महात्मा ज्योतिराव फुले यांना आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन
पिंपरी : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी आम आदमी पार्टीचे सहसंघटक वहाब शेख, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार, वैजनाथ शिरसाट, यशवंत कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
शहरकोअर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट बोलताना म्हणाले की, "सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखली पाहिजेत ...