महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

लोकमराठी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ व हिरकणी महिला संघाने आयोजित केलेला २८ वा वर्धापन दिन, स्नेहमेळावा व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ समाज बांधवांच्या भव्यदिव्य उपस्थितीत पार पडला. दिघी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती समाजसेवा संघाचे मुख्य प्रवर्तक सुभाष पवार, अनिल मोरे, सुनील साळुंखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गणेशपूजन करण्यात आले. यावेळी संघाचे जेष्ठ मार्गदर्शक शिवाजी सोनाटे, शांताराम बापू पवार, रमेश साळुंखे, रमेश सपकाळ, सहदेव भोसले, शिवाजी निकम, मधुकर पार्टे, माजी अध्यक्ष संतोष चिकणे व सर्व विभागीय सदस्य, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून निगडी येथील भक्ती-शक्ती येथे स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण करण्यात येते. तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखीमध्ये दरवर्षी यथाशक्तीने होईल, असे योगदान गेल्या अनेक वर्षापासून ही संघटना करत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अविनाश उतेकर यांची निवड करण्यात आली. हिरकणी महिला संघाची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहिर करण्यात आली. अध्यक्षापदी सुवर्णा सोनाटे, सेक्रेटरीपदी नीलिमा चव्हाण, उपाध्यक्षापदी नीता मोरे, कार्याध्यक्षपदी सुनीता उतेकर, खजिनदारपदी मृणाल सोनगरे यांची निवड झाली.

यावेळी हभप अंनत महाराज मोरे, सुभाष पवार, अध्यक्ष अविनाश उतेकर व महिलाध्यक्षा सुवर्णा सोनाटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार भरत गोगावले व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे अपरिहार्य कारणामुळे उपस्तिथ राहू न शकल्याने त्यांनी फोन वरून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

मेळावा यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष सुनीलतात्या पालकर, खजिनदार रवींद्र चव्हाण, हिशोब तपासणी सुरेश कदम, कार्यकारणी सदस्य शशिकांत जाधव, निलेश मोरे व विभागीय सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेक्रेटरी दिनकर जाधव यांनी केले, तर संघाचे उपाध्यक्ष सचिन साळुंखे यांनी आभार मानले.

Actions

Selected media actions