Tag: Hadapsar

एस.एम. जोशी महाविद्यालयात ऑनलाईन तंबाखू विरोधी दिन साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी महाविद्यालयात ऑनलाईन तंबाखू विरोधी दिन साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : हडपसर येथील एस.एम. जोशी महाविद्यालयात अँटी रॅगिंग विद्यार्थी तक्रार निवारण माहिती अधिकार समिती, समुपदेशन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने ऑनलाईन तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दंत व शल्यचिकित्सक औंध रुग्णालयातील डॉक्टर सुहासिनी घाणेकर उपस्थित होत्या. त्यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी आपल्या खास शैलीत घोषवाक्याद्वारे तंबाखूविरोधी जनजागृती करणाऱ्या घोषणा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी तंबाखूविरोधी शपथ ग्रहण केली. उपप्राचार्य डॉ.संजय जगताप यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख पाहुण्यांचे स्...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये “मिशन युवा स्वास्थ्य कोविड-१९ मोफत लसीकरण अभियान” संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये “मिशन युवा स्वास्थ्य कोविड-१९ मोफत लसीकरण अभियान” संपन्न

हडपसर (प्रतिनिधी - डॉ. अतुल चौरे) : प्रत्येकाने वेळेवर लस घेतली पाहिजे. लस घेतल्यानंतरही काळजी घ्या. यापुढे आपणास covid-19 बरोबर आयुष्य जगावे लागणार आहे. जगातील काही देशांमध्ये तिसरी लाट आली आहे. आपणही दिवाळीचा आनंद घेताना पथ्ये पाळायला पाहिजेत. गर्दी न करता दिवाळी सणाचा आनंद घ्यायला पाहिजे. फटाके विरहीत दिवाळी साजरी करावी. प्रदूषणमुक्त दिवाळीचा उत्सव साजरा करून आनंदी जीवन जगावे. असे विचार रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख व आमदार चेतनदादा तुपे साहेब यांनी मांडले. ते एस .एम. जोशी कॉलेजमध्ये बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन. सी. सी.विभाग, हेल्थ केअर सेंटर व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने "मिशन युवा स्वास्थ्य covid-19 मोफत लसीकरण अभियानाच्या" उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

हडपसर, (प्रतिनिधी) : ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केल्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांशी आपली चर्चा होते. ऊर्जा व त्याचे जतन करण्यासाठी लागणाऱ्या उपकरनाबाबत जागृती होणे गरजेचे आहे. ऊर्जेचे संवर्धन झाले पाहिजे. ती काळाची गरज आहे. असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक सायन्स व आय. क्यू.ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण कोरियाचे डॉ. यंग पाक ली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरतचे डॉ. निशाद ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिक्षक दिन समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिक्षक दिन समारंभ संपन्न

पुणे : प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असते. शिक्षक पिढी घडवण्याचे कार्य करतात. शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. आज काळ बदलला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात वयापेक्षा ज्ञानाला महत्त्व आले आहे. प्रत्येक शिक्षकाने काळाबरोबर बदलले पाहिजे. आपल्या जीवनात गतिशीलता आणली पाहिजे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करूया, पण त्याचबरोबर सर्व शिक्षकांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी सर्व प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. एस. बी. जगताप यांनी केले. या कार्यक्रमात उ...