Tag: Kalewadi Issues

काळेवाडीत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण | विवेक तापकीर यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

काळेवाडीत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण | विवेक तापकीर यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

काळेवाडी : तापकीर नगरमधील साई मल्हार कॉलनीत महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी. अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष व काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साई मल्हार कॅालनीमधील डांबरीकरण अनेक वर्षापासून प्रलंबित होते. मात्र, आता महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले डांबरीकरण फक्त सुशोभिकरणासाठी केले आहे, असे दिसून येत आहे. सदर डांबरीकरण आयुक्तांनी स्वतः जातीने उपस्थित राहत पाहणी करून याचा दर्जा पाहून पुढील कार्यवाही करावी. तसेच अनेक ठिकाणी पॅचेस आहेत, माल कमी पडला म्हणून मोठी डांबरखडी न हातरता, लहान खडीचे डांबरीकरण...
काळेवाडी मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

काळेवाडी मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी

काळेवाडी : मागील सात वर्षांपासून लकी बेकरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (एमएम चौक) हा काळेवाडी मुख्य रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी लवकरात लवकर काँक्रीटीकरण करावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर व इरफान शेख यांनी केली आहे. मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या पिंपरी ते वाकड, हिंजवडी, ताथवडे, थेरगाव, रहाटणी, चिंचवडगाव आदी उपनगरांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. मात्र, ड्रेनेज लाईन, स्टॉम वॉटर लाईन (पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहीनी), पदपथ या रस्त्यावर नाही. त्यामुळे असंख्य अडचणींचा सामाना नागरिकांना करावा लागतो. सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी ब प्रभागाच्या झोन अधिकारी सोनम देशमुख यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही काळेवाडीचे कायम स्वरुपी रहिवाशी असून नियमित शासकीय, निमशासकीय...
काळेवाडीतील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर | रहिवासी सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर | रहिवासी सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित

पिंपरी : काळेवाडीतील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या नित्याच्याच आहे. मात्र, विजयनगर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला असून अनेक सदनिकाधारक आपली सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. तर काहींनी सदनिका विकल्या असल्याची माहिती पुढे येत आहे. काळेवाडीतील विजयनगर परिसरात अनेक सोसायट्या असून या सोसायट्यांना महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यात कमी दाबाने व दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे या सोसायट्यांना टँकरशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. याबाबत महापालिकेला सांगूनही दखल घेतली जात नाही. परिणामी अनेक सदनिकाधारक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, काळेवाडीतील विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर कोकाणेनगर, जमा मस्जिद परिसरात देखील पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. परिसरात राहणारे ना...
काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : काळेवाडीतील विजयनगर परिसरात दिवसाआड व अपुऱ्या पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले असून काही भागात दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची पिण्याची पाण्याची गरज व आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत इरफान शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कायमस्वरूपी निवासी असून आम्ही नियमारित्या शासकीय, निमशासकीय कर भरत आहोत. तसेच मतदानाचा हक्क देखील बाजवितो. आपणास माहिती देऊ इच्छितो की, आम्ही आपणास मार्च महिन्यात दररोज पाणीपुरवठा करण्यासंबंधी विनंती अर्ज केले होते. तसेच नागरिकांना पाण्याची गरज वादळी आहे. मात्र, अद्याप कोणतेच ठोस निर्णय ना झाल्याने विजयनगर भागात राहणारे सदनिकाधार...
काळेवाडीत सांडपाणी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत सांडपाणी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

काळेवाडी : नढेनगरमधील ड्रेनेज लाईन तुंबल्याने नाल्यात सांडपाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. दरम्यान, परिसरात साफसफाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी केली आहे. याबाबत शेख यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. ड्रेनेज लाईनचे चेंबर फुटले असून त्यामध्ये माती जमा झाली आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबली असून नाल्यात पाणी साचले आहे. आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच याठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकली जाणार आहे. ...
KALEWADI : धोकादायक चेंबरची रॉयल फाउंडेशनतर्फे दुरूस्त
पिंपरी चिंचवड

KALEWADI : धोकादायक चेंबरची रॉयल फाउंडेशनतर्फे दुरूस्त

काळेवाडी : ज्योतिबानगरमधील ड्रेनेज चेंबरच्या भोवती तयार झालेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होत होती. तसेच दुर्गंधीही येत होती. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत रहदारीसही धोका निर्माण झाला होता. याची दखल घेत या धोकादायक चेंबरची रॉयल फाउंडेशनच्या पाठपुरावामुळे दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी रॉयल फाउंडेशनचे आभार मानले. मातृछाया कॉलनी व साई श्रद्धा कॉलनीतील प्रत्येकी दोन आणि जयहिंद कॉलनीतील एक अशा पाच चेंबरच्या भोवती साधारणपणे एक ते दीड फुट खोल खड्डे तयार झाले होते. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले. त्यामध्ये एकाचा पाय मोडला तर एकाची चारचाकी गाडी अडकली होती. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात होते. स्थानिक नागरिकांनी रॉयल फाउंडेशनकडे ही समस्या मांडल्यानंतर रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य...
काळेवाडीतील नंददीप कॉलनी रस्त्याची दुरावस्था
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील नंददीप कॉलनी रस्त्याची दुरावस्था

काळेवाडी : नढेनगर मधील नंददीप कॉलनी क्रमांक ४, हभप कै सिताराम बाळोबा नढे रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी केली आहे. काळेवाडीतील या रस्त्यावर मोठी रहदारी असते. अबालवृद्ध या रस्त्याने ये-जा करत असतात. रस्ता खराब झाला असल्याने पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिक हैराण झाले असून सतत डांबरीकरण करूनही रस्ता व्यवस्थित होत नाही. त्यामुळे महापालिकेने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. असे सामाजिक कार्यकर्ते शेख यांनी सांगितले. https://twitter.com/lokmarathi/status/1437666487150411779?s=19...
PCMC : काळेवाडीतील वैभव कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा
पिंपरी चिंचवड

PCMC : काळेवाडीतील वैभव कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा

काळेवाडी : विजय नगरमधील वैभव कॉलनी रस्ता खराब झाला असून साधारण मागील सात-आठ वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. अशी मागणी नागरिक करत आहेत. विजयनगर मधील सर्वात प्रथम वसलेली ही कॉलनी असून बऱ्याच वर्षापुर्वी कॉलनी रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर महापालिकेने येथील रस्त्याकडे दुर्लक्ष केले. या कॉलनीतच जैन मंदिर असल्याने अनेक वयोवृद्ध नागरिक येथे उपासनेसाठी येत असतात. मात्र, रस्ता खराब झाल्याने अनेक नागरिक पाय मुरगळून पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. असे सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी सांगितले. रहिवासी म्हणतात… "रस्ता खड्डेमय झाला असून पावसाळ्यात पाणी साचून चिखल होतो. डांबरीकरण चा...