांकडे पाठ फिरवून नेतृत्व करण्याचा देखावा करतात. नेतृत्व की हुकूमशाही? असा प्रश्न आज सर्वाना पडलाय. मग हे चित्र बदलायला आता आपण तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा हे ही खरं. प्रस्थापित नेते एखाद्या समाजाच्या समस्यांकडे पाठ फिरवतात, दुर्लक्ष करतात. मग दुर्लक्षित समाजाची दखल घ्यायला भाग पाडण्यासाठी हाच तरुण वर्ग पुढे सरसावतो आणि आपल्या समाजाचं नेतृत्व करतो. या जुन्या नेतृत्वाखाली काही साध्य होणार नसेल तर तरुणांनी नेतृत्व करणं चुकीचं आहे असं म्हणणं मूर्खपणाचं लक्षणं आहे. आज प्रस्थापित नेतृत्व असणारे लोक फक्त सत्तेसाठी आणि मोठेपणा करण्यासाठीच आपलं नेतृत्व करतायत. अशा लोकांच्या सत्तेला धक्का देण्याची ताकद तरुण नेतृत्वात आहे याला दुमत नाही. जर प्रत्...
पिंपळे सौदागरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे यांचा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मान
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे यांचा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मान

हा पुरस्कार समाजातील दिनदुबळ्यांच्या चरणी अर्पण करतो; भिसे यांनी व्यक्त केली कृतज्ञता पिंपरी : जनसेवा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेली अनेक वर्ष लोकांची कामे करत आलो. परमेश्वराने दिलेल्या दोन हाताने दिनदुबळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याच संधीचं सोणं झालं असून हा पुरस्कार त्याचेच प्रतिक आहे. त्यामुळे हा सन्मान पिंपळे सौदागरमधील दिनदुबळ्या, दिव्यांग, अंध-अपंग, ज्येष्ठ, कष्टकरी, कामगार वर्गातील नागरिकांच्या चरणी अर्पण करतो. त्यांनी सेवा करण्याची संधी दिली नसती तर हा सन्मान घेण्याचा योगच आला नसता, अशी भावना उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय उर्फ आबा भिसे यांनी व्यक्त केली. सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच, साकोसां महिला मंडळ, साकोसां ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संजय उर्फ आबा भिसे यांना भ...
राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे अरुण बोराडे यांचा सन्मान
सामाजिक

राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे अरुण बोराडे यांचा सन्मान

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १६ : खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालय येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने पक्षाचे मुख्य संघटक, कामगार नेते, साहित्यिक, गिर्यारोहक, विविध विषयांचे गाडे अभ्यासक असे अष्टपैलु नेतृत्व असलेल्या अरुण बोराडे यांचा शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट व राष्ट्रवादी अर्बन सेल अध्यक्षा मनीषा गटकळ यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गोरक्ष लोखंडे प्रस्तावना मांडली. पक्ष प्रवक्ते, विनायक रणसुंभे, संपत पाचुंदकर, ओबीसीचे शहराध्यक्ष विजय लोखंडे आणि इतर मान्यवरांनी अमृत मोहोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देताना, अरुण बोराडे ...
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपकडून ज्येष्ठांचा सन्मान
सामाजिक

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपकडून ज्येष्ठांचा सन्मान

पिंपरी, ता १५ : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या संपर्क कार्यालयामध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आम आदमी पार्टीच्या आकुर्डी संपर्क कार्यालयात आमचे शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विठ्ठल रामचंद्र काळभोर, विश्वस्त खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक वाल्मीक बेंद्रे, माजी सैनिक दस्तगीर बक्षुद्दीन मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते किसन तात्या काळभोर, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब कुराडे, विष्णुपंत गुल्हाने अध्यक्ष जनहित ज्येष्ठ नागरिक संघ, भगवान बडगुजर अध्यक्ष विघ्नहर्ता जेष्ठ नागरी संघ, संपत शिंदे अध्यक्ष शिवशक्ती पतसंस्था, ज्ञानेश्वर ननावरे, प्रकाश परदेशी, अन्सारी काका, मोहन जाधव, च...
चिंचवडगावात प्रबुद्ध संघातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
सामाजिक

चिंचवडगावात प्रबुद्ध संघातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चिंचवडगाव, ता. १५ : प्रबुद्ध संघाच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रबुद्ध संघाचे ज्येष्ठ सभासद व महानगरपालिका अधिकारी राष्ट्रपाल भोसले तसेच अशोक कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पवार यांनी उपस्थिती दर्शविली होती. राष्ट्रपाल भोसले, अशोक कदम, डॉ. धर्मेंद्र रामटेके, रंजना चेरेकर, प्रदिप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सचिव किशन बलखंडे यांनी केली व आभार प्रदर्शन राजू वासनिक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक पवार, संजय कांबळे, दिंगबर घोडके यांनी परिश्रम केले....
काळेवाडीत मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड, सामाजिक

काळेवाडीत मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी घेतला लाभ

पिंपरी : काळेवाडी (Kalewadi) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी लाभ घेतला. त्यामध्ये चार मोती बिंदूचे रूग्ण सापडले असून त्यांची लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच यावेळी चष्मेही वाटप करण्यात आले. अशी माहिती शिबिराचे संयोजक शेख इरफान अब्दुल रहीम यांनी दिली. डॉ. निलेश चाकणे (Dr Nilesh Chakane), डॉ. पुनित सिंग (Dr. Punit K Singh), रजिया पठाण यांनी नागरिकांची तपासणी केली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, हज्रात पटेल, शकील शेख, साजिद शेख, हाजीमलंग शेख, सामाजिक कार्यकर्ते सुनील तात्या पालकर, श्रीकांत पारखी, शरद राणे, रवी राहते, राजू राहते, अनिल कदम, सुधाकर नलावडे, आशिफ शेख, इकबाल पठाण, अहमद मोमीन, चंद्रजिरी, राजीव पिल्लई, दीपक चव्हाण, मदन पुरोहित, अनिल हातणकर, प्रकाश ताम्हणकर आदी उपस्थित होते. याबाबत इरफान शेख म्हणाले की, एकूण १०१ लोकांनी सहभाग...
पाचवे दिव्यांग होमिओपॅथी उपचार शिबिर उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पाचवे दिव्यांग होमिओपॅथी उपचार शिबिर उत्साहात संपन्न

बैंक ऑफ बडोदा प्रायोजक तत्वावर सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी दिव्यांग मुलांसाठी केला संयुक्तरित्या संकल्प पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे दिनांक 20 जुलै 2022 रोजी सप्तर्षी फाऊंडेशनच्या विभागीय कार्यालयात विषेश (दिव्यांग) मुलांकरीता मोफत चौथे होमिओपॅथी उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. दिव्यांग मुलांचा सांभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते, अशा पालकांसाठी सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. ऑगस्ट २०२१ पासून सुरू केलेल्या या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात. नोंद...
पिंपरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा २२० नागरिकांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा २२० नागरिकांनी घेतला लाभ

विरोधी पक्षनेते अजित पवार व ज्येष्ठ नेते योगेश बहेल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे शिबिराचे आयोजन पिंपरी, ता. १७ : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार तसेच शहराचे ज्येष्ठ नेते माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या संकल्पनेतून आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरी येथील सावित्रीबाई फुले ग्रंथालय येथे प्रभाग क्रमांक १७ व १८ मधील सुमारे २२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये कान, नाक, घसा व नेत्र आदी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी बोलताना योगेश बहेल (Yogesh Behal) म्हणाले की, "पिंपरी चिंचवडचे विकास पुरुष विरोधी पक्षनेते अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) सर्व सेल तर्फे शहरात येत्या पूर्ण महिनाभर लोकोपयोग...