Tag: Kalewadi

वीज बिल थकल्याने काळेवाडीतील जामा मशीदीचा वीजपुरवठा बंद | महावितरणविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
पिंपरी चिंचवड

वीज बिल थकल्याने काळेवाडीतील जामा मशीदीचा वीजपुरवठा बंद | महावितरणविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पिंपरी : मागील दोन महिन्यांचे १८ हजार रूपये बिल थकल्याने महावितरणने काळेवाडी-कोकणे नगरमधील जामा मशीदीचा वीज पुरवठा बंद करून वीज मीटर काढून नेले. मस्जिद ही चॅरिटेबल ट्रस्ट असून भाविकांच्या वर्गणीतून मशीदीचा सर्व खर्च केला जातो. मात्र, धार्मिक स्थळ बंद असल्याने ट्रस्टचे उत्पन्न बंद आहे. परिणामी ट्रस्ट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परंतू या बाबीचा विचार न करता महावितरणने वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे नागरिकांडून निषेध व्यक्त केला जात असून सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे मागील सुमारे दीड वर्षांपासून काळेवाडीतील जमा मशीद बंद आहे. मशीद ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. भाविक येथे नमाज पठाणसाठी येतात व त्यावेळी ते जी दहा-वीस रुपये वर्गणी देतात. या वर्गणीतून मौलाना, सहायक मौलाना व मेंटेनन्स खर्च, ल...
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पिंपरी चिंचवड, सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

काळेवाडी : साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप व जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काळेवाडी-तापकीर नगरमधील साई मल्हार मेडिकल शेजारी, तापकीर चौक येथे शनिवारी (ता. ४ सप्टेंबर) सकाळी १० ते ४ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. करोनाच्या काळामध्ये नागरिकांना अनेक आरोग्य विषयक समस्या भेडसावत आहेत. नागरिक आरोग्य विषयक समस्याकडे दुर्लक्ष करतात, आजाराचे वेळीच निदान न झाल्याने पुढे गंभीर परिस्थिती उदभवू शकते, नागरिकांची ही अडचण ओळखून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या तपासण्या होणार ई.जी.सी., रक्तातील साखरेचे प्रमाण, हाडांची ठिसूळता, शरीरातील हिमोग्लोबिन...
रॉयल फाउंडेशनतर्फे काळेवाडीतील परिसराची साफसफाई
पिंपरी चिंचवड, सामाजिक

रॉयल फाउंडेशनतर्फे काळेवाडीतील परिसराची साफसफाई

काळेवाडी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने रॉयल फाउंडेशनच्या वतीने राजवाडे नगर व नढे नगर इंडियन कॉलनीतील परिसरात साफसफाई करण्यात आली. तसेच नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी रॉयरल फाउंडेशनचे आभार मानले. राजवाडे नगर भागातील आयप्पा मंदिर जवळ मोकळ्या जागेत व नढे नगर, इंडियन कॉलनीतील काही परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच अनेक नागरिक आजारी पडले असल्याच्या तक्रारीही रॉयल फाउंडेशनकडे आल्या होत्या. ही बाब लक्षात घेता, रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रवि रमेश नांगरे आणि त्यांच्या टिमने तातडीने परिसराची साफसफाई केली. रॉयल फाउंडेशनने काळेवाडीतील विविध सामाजिक समस्या सोडवण्याचा धडाका सुरू केला असून अनेक नागरिक समस्या घेऊन फाउंडेशनच्या कार्यालयात येतात. त्यांच्या समस्या सोड...
नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते व राज तापकीर यांच्या सहकार्याने डीपी रस्ता पूर्णत्वास
पिंपरी चिंचवड

नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते व राज तापकीर यांच्या सहकार्याने डीपी रस्ता पूर्णत्वास

रहाटणी : नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते व भाजप युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांच्या सहकार्याने मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित तापकीर मळा चौक ते गोडांबे कॉर्नर चौक १२ मीटर डीपी रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकारक होण्यास मोलाची मदत झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून वंचित असलेला या डीपी रस्त्याची नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते व भायुमोचे राज तापकीर यांनी प्राधान्याने निविदा प्रक्रिया करून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करत प्रशस्त असा रस्ता तयार केला आहे. या रस्त्यामध्ये फुटपाथ तयार करण्यात आला असून पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी, ड्रेनेज लाईन तसेच पिण्याची लाईन टाकण्यात आली आहे. तसेच आकर्षक असे पथदिवेही संपुर्ण रस्त्यावर लावण्यात आले आहेत. स...
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत समाजोपयोगी उपक्रम
पिंपरी चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत समाजोपयोगी उपक्रम

काळेवाडी, ता. २६ : ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजन करण्यात आले. त्यामधील आधार कार्ड दुरूस्ती, मतदान स्मार्ट करणे, आधार कार्ड स्मार्ट करणे आदी सेवांचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. तसेच ज्येष्ठ नागरिक मोफत वाचनालयाचे उद्घाटन, अन्नदान व १८ मिटर डीपी रस्त्यावर यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नगरसेवक कैलास बारणे, स्वीकृत सदस्य देविदास पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुखदेव खेडकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष धर्मा पवार, माजी मंडल अध्यक्ष प्रकाश पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वीर, दत्तात्रेय काटे मामा, ज्योतिबा कामगार मित्र मंडळाचे संस्थापक मधुकर पंधेरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव सुरेश विटकर, सामा...
डासांचा त्रास वाढल्याने काळेवाडीत औषध फवारणीची मागणी
पिंपरी चिंचवड

डासांचा त्रास वाढल्याने काळेवाडीत औषध फवारणीची मागणी

काळेवाडी : विजयनगर, पवनानगर व आदर्शनगर परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मलेरिया व डेंग्यू सारखे आजार पसरण्याची भीती भेडसावत आहे. त्यामुळे तातडीने औषध फवारणी करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विजय नगर भागातील वैभव कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, मोरया कॉलनी, क्रांती चौक, ओमकार कॉलनी, शांती कॉलनी, सहारा कॉलनी, समर्थ कॉलनी, किनारा कॉलनी पवना नगर, आदर्श नगर आदी परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे व मलेरिया, तसेच डेंग्यू आजाराचीही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे औषध फवारणीची आवश्यकता गरजेची झाली आहे. दरम्यान, या भागाचे कायमस्वरूपी रहिवासी नियमीत शासकीय व नीम शासकीय कर भरतात, तसेच मतदानाचा हक्क देखील बजावतात. मात्र, महापालिकेच्या वती...
काळेवाडीतील रस्ते होणार अर्बन स्ट्रीटप्रमाणे अत्याधुनिक
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील रस्ते होणार अर्बन स्ट्रीटप्रमाणे अत्याधुनिक

लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : प्रभाग क्रमांक २७ मधील काळेवाडी फाटा ते तापकीर चौक, तापकीर नगर या ठिकाणी बीआरटीएस विभागामार्फत काळेवाडी फाटा ते एम एम शाळेपर्यंतचा मार्ग अर्बन स्ट्रीट डिझाईनप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने विकसित होणार आहे. या कामाचा भूमीपूजन समारंभ कार्यक्रम तापकीर चौक येथे महापौर उषा माई ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, नगरसेविका सुनिता हेमंत तापकीर, निर्मला कुटे, नीता पाडाळे, सविता खुळे, नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते, कैलास बारणे, बाबा त्रिभुवन, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. या कामाचा सातत्याने पाठपुरावा नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते व चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर यांनी केला. या कामांमध्य...
काळेवाडीतील बंद पथदिवे रॉयल फाउंडेशनने केले सुरू
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील बंद पथदिवे रॉयल फाउंडेशनने केले सुरू

लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : परिसरातील अनेक पथदिवे मागील बऱ्याच दिवसांपासुन बंद होते. रॉयल फाउंडेशनने असे २५ पथदिवे महापालिका विद्युत विभागाच्या मार्फत सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रॉयल फाउंडेशनचे आभार मानले आहेत. ज्योतिबानगर व राजवाडेनगर भागातील अनेक पथदिवे बंद होते. तर काही लुकलुकत होते. त्यामुळे रस्त्यांवर अंधार पसरत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.याबाबत रॉयल फाउंडेशनकडे पुष्कळ तक्रारी आल्या होत्या. ही बाब लक्षात घेता, रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे यांनी परिसरातील पथदिव्यांची पहाणी केली. त्यामध्ये सुमारे २५ पथदिवे बंद आढळून आले. याबाबत साधारणपणे दहा दिवस पाठपुरावा केल्यानंतर विद्युत विभागाच्या सहाय्याने पाच दिवे दुरूस्त तर बाकी बदलण्यात आले. त्यामुळे रस्ते उजळले आहेत. रॉयल फाउंडेशनचे अध्यक्ष रवि नांगरे म्ह...
काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात ध्वजारोहण

काळेवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त काळेवाडी येथील श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी देशभक्तीपर गाण्यांनी परिसर दणाणून गेला होता. त्याप्रसंगी भागवत बाबा, बलबहादुर दमाई, अंबूकला दमाई, पुरन दमाई, लल्लू बोराटे, भोलेराधेश्याम, धनेश्वर, अशोक झा, रिंकू झा, नीरा बिरादर, मुस्कान, विजय यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ...
दुःखद बातमी : उद्योजक सुरेश शिंदे यांचे निधन
पिंपरी चिंचवड

दुःखद बातमी : उद्योजक सुरेश शिंदे यांचे निधन

पिंपरी चिंचवड : उद्योजक सुरेश सखाराम शिंदे (वय ६१, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांचे रविवारी (ता. ८) दुपारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यानं नातेवाईक व मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे. काळेवाडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. वडगाव गुप्ता (ता. व जि. अहमदनगर) या मुळगावी रविवारी रात्री त्यांच्यावर मोठ्या दुख:मय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले दोन, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे व इंजिनिअर सचिन शिंदे यांचे ते वडील होत. ते कायमच पुरोगामी व स्पष्टवक्तेपणा विचाराचे पुरस्कर्ते होते. भोसरी एमआयडीसीतील कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत १९९२ साली त्यांनी आर. एस. इंडस्ट्रीज या कंपनीची स्थाप...