‘तर्कटपंजरी’ : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक
जगदीश काबरे
हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की हे जग अस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्याचप्रमाणे या अस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते. स्त्री म्हणजे पापयोनी समजणारे नास्तिक म्हणजे दुर्जन समजत असतात. पण मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात स्त्रियांनी शेतीचा शोध लावून माणसाच्या सामाजिक प्रगतीचा मार्ग खुला केला त्याचप्रमाणे चार्वकांनी देव आणि पारलौकिता नाकारून वैदिक धर्माला आव्हान दिले आणि वैज्ञानिक प्रगतीचा पाया घातला. पण माणसाला अज्ञाताची भीती असल्यामुळे कुठल्यातरी फसव्या का होईना पण आधाराची गरज लागते. ती गरज सहजपणे देवाची संकल्पना पूर्ण करते. म्हणून त्याला माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 'देवाची करणी आणि नारळात पाणी' या पद्धतीचे स्वीकारणे सोयीचे जाते. माणसाला विचार करण्याचा आळस असतो. तसेच तो ...