सामाजिक

पिंपळे सौदागरमध्ये मोफत सांधेदुखी उपचार व नशामुक्ती शिबिराचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमध्ये मोफत सांधेदुखी उपचार व नशामुक्ती शिबिराचे उद्घाटन

उन्नती सोशल फाऊंडेशन आणि ब्रम्हचैतन्य क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन पिंपरी : उन्नती सोशल फाऊंडेशन आणि ब्रम्हचैतन्य क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथे मोफत सांधेदुखी उपचार व नशामुक्ती शिबिराचे उदघाटन आज करण्यात आले. १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर असे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ब्रम्हचैतन्य क्लिनिकचे डॉ. ओंकार बाबेल, राजस्थान औषधालयाचे महेश लोखंडे, श्री संजय भिसे व्हा. चेअरमन यशदा रिअलिटी ग्रुप, श्री रमेश वाणी, डॉ सुभाषचंद्र पवार, श्री अशोक वारकर या मान्यवरांसह पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये पाठदुखी, कंबर दुखी,गुडघे, मान, हाता-पायाचे सांधे याची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर...
करोना नियम पाळत पिंपरीत छठ पुजा कार्यक्रम उत्साहात | माँ होलकीदेवी प्रतिष्ठानतर्फे मोफत सेनिटायझर व मास्क वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

करोना नियम पाळत पिंपरीत छठ पुजा कार्यक्रम उत्साहात | माँ होलकीदेवी प्रतिष्ठानतर्फे मोफत सेनिटायझर व मास्क वाटप

https://youtu.be/CQHTLAKSQvc पिंपरी : माँ होलकीदेवी प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही झुलेलाल घाट येथे उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र सण असलेल्या छठ पूजा कार्यक्रमाचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माँ होलकीदेवी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सेनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा करण्यात आली होती. त्याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी अर्जुन गुप्ता, माँ होलकीदेवी प्रतिष्ठानचे संस्थापक सुखलाल भारती, अध्यक्षा ज्योती भारती, कार्याध्यक्ष व भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा महामंत्री आकाश भारती, सचिव अनिल लखन, सहसचिव राजेश वडगुजर, हिशोबनीस रामकृष्ण वाढणे, सल्लागार सोहन शहानी व राजकुमार डेंगळे, स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, प्रमोद राम, पारस कुशवाह, प्रबोधनकार शारदा मुंढे, सुनिता यादव यांच्यासह...
श्री फाउंडेशन आणि श्री वेदिका महिला बचत गट यांच्यातर्फे वंचितांना दिवाळी फराळ वाटप
सामाजिक

श्री फाउंडेशन आणि श्री वेदिका महिला बचत गट यांच्यातर्फे वंचितांना दिवाळी फराळ वाटप

लोकमराठी न्यूज नेटवर्क : सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र, या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकातील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी. यानिमित्त श्री फॉउंडेशन आणि श्री वेदिका महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने फिरस्ते, वंचित निराधार लोक व त्यांचे कुटुंबीय यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली. ज्या समाजात आपण राहतो, वावरतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. या उद्देशाने रस्त्याच्या कडेला उघड्यावर झोपणारे व घर करून रहाणाऱ्या वंचिताच्या घरात दिवाळी साजरी व्हावी, म्हणून त्या लोकांना दिवाळी फराळचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. चिंचवडगाव, जकातनाका, एसकेएफ रोड, आकुर्डी खंडोबा माळ चौक, निगडी उड्डाणपुल याठिकाणी जाऊन १६० पाकीट फराळ वितरित करण्यात आले. या प्रसंगी श्री फॉउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सुशां...
कु. प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवारातर्फे गरजूंना मिठाई व फटाके वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

कु. प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवारातर्फे गरजूंना मिठाई व फटाके वाटप

रहाटणी : दिवाळी हा रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. फटाके फोडून मोठ्या उल्हासात हा सण साजरा केला जातो. मात्र, समाजात अनेक कुटूंबांना हलाखीच्या परिस्थितीमुळे हा सण साजरा करता येत नाही. अशा काळेवाडी-रहाटणी परिसरातील गरजू मुलांना प्रसाद निवृत्ती नखाते मित्र परिवाराच्या वतीने मिठाई, फराळ व फटाके वाटप करण्यात आले. त्यामुळे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. कोरोना महामारीमुळे अनेकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. तर अनेक नागरिकांचे हातावरचे पोट असते. या अनुषंगाने आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून प्रसाद नखाते मित्र परिवाराच्या वतीने गरजू मुलांना शोधून त्यांना मिठाई, फराळ, फटाके देऊन या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला. दरम्यान, प्रसाद नखाते मित्र परिवाराने कोरोना काळात समाजासाठी मोठे योगदान दिले. अनेक गरजूंना आवश्यक ...
उन्नती सोशल फाउंडेशनची दिवाळी अनाथ-गतिमंद मुलांबरोबर
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उन्नती सोशल फाउंडेशनची दिवाळी अनाथ-गतिमंद मुलांबरोबर

पिंपरी : दिवाळी म्हणजे अंधकार नष्ट करत प्रकाशमय वातावरण निर्माण करणारा सण. या सणात प्रत्येक जण जीवनातील दु:ख दुर करून आनंदाचा अनुभव घेत असतो. याच अनुषंगाने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनने बावधनमधील अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुला-मुलींचे अनाथाश्रमात दिवाळी साजरी केली. तेथील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत फाउंडेशनने त्यांना मिठाई, कपडे व आवश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, सप्तर्षी फाउंडेशनचे मनोजकुमार बोरसे, विशाल पवार, अतुल पाटील, अनिकेत सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका कल्पना वरपे, आनंद हास्य क्लबचे प्रमुख सेवक राजेंद्र जयस्वाल, निर्मला कासार, विमल पुजारी, सुनिता जयस्वाल, शोभा देवरे, राजमनी पुजारी, जयश्री भोसले, संजय डांगे आदी उपस्थित होते. यावेळी मुलांकड...
पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन

पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या वतीने आणि उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीर गुरूवारी (ता. २१) आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबीर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात येते. या शिबिरात मागील २० लाभार्थी आणि नवीन ५० लाभार्थी, असे एकूण ७० लाभार्थ्यांची तपासणी होणार असून हि संख्या उत्तरोत्तर वाढविण्यात येणार आहे. कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांनी दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेऊन विशेष मुलांसाठी होमिओपॅथी उपचार पद्धत विकसित केली आहे. त्यांनी आजवर लाखो मुलांना निस्वार्थपणे मोफत उपचार दिले आहेत. सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी हि संस्था गेली अनेक वर्षे दिव्यांग मुलांच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने काम करीत आहे. आजपर्यंत “सप्तर्षी समग्र दिव्यांग सेवा केंद्रातून हजारो...
चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात धम्मचक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा
सामाजिक

चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात धम्मचक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा

चिंचवड : प्रबुद्ध संघ चिंचवडगाव येथे प्रबुद्ध संघाच्या वतीने ६५ वा धम्म चक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला सभासदांच्या हस्ते पंचशील ध्वज रोहन करण्यात आला. त्यानंतर सामुदायिक पंचशील घेण्यात आले. त्यावेळी डॉ. धर्मेंद्र रामटेके, अल्पणा गोडबोले, अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव किशन बलखंडे यांनी केले. ...
गरजू मुलींच्या रूपातील नवदुर्गांना घेतले दत्तक | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा स्तुत्य उपक्रम
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड, सामाजिक

गरजू मुलींच्या रूपातील नवदुर्गांना घेतले दत्तक | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा स्तुत्य उपक्रम

https://youtu.be/bK_BoLDHkUg पिंपळे सौदागर : समाजातील अनेक मुली घरची आर्थिक परिस्थिती गरिब असल्याने शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांची स्वप्ने लहानपणीच विरून जातात. मात्र, समाजातील अशा नऊ मुलींचा सर्व शैक्षणिक खर्च उचलत त्यांच्या रूपात नवदुर्गांना पाहात उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी त्यांना दत्तक घेतले आहे. विजयादशमीच्या निमिताने या नवदुर्गांचे पुजन करून त्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे व आवश्यक वस्तू देण्यात आल्या. पिंपरी सौदागर येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी रमेश वाणी, आर. के. पाटील, सखाराम ढाकणे, राजू भिसे, अजिंक्य भिसे समाजसेविका शारदा मुंढे, अशोक वारकर, दिलीप नेमाडे, उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलेल्या या मुलीत अनेक मुली अनाथ, गतीमंद आहेत. तर ...
खडकी सदार गाव तीन दिवसापासून संपर्काबाहेर; गावालगतच्या नाल्याला पुर
सामाजिक

खडकी सदार गाव तीन दिवसापासून संपर्काबाहेर; गावालगतच्या नाल्याला पुर

रिसोड: प्रतिनिधी शंकर सदार/ तालुक्यातील गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या संतधार पावसामुळे खडकी सदार गावच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे गावातील शाळा बंद असून, रुग्णांनाही उपचाराअभावी त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. गावाच्या नाल्यावरील पुलाचा प्रश्न गंभीर आहे. मात्र या प्रश्नाकडे लक्ष दिल्या जात नाही. त्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रिसोड तालुक्यातील खडकी सदार हे गाव साधारण १८०० ते २००० लोकसंख्येचे गाव आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता हा नाल्यावरुन जातो. गत तीन दिवसापासून सुरु असलेल्या संतधार पावसाने बुधवार (दि.२१) मध्यरात्रीपासून पुर आला आहे. तो अजून कायम आहे. मुख्य रहदारीचा रस्ता बंद झाल्यामुळे गावाचा इतरांशी असलेला संपर्क तुटला आहे. नाल्याला आलेल्या पुरामुळे रुग्णांना गावाबाहेर जाणे शक्य नाही. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वे...
मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश
पिंपरी चिंचवड, सामाजिक

मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश

पिंपरी : मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हिताय सोशल फाउंडेशन संस्थेच्या सामाजिक बंधुत्वाचा प्रत्यय खराळवाडी - गांधीनगर येथे आला. मानवता हिताय या संस्थेच्या या उपक्रमाचे समाजात कौतुक होत आहे. https://youtu.be/_-oMy2SAAeA त्यावेळी मानवता हिताय संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, तसलीम शेख, कासीमभाई शेख, अब्दुलभाई शेख, इमरान शेख (गुड्डू), सैफी आलम, मोहम्मद आमीर, नामदेव (आबा) जाधव आदी उपस्थित होते. गणेशोत्सवनिमित्त मानवता हितायने हा एक सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला असून समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, मानवता हिताय संस्थेतर्फे गणेशोत्सवानिमित्त सलग दहा दिवस गरजू, गरीब व दिव्यांगांना धान्यकिट वाटप करण्याचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. असे मानवता हिताय संस्थे...