चिंचवड, ता. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात भिडे यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विनिता तिवारी, रोहित भाट, कुंदन कसबे, विक्रांत सानप, जिफिन जॉन्सन, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, सुभाष भुसने, सुमित सुतार व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. आता तरी त्यांनी वादग्रस्त व चुकीच्या वक्तव्याची मालिकाच सुरू केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्याबद्दल नुकतेच भिडे बरळले. त्यावरून राज्यभर त्यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले असून त्यांच्या विरोधात ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसही भिडेेच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला असून युवकांनी भिडेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलीसांना निवेदनही देण्यात आले आहे.