निर्भया फाउंडेशनतर्फे भटक्या प्राण्यांसाठी रूग्णवाहिका व निवारा

निर्भया फाउंडेशनतर्फे भटक्या प्राण्यांसाठी रूग्णवाहिका व निवारा

लोकमराठी न्यूज नटवर्क

पिंपरी : रहाटणी येथील निर्भया फाउंडेशनच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे भटके व पाळीव प्राण्यांसाठी निवारा आणि प्राणी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्राणी निवारा शेडचे उद्धाटन आणि रूग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच महापालिका शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपळे सौदागर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शितल मुकणे, कंपेशन फॉर ऑलच्या अध्यक्षा पुनीता खन्ना, अनिकेत मेमाणे, महाराष्ट्र प्राणी वेलफर असोसिएशनच्या सल्लागार नेहा पंचमिया, डॉ. प्रशांत चेन्नई, कोकणे चौक ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक शरद कोकणे, निर्भया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उल्हास कोकणे आदी उपस्थित होते.

राहुल कलाटे म्हणाले की, “आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो. तशीच प्राण्यांचीही घेतली पाहिजेत. भुतदया म्हणून निर्भया फाउंडेशनने जो उपक्रम राबविण्यात आला आहे, तो अतिशय स्तुत्य आहे.”

या संदर्भात माहिती देताना उल्हास कोकणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच पाळीव व भटक्या प्राण्यांसाठी रूग्णवाहिका उपलब्ध केलेली आहे. तसेच भटके प्राणी जखमी असल्याची नागरिकांकडून माहिती मिळाल्यास संस्थेतर्फे प्राण्यांवर मोफत उपचार केले जातील, तसेच रेबीज सारखे लसीकरण किंवा निर्बीजीकरण केले जाईल.

निर्भया फाउंडेशनतर्फे भटक्या प्राण्यांसाठी रूग्णवाहिका व निवारा