Tag: Camil parkhe

असा असतो ख्रिश्चन धर्मीयांचा बैल पोळा सण 
विशेष लेख

असा असतो ख्रिश्चन धर्मीयांचा बैल पोळा सण

कामिल पारखे श्रीरामपूरला आमच्या आजूबाजूला साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी काही सण आमच्याही घरात साजरे व्हायचे, बैलपोळा हा त्यापैकी एक. या सणाच्या काही दिवस आधीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानापाशी असलेल्या मेनरोडला मातीपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बैलांच्या जोड्या विक्रीला ठेवलेल्या असत. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी यापैकी मग पांढऱ्या, उंचच उंच खिलारी बैलांची एक जोडी घरात यायची. त्या बैलांची आमच्या घरात पूजा होत नसायची, मात्र दिवसभर मग या बैलजोड्यांशी माझा खेळ चालायचा. https://youtu.be/2uGPVWDy1pU बैलपोळा संपल्यानंतर अनेक दिवस या बैलजोड्या भिंतीवरच्या फळ्यांवर असायच्या, झावळ्यांचा रविवारी (Palm Sunday) घरी आणलेल्या झावळ्या अनेक दिवस अल्तारापाशी असायच्या, अगदी तसेच. काही दिवसांनी शिंगे मोडलेली किंवा एखादा पाय मोडलेल्या बैलांच्या जोड्या मग आम्हा ...
नेते, कार्यकर्ते व पैसा नसतानाही इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान बनल्या
विशेष लेख, मोठी बातमी, राजकारण

नेते, कार्यकर्ते व पैसा नसतानाही इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान बनल्या

लोकमराठी न्यूज नेटवर्क : पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीत लोकांच्या मुलभूत अधिकारांवरच गदा आली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारून पराभव झाला. मात्र, त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेते सोडून गेलेले असताना पुरेसे कार्यकर्ते व पैसा नसतानाही त्या पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. याचा अनुभव ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांनी सांगितला. https://youtu.be/KOZTDLxle4w हे ही वाचा 👇 नथुराम आणि गांधीजी पंधरा वर्षांनंतर महाराष्ट्राने निवडला मुस्लीम खासदार जोश्यांनीं कधी हातात नांगर धरलाय का? दोष धर्मांधतेचा ...
ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र आठवडा- गुड फ्रायडेला येशू ख्रिस्ताचे क्रुसावर मरण आणि ईस्टरला पुनरुज्जीवन
विशेष लेख

ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र आठवडा- गुड फ्रायडेला येशू ख्रिस्ताचे क्रुसावर मरण आणि ईस्टरला पुनरुज्जीवन

कामिल पारखे उपवासकाळ म्हटले कि हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या. या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवाराने किंवा अँश वेन्सडे या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आधल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हल सुरुवात होते आणि या उत्सवाची भस्म बुधवाराच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्था...
नथुराम आणि गांधीजी
विशेष लेख

नथुराम आणि गांधीजी

कामिल पारखे पणजी येथे धेम्पे कॉलेजात माझे पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले आणि माझा मुख्य विषय होता तत्त्वज्ञान. त्यात एक वर्षी फिलॉसॉफी ऑफ रिलीजन म्हणजे चक्क 'विविध धर्मांचे तत्त्वज्ञान" हा एक विषय होता. श्रीरामपूरला दहावीपर्यंत मराठी भाषेत शिकून येसुसंघिय किंवा जेसुईट फादर होण्यासाठी सत्तरच्या दशकात मी गोव्यात आलो होतो. कौटुंबिक पार्श्वभूमी काथोलिक धार्मिक अशी होती नाही तर जीवनभर संन्याशी धर्मगुरु होण्याचा कुणी विचारही केला नसता. तत्त्वज्ञान हा विषय घेण्याचे एक कारण म्हणजे धर्मगुरु होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तत्वज्ञान आणि ईशज्ञान ( थिऑलोजी ) या विषयांचा अभ्यास करावा लागतोच, नाहीतर फॉर्मेशन टप्प्यालाच गच्छंती होते. धर्मगुरु होण्यासाठी किमान तेव्हढी बौद्धिक पातळी आवश्यक आहे असे जेसुईट संस्था मानते. तर या कॉलेज ज...
“वासुदेव आला, ओ वासुदेव आला…” च्या निमित्ताने …….
विशेष लेख

“वासुदेव आला, ओ वासुदेव आला…” च्या निमित्ताने …….

कामिल पारखे एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत तमाशाप्रधान चित्रपटांची लाट आली होती. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटाचा नायक असलेला आदर्श शिक्षक गावात आलेला तमाशाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. डॉ. श्रीराम लागू यांनी साकारलेला हा शाळामास्तर तमाशाशौकिनांच्या विरोधाची फिकिर न करता आपल्या नैतिक बळावर एकट्याने तमाशाचा रंगात आलेला खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. मुळात तमाशा हा एक अनैतिक प्रकार आहे आणि आपल्या गावच्या लोकांना त्यापासून दूर ठेवणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे, या समजापोटी हे मास्तर तमाशा बंद पाडण्याची धडपड करत असतात. तमाशातील नर्तकीच्या प्रेमात पडून या मास्तरांचे नंतर नैतिक अध:पतन होते, ही गोष्ट निराळी. मात्र तमाशाविषयी समाजात काय प्रतिमा होती, हे ‘पिंजरा’तील आदर्श मास्तरांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोप फ्रान्सिस भेट
विशेष लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोप फ्रान्सिस भेट

कामिल पारखे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोमला असताना थोडी वाकडी वाट करुन व्हॅटिकन सिटीला जाऊन पोप फ्रान्सिस यांना जाऊन भेटले. या घटनेला एकदम दुर्लक्षित करता येणार नाही. या भेटीत मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचेही आमंत्रण दिले आहे. विमानसेवा सुरु झाल्यावर जगभ्रमंतीवर निघणारे आणि इस्राएलच्या पवित्र भूमीला भेट देणारे पॉल सहावे हे पहिलेच पोप. पोप जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीमध्ये विविध राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटण्याचा विक्रम केला, त्याची तुलना केवळ ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्याशीच करता येईल. पोप फ्रान्सिस हे पोप जॉन पॉल दुसरे त्यांच्यासारखेच हटके आणि यात्रेकरु (पिलग्रिम) पोप आहेत. ख्रिस्ती अगदी नाममात्र संख्येने असलेल्या आशियातील म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका येथे पोप फ्रान्सिस यांचे लाल गालिच्यावर स्वागत ह...
आमच्यात या प्रथा नसतात !
विशेष लेख

आमच्यात या प्रथा नसतात !

कामिल पारखे प्रसूतिगृहातून बायकोला आणि आमच्या कुटुंबात नव्याने आलेल्या माझ्या मुलीला घरी नेण्याची वेळ झाली होती. माझी आई आणि बायको सामानाची आवराआवर करायला लागल्या आणि प्रसूतिगृहातील त्या दोन स्वच्छता कामगार महिलांनी आपल्या बक्षिसाची मागणी केली. आठ दिवस तिथे वावरल्याने मी तशी त्यांना काही रक्कम देण्याची मानसिक तयारी केली होतीच. मात्र खिशातून मी पैसे काढण्याआधीच त्यांनी बाळाच्या पाळण्यात नारळ ठेवण्याची मागणी केली आणि मी चमकलो. ''आम्ही तसली काही परंपरा पाळत नाही. तुम्हाला बक्षिस देण्यात मला काही अडचण नाही,'' मी म्हटले. नारळाच्या मागणीवर मात्र त्या दोघी महिला ठाम होत्या. '' घरी जाताना बाळाचा पाळणा असा रिकामा ठेवायचा नसतो, पाळण्यात नारळ हवाच!" असे त्यांचे म्हणणे होते. माझ्या आईच्या कानावर हे गेले तेव्हा 'कामिल, शेजारच्या दुकानात जा आणि पटकन नारळ घेऊन ये ! असे...
‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर
विशेष लेख

‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर

कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्व शैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी - दादांशी - बोलू लागले. बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, "पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?” माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये ‘पारखे...
‘को वाडीस?’ व्हॅटिकन सिटी आणि सेंट पिटर्स स्केअरकडे !
विशेष लेख

‘को वाडीस?’ व्हॅटिकन सिटी आणि सेंट पिटर्स स्केअरकडे !

कामिल पारखे बायबलमध्ये एक कथा आहे. येशू ख्रिस्त आपल्या खांद्यावर क्रूस घेऊन जातो आहे आणि त्यावेळेस आपल्या होणाऱ्या छळापासून सुटका घेण्यासाठी रोममधून पळ काढणाऱ्या सेंट पिटरची त्याची गाठ पडते. रोमकडे निघालेल्या आपल्या प्रभूला पाहून पिटर थक्क होतो. ''दोमिनी, को वाडीस ?'' 'प्रभूं, तू कुठे चाललास ? असे तो विचारतो. ''मी पुन्हा एकदा क्रुसावर मरायला निघालो आहे!'' येशू आपल्या सर्वात लाडक्या शिष्याला सांगतो आणि सेंट पिटरला आपली चूक समजते. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांची रोममध्ये होणाऱ्या छळाची पर्वा न करता तो माघारी वळतो आणि रोमन साम्राज्याच्या या राजधानीत तो हौतात्म्य कवटाळतो. लॅटिन भाषेतील 'को वाडीस' (कुठे निघालास?) हा वाक्प्रचार त्यातील गर्भित आशयामुळे अनेक भाषांत रुढ झाला आहे. (बायबलम...
बाळासाहेब गायकवाड – ख्रिस्ती समाजातील एक घोंघावलेले वादळ
विशेष लेख

बाळासाहेब गायकवाड – ख्रिस्ती समाजातील एक घोंघावलेले वादळ

कामिल पारखे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्वचितच सार्वजनिक व्यासपीठावर हजेरी लावत असत. निवडणुकीच्या काळातच फक्त त्यांच्या मुंबईबाहेर प्रचारसभा होत असत. मात्र, अहमदनगर येथे १३ नोव्हेंबर १९९२ रोजी होणारी ती जाहीर सभा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी ठरली. अहमदनगरच्या त्यादिवशीच्या घडामोडींची बातमी देण्यासाठी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांनी आपल्या मुख्यालयातून बातमीदार पाठवले होते. याचे कारण म्हणजे गेले अनेक दिवस विविध कारणांनी प्रकाशझोतात असलेले ख्रिस्ती कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड हे त्यादिवशी ठाकरे यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करणार होते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजजीवनात या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली होती. तसे पाहिले तर महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती समाजघटक अगदीच नगण्य आहे, या घटकाच्या अस्तित्वाची आजच्या घडीलाही अनेकांना जाणीवही नाही. संघटीत नसल्याने हा समाज ...