सामाजिक

भक्ती शक्ती समुह शिल्पाजवळ शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड, सामाजिक

भक्ती शक्ती समुह शिल्पाजवळ शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्याची मागणी

निगडी : भक्ती शक्ती समुहशिल्पाजवळ सार्वजनिक शौचालय व ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव व जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके यांनी केली आहे. याबाबत महापौर माई ढोरे व महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी २ फेब्रुवारी रोजी संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्पाचे दर्शन व संत तुकाराम महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली पहावयास मिळाली, काही ठिकाणी फर्शीच्या जॉईंट मधील सिमेंट निघालेले तर काही फरश्या निम्म्या तुटलेल्या अवस्थेत दिसल्या. तसेच अती संवेनशील बाब म्हणजे या परिसरात अनेक पर्यटक विशेष म्हणजे महीला, मुले व ज्येष्ठ नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी शौचालया...
माधव धनवे पाटील यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड, सामाजिक

माधव धनवे पाटील यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : शरीरातील डोळे हा अवयव सुदृढ आणि निरोगी रहावा यासाठी माधव धनवे पाटील यांनी प्रभाग १७ मधील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका शमीम पठाण यांच्या हस्ते झाले. या शिबिरासाठी १६० जणांनी नाव नोंदणी केली होती. त्यात ८० जणांचे नेत्र तपासणी करण्यात आली. यासाठी हडपसर येथील प्रसिद्ध एच.वी. देसाई आय हॉस्पिटलने सहकार्य केले. या शिबिरास दळवीनगर य, भोईरनगर, उद्योगनगर, इंदिरानगर, बिजलीनगर आणि प्रेमलोक पार्क भागातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत याचा लाभ घेतला. यावेळी माधव पाटील म्हणाले की, समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्याच्या सुखसुविधा पोहोचल्या पाहिजेत. यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. यापुढे दंत चिकित्सा शिबिर, कॅन्सर तपासणी, रक्त तपासणी तसेच इतर आरोग्य विषयक शिबिरे घेण्याचा मानस माधव पाटील यांनी व्यक्त केला. त्यावेळी ज्ञानेश्व...
सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी दिव्यांग मुलांसाठी निर्माण केला आशेचा किरण
पिंपरी चिंचवड, सामाजिक

सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी दिव्यांग मुलांसाठी निर्माण केला आशेचा किरण

तिसरे मोफत होमिओपॅथी शिबिर संपन्न पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे वाकड येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यान येथे विषेश (दिव्यांग) मुलांकरीता मोफत होमिओपॅथी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सविता खुळे (सभापती, महिला व बालकल्याण पिंपरी चिंचवड महानगरपालिका), पोलीस निरीक्षक संतोष पाटील (गुन्हे शाखा, वाकड पोलीस स्टेशन), गोपाळ माळेकर (स्विकृत सदस्य) मिलिंद करंजकर (मनोचिकित्सा विभाग, जिल्हा रुग्णालय, सांगवी) या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सदर शिबिरास मान्यवरांनी उपस्थित राहून सप्तर्षी फाउंडेशन सतत करत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यासाठी सप्तर्षी फाउंडेशनला प्रोत्साहन दिले व पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या. दिव्यांग मुलांचा संभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते, अशा पाल...
दिव्यांग, निराधार नागरिकांना भोजन व ब्लॅंकेट वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

दिव्यांग, निराधार नागरिकांना भोजन व ब्लॅंकेट वाटप

चिंचवड : येथील काळभोर नगरमध्ये नवजीवन दिव्यांग निराधार संस्थेमार्फत दिव्यांग तसेच निराधार नागरिकांना थंडीच्या बचाव पासून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास आलेल्या सर्व नागरिकांनी भोजन देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. दिपक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रा. दिपक जाधव म्हणाले की, आज अंधांच्या ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल यांची जयंती आहे. त्याने उठावदार लिपी तयार केली असून तो फ्रान्समधील होता. या लिपीद्वारे अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठाव टिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकले. अठराव्या शतकात व्हॅलेंटाइन हॉई ह्या फ्रेंच अंधशिक्षकास उठावदार लिपीतील अक्षरे अंधांना वाचता येतील, ही गोष्ट आढळून आली. नवजीवन दिव्यांग निराधार संस्थेचे अध्यक्ष राहुल बिराजदार, उपाध्यक्ष स्वप्नील पवार, सचिव महादेव पवार, खजिनदार महेश केंद्रे, कार्यकारणी सभासद शबाना शेख, उमाका...
सप्तर्षी फाउंडेशनकडून सामाजिक बांधिलकी कायम | शीत ऋतु संरक्षण अभियानामार्फत गरजू व्यक्तींना मोफत ब्लँकेट वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

सप्तर्षी फाउंडेशनकडून सामाजिक बांधिलकी कायम | शीत ऋतु संरक्षण अभियानामार्फत गरजू व्यक्तींना मोफत ब्लँकेट वाटप

महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा : फेसबुक|ट्वीटर|टेलिग्राम|इंस्टाग्राम पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन तर्फे शीत ऋतु संरक्षण अभियानामार्फत गरजू व्यक्तींना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले. दरवर्षी आपल्या देशात शेकडो लोकांचा थंडीपासून संरक्षण न झाल्यामुळे मृत्यू होते. पिंपरी चिंचवड विभागात गरजू रस्त्यावरील व्यक्तींचे थंडीपासून संरक्षण व्हावे या भावनेने मोफत ब्लँकेट वाटप केले जाते. गेले १० वर्षापासून सदर संकल्प आणि उपक्रम अविरतपणे चालू असून हजारो ब्लँकेट आजपर्यंत वितरीत करण्यात आले. https://youtu.be/i0lBsQFAFko नवनवीन व्हिडीओसाठी सब्सक्राईब करा : 👉 युट्यूब चॅनेल या वेळी संस्थेचे सह सचिव मनोजकुमार बोरसे तसेच गोल्डन प्रिंट हाऊसच्या संचालिका अश्विनी सोनगावकर, प्रवीण सोनगावकर, आनंद उदावंत, संग्राम गोरे, बुद्धभूषण गायकवाड, मच्छिंद्र वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बिजामृत लाक...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपतर्फे गरजूंना ई-श्रम कार्डचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपतर्फे गरजूंना ई-श्रम कार्डचे वाटप

पिंपरी : क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. ३ जानेवारी २०२१ रोजी सुरू केलेल्या आम आदमी पार्टी जनसंपर्क कार्यालयाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गरजू नागरिकांसाठी ईश्रम कार्डच्या वाटपाची सुरुवात देखिल करण्यात आली. आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने गेल्या वर्षभरात शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. प्रामुख्याने जागृती पालक संघटना, कष्टकरी घरेलू महिला कामगार संघटना तसेच आम आदमी रिक्षा चालक संघटना या संघटना स्थापन केल्या व त्यामाध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ननावरे,...
दिघीचा आदिवासी वाघ संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
सामाजिक

दिघीचा आदिवासी वाघ संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

दिघी : येथील दिघीचा आदिवासी वाघ संस्थेच्या वतीने पिंपरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत रेंगडे यांनी अभिवादन करताना म्हणाले की,"महिलांच्या शिक्षणासाठी मोठे कार्य करणाऱ्या या माऊली पुढे हजार वेळा नतमस्तक झाले तरी कमीच पडेल. आज ज्या महिला शक्तीची चर्चा होत आहे. त्याची बीजे रोवून त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडून सुरुवात केली होती. प्रत्येक स्त्रीने आपल्यालातील सावित्रीला ओळखून शक्तीवान निर्भया बनले पाहिजे." कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंत रेंगडे, बाळासाहेब तिटकारे, अमोल देवकर, सचिन दुबळे, दिपक लोंखडे आदी उपस्थित होते....
राजेंद्र पवार यांना श्री मोरया पुरस्कार प्रदान
पिंपरी चिंचवड, सामाजिक

राजेंद्र पवार यांना श्री मोरया पुरस्कार प्रदान

चिंचवड : राजेंद्र पवार यांचा सन्मान करताना सुनेत्रा पवार, अश्विनी चिंचवडे, डॉ. एकनाथ खेडेकर, मंदार महाराज देव आदी चिंचवड : महासाधु श्री. मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे सामाजिक योगदानाबद्दल बांधकाम व्यवसायिक राजेंद्र सोपान पवार यांना यंदाच्या श्री मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, डॉ. एकनाथ खेडेकर नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, हभप.आनंद तांबे, अपर्णा डोके, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, ऑस्टिन ग्रुपचे व्यवस्थापकिय संचालक राजू भिसे, गजानन चिंचवडे, विजय पवार, अमोल राऊत, ज्ञानेश्वर पारखे, पांडुरंग नवले, सुनिल जोशी, दिपक नवले, संतोष साठे, हभप. उत्तमराव ब...
लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर यांच्यातर्फे कोविडमुळे पतीचे छत्र हरवलेल्या भगिनिस शिष्यवृत्ती प्रदान
सामाजिक

लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर यांच्यातर्फे कोविडमुळे पतीचे छत्र हरवलेल्या भगिनिस शिष्यवृत्ती प्रदान

पिंपरी : कोविडमुळे पतीचे छत्र हरवलेल्या पल्लवी मिलन कुमार चौधरी या भगिनीस, तिच्या पाल्याच्या पुढील शिक्षणासाठी लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर यांच्याकडून तीस हजार रूपयांचा शैक्षणिक शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. पिंपळे गुरव येथे गुरुवारी (ता. २३ डिसेंबर) उद्योजक व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांचे हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. त्याप्रसंगी नगरसेवक संदीप कस्पटे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, लेवा भ्रातृमंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, कार्याध्यक्ष कृष्णाजी खडसे, कार्याध्यक्ष अशोक भंगाळे व चिटणीस निर्मळ गाजरे आणि इतर सभासद उपस्थित होते. त्यावेळी शंकरशेठ जगताप यांचा सत्कार लेवा भ्रातृमंडळाचे अध्यक्ष श्री पिंपळे यांनी केला. नगरसेवक संदीप कस्पटे यांचा सत्कार श्री भंगाळे यांनी केला. तर सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांचा सत्कार श्री पिंपळे यांनी केला. ...
आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे-वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा – प्रा. दिपक जाधव
पिंपरी चिंचवड, सामाजिक

आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे-वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा – प्रा. दिपक जाधव

चिंचवड : आजच्या काळात आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे, वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा होत आहेत. असे मत प्रा. दिपक जाधव यांनी येथे व्यक्त केले. येथील मुंबई-पुणे महामार्गालगत पाथरवट समाजातील कुटुंबाना विप्ला फाउंडेशनच्या शिक्षक दाम्पत्याने किराणा किट वाटप केले. त्यावेळी प्रा. जाधव बोलत होते. संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण कदम, प्रकल्प प्रमुख जैद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रा. दिपक जाधव आणि प्रा. वैशाली गायकवाड या शिक्षक दाम्पत्याने छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या स्वयंपाक घरातील पाटा, वरवंटा, खलबत्ता आदी साधने बनवणाऱ्या येथील पाथरवट समाजातील कुटुंबाना ४० किराणा किट वितरित केले. प्रा. जाधव म्हणाले की, "शहरात गेली २० वर्षे पाथरवट समाज पाटा, वरवंटा टिकवण्यासाठी फुटपाथवर छिन्नी हातोडीच्या घाव टाकून साधने बनावत आहे. जनतेने स्वयंपाक घरामध्ये एखादा पाटा, वरवंटा खरेद...