Tag: Kalewadi

काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
पिंपरी चिंचवड, सामाजिक

काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पिंपरी : काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा या भावनेतून काळेवाडी भागातील सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांच्या मदतीने जमा झालेल्या जीवनावश्यक वस्तू हभप समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ पिंपरी चिंचवड या संस्थेचे संस्थापक सुभाष पवार, मनोहर भोसले रमेश साळुंके, सचिन साळुंके, अविनाश उत्तेकर, रवींद्र चव्हाण, नंदु जाधव, निलेश मोरे यांच्याकडे या वस्तू सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख दस्तगीर मणियार, शिवसेना उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, गणेश आहेर, सुनील विटकर, नेताजी नखाते, संतोष कुंभार, राजेंद्र भरणे, नरसिंग माने शाखा प्रमुख, सावता महापुरे शाखा प्रमुख, जितू वीटकर, अनिल पालांडे, सोमनाथ नळकांडे,...
नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश
पिंपरी चिंचवड

नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश

काळेवाडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना १५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे संस्थापक सुभाष पवार यांच्याकडे पाडाळे यांनी १५ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. दरम्यान, पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूची मदत या आधीच तातडीने पाठवण्यात आली होती. त्यावेळी नगरसेविका निता पाडाळे, विलास पाडाळे, गितेश दळवी, मनोहर भोसले, राजु पवार, संतोष चिकणे, अशोक पवार यांच्यासह महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
PCMC : काँक्रिटीकरणामुळे तापकीर नगरमधील रस्त्यांचे पालटले रूप
पिंपरी चिंचवड

PCMC : काँक्रिटीकरणामुळे तापकीर नगरमधील रस्त्यांचे पालटले रूप

नगरसेविका सुनिता तापकीर व राजदादा तापकीर यांच्या दूरदृष्टीतील टिकाऊ व खड्डेमुक्त रस्त्यांची प्रचिती काळेवाडी : प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीर नगर, ज्योतिबा नगर भागात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉकची काम पुर्ण झाली आहेत. प्रशस्त व मजबूत झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यात नगरसेविका सुनिता तापकीर व भाजप युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांनी विशेष परिश्रम घेतले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मध्ये याआधी रस्त्यांचे डांबरीकरण केले जात होते. परंतू, काही कालावधीनंतर व खोदाईच्या कामामुळे रस्ते खराब होत. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. महापालिकेला सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विविध कर देऊन चांगले रस्ते मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. हीच बाब लक्षात घेऊन टिकाऊ व ...
काळेवाडी गावठाण महापालिका शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू
पिंपरी चिंचवड, आरोग्य

काळेवाडी गावठाण महापालिका शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू

नगरसेविका निता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी : नागरिकांना सोईस्कर होईल याकरिता काळेवाडीत कोविड-१९ लसीकरण केंद्र आवश्यक होते. यासाठी नगरसेविका निता पाडाळे यांचा महापालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून महापालिकेच्या वतीने काळेवाडी गावठाण येथे महापालिकेच्या शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आले आहे. काळेवाडीतील या लसीकरण केद्रांत १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड-१९ लसीकरण करावे. जेणेकरून कोरोना या महामारीपासून आपले संरक्षण होईल. असे आवाहन नगरसेविका निता पाडाळे यांनी केले आहे. याबाबत नगरसेविका पाडाळे म्हणाल्या, काळेवाडीतील अनेक वयोवृद्ध नागरिक व महिला यांना इतर ठिकाणी लसीकरणासाठी जाण्यास अडचणी येत होत्या. त्यासाठी महापालिका आयुक्त व आरोग्य विभाग यांच्याकडे बऱ्यादा पत्रव्यवहार केला, तसेच 'ब' प...
काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर
पिंपरी चिंचवड

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर

पिंपरी चिंचवड : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघाची निवडनुक प्रक्रिया नुकतीच शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शहरातील ज्येष्ठ नागरिक महासंघातील १३० ज्येष्ठ नागरिक संघापैकी गेली २३ वर्षे कार्यरत असलेल्या ६६५ महिला व पुरुष वृद्ध सभासदांनाबरोबर घेऊन उत्कृष्ट कार्यालयीन कामगिरी व वृद्धांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा शहरातील ज्येष्ठ नागरिक महासंघात नाव लौकिक आहे. या आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुक प्रक्रियेत खालील प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले. अध्यक्षपदी पदमाकर जांभळे आणि उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर, महिला उपाध्यक्षपदी शुभांगी देसाई, सचिवपदी प्रल्हाद गांगूर्डे, सहसचिव सुरेश विटकर खजिनदार मारूती महाजन, सहखजिनदार गंगाधर घाडगे यांची निवड झाली....
मा. आमदार आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

मा. आमदार आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पिंपरी चिंचवड : काळेवाडी रहाटणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा मा. आमदार अध्यक्ष ॲाफ इंडीया केमिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांच्या हस्ते पार पडला. त्यामुळे मा. आमदार जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे, केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्ट उपाध्यक्ष विवेक तापकीर, परविंदरसिंग बाध, स्वप्नील जंगम, आशिष परमार, तेजस साळवी, म्हाळप्पा दुधभाते, केतन थोरात, संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते....
काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत अनन्या, अग्रजा, दिया, भूमिकाने पटकावला प्रथम क्रमांक
पिंपरी चिंचवड

काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत अनन्या, अग्रजा, दिया, भूमिकाने पटकावला प्रथम क्रमांक

काळेवाडी : काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत वेगवेगळ्या चार वयोगटातील प्रथम क्रमांक अनन्या पाल, अग्रजा सदावर्ते, दिया सोमाणी व भूमिका क्षीरसागर यांनी पटकावला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा रविवारी बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा झाला. काळेवाडीतील हॅपी थॉटस बिल्डिंग येथे पार पडलेल्या या सोहळ्यात काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे सदस्य प्रदीप हाटे, सुरेश पाटील, प्रवीण अहिर, दिलीप भोई, वैभव घुगे, सोमनाथ पवार, खेमचंद तीलवानी, आशा इंगळे, शुभाष कांबळे, अशोक उत्तेकर, अनिल देसाई, सूनंदाताई काळे, अमित देशमुख, किशोर अहिर, बाबासाहेब जगताप, अमोल भोसले व संघटनेचे इतर सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबतच पिंपरी चिंचवड सिटिझन फोरमचे राजीव भावसार व तुषार शिंदे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत मुथी...
प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे चित्रकला स्पर्धा | ५२० विद्यार्थ्यांचा सहभाग
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे चित्रकला स्पर्धा | ५२० विद्यार्थ्यांचा सहभाग

काळेवाडी : ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५२० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. एकुण आठ ठिकाणी या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, बक्षीस वितरण सोहळा पुढील आठवड्यात होणार असल्याचे प्रवीण अहिर यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत कोरोनामुळे पसरलेला हाहाकारामुळे मानवी जीवनाची झालेली अवस्था व अश्यातच स्वत:ची सुरक्षा, वैयक्तिक स्वच्छता, लस शोधण्यात भारतीय संशोधकांनी मारलेली यशस्वी मजल, लसीकरणाचा चालू असलेला प्रवास आणि याचेच एक फलित म्हणजे शाळा सुरू करण्याबाबतचा झालेला निर्णय. या निर्णयाला अनुसरूनच विद्यार्थ्यांना कुठेतरी एक शाळेची व आपल्या सवंगड्याची व वर्गमित्रंची गाठभेट व्हावी व ती एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून व्हावी यासाठी काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोस...
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानासाठी काळेवाडीत शिवसैनिकांचे विशेष योगदान
पिंपरी चिंचवड

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानासाठी काळेवाडीत शिवसैनिकांचे विशेष योगदान

पिंपरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने संपूर्ण काळेवाडी भागांमध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे. दरम्यान, हे अभियान राबवत असताना सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची शरीर तापमान चाचणी व ऑक्सिजन पातळी चाचणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. काळेवाडी भागातील नागरिकांना या अभियानाचा जास्तीत जास्त व्हावा यासाठी काळेवाडीतील चिंचवड विधानसभा प्रमुख हरेशआबा नखाते, काळेवाडी शिवसेना विभाग प्रमुख गोरख पाटील, उपविभाग प्रमुख गणेश वायभट, रहाटणी विभाग प्रमुख प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, शाखाप्रमुख नरसिंग माने, उपविभाग संघटक रविकिरण घटकार, दत्ता गिरी, काळेवाडी विभाग संघटिका भाग्यश्री मस्के यांच्...
PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड

PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

रस्ते डांबरीकरणाच्या लेखी आश्वासनाचा अधिकाऱ्यांना पडला विसर काळेवाडी (लोकमराठी) : विविध विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन दखल घेत नाही. विशेष म्हणजे रस्ते डांबरीकरणाचे लेखी आश्वासन देऊनही प्रशासन गंभीर नसल्याने रस्ते दुरूस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी वाहिनी तसेच खासगी टेलिफोन कंपन्यांची केबल टाकण्यासाठी ज्योतीबानगर, राजवाडेनगर, कोकणेनगर परिसरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, त्यांची दुरूस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही रस्ते विविध कामांसाठी सतत खोदल्याने रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी पसरली आहे. त्यामुळे घसरून पडण्याचे अपघात नित्याचेच...