पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पोलीस (PCPC) रेकॉर्ड वरील एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड अंमली विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्हेगाराकडुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ०१ जीवंत काडतुस पथकाने जप्त केले आहे. या गुन्हेगारावर १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन तडीपारीची कारवाई देखील त्याच्यावर करण्यात आली आहे.
विशाल शहाजी कसबे असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आधिकारी यांच्या सुचना प्रमाणे अंमली विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवार (ता.७) रोजी पेट्रोलींग करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार संदिप पाटील व अशोक गारगोटे यांना माहीती मिळाली की, पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार विशाल कसबे हा वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळाखडक येथील पाण्याच्या टाकी जवळ थांबलेला असुन त्याच्या जवळ पिस्टल आहे. मिळालेली माहिती अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना दिली. त्यांच्या सुचना प्रमाणे सराईत गुन्हेगार विशाल कसबे याला पकडण्यासाठी पथक रवाना झाले. मोठ्या शिताफिने विशाल कसबे याला पथकाने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे ०१ पिस्टल आणि ०१ जीवंत काडतुस असा एकुण ५० हजार ५०० रुपयांचा माल मिळुन आला. पोलीसांनी तो माल जप्त केला असुन त्याला अटक केले आहे. वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हेगार विशाल कसबे याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विशाल कसबे हा वाकड पोलीस (Wakad Police) स्टेशन चे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, दंगली असे एकुण १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, उप-निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडीक, पोलीस हवालदार संदिप पाटील, प्रदिप शेलार, अशोक गारगोटे, मितेश यादव, रणधीर माने, सदानंद रुद्राक्ष, संतोष भालेराव यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.