
लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : डिलक्स चौकात रस्ता दुभाजक नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. तसेच अनेकदा येथे छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे या ठिकाणी रस्ता दुभाजक बसविण्यात यावा, अशी मागणी अपना वतन संघटनेचे शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की डिलक्स चौकात काळेवाडी, रहाटणी, पिंपरीगाव येथून पिंपरी आंबेडकर चौक, भाटनगर, मोरवाडीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीचा मार्गक्रम आहे. पिंपरी मार्केट जवळच असल्यामुळे येथे कायमच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, डिलक्स सिनेमागृहासमोर रस्ता दुभाजक नसल्याने वाहनचालक कशाही पद्धतीने वाहने चालवतात. त्यामुळे कायमच कोंडी होत असते.
तसेच येथील अंजली मेडीकल व दवाखान्यासमोर रस्त्याच्या मधोमध पथदिव्याचा खांब असून त्याला जोडूनच रस्तादुभाजक कराची चौकापर्यंत बनवलेला आहे. त्यामुळे डिलक्स चौकातून तलाठी कार्यालय व गुरुद्वारा मार्गाकडे जाता येत नसल्याने नागरिक विरुद्ध दिशेने वाहने नेतात. त्यामुळे येथे सतत लहान-मोठे अपघात नेहमीचेच झाले आहेत. म्हणून येथे नियोजन करून रस्ता दुभाजक बसवावा व वाहतूक विभागाकडून लवकरात लवकर ना हरकत दाखला प्राप्त करून पुढील कारवाई आणि वाहतुकीस अडथळा होणारी अतिक्रमणे सुद्धा काढून टाकण्यात यावीत.
- SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के
- J&K : पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या वतीने निषेध
- PCMC : आरोग्य व वैद्यकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा द्या
- शिवजयंतीनिमित्त फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबची अतिशय दुर्गम भागातील भैरवगड व घनचक्कर गडावर यशस्वी चढाई
- HOLI : होळी करा लहान; पोळी करा दान। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
