Tag: Marathi News

PUNE : सामाजिक ऐकोपा बिघडवणाऱ्यापासून वारकऱ्यांनी समाजाला सावध करावे – शरद पवार
पुणे

PUNE : सामाजिक ऐकोपा बिघडवणाऱ्यापासून वारकऱ्यांनी समाजाला सावध करावे – शरद पवार

पुणे (लोकमराठी न्यूज) : सध्या काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे लोक सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रीय प्रतिकं, महामानव यांच्या विषयी अपशब्द वापरून समाजात असंतोष निर्माण करीत आहेत. अशा प्रवृत्तीपासून समाजाला सावध करण्याचे काम वारकऱ्यांनी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. भागवत वारकरी महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना सोबत घेऊन रतेचे राज्य निर्माण केले. संतांनी जातीय-धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचेच नाव घेऊन समाजात असंतोष पसरविण्याचे कारस्थानकाही लोक करीत आहेत,असा टोला संभाजी भिडेचे नाव न घेता त्यांनी लगावला. या कारस्थानापासून समाजाला सावध करण्याचे काम वारकऱ्यांनी करावे. असे आवाहन प...
Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पुण्यात गौरव
राष्ट्रीय

Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पुण्यात गौरव

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ नं मंगळवारी पुण्यात (Pune) सन्मानित करण्यात आलं. दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. (PM Modi awarded by Lokmanya Tilak National Award 2023) सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते. असे पुरस्काराचं स्वरुप लोकमान्य टिळकांची ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि दैनिक केसरीचा पहिला अंक आणि प्रतिमा आणि १ लाख रुपये ...
साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली – कवी. विनोद अष्टुळ
पुणे

साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली – कवी. विनोद अष्टुळ

निगडी प्राधिकरण, (बाबू डिसोजा कुमठेकर) : साहित्य सम्राट पुणे व मातंग विकास संस्था खडकी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ तीन दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मातंग विकास संस्थेचे संस्थापक राजेश रासगे, समाजभूषण पुरस्कारथी शंकरभाऊ तडाखे, अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे, गणेश भालेराव, लहुजी महासंघाचे प्रकाश वैराळ, लहुजी पॅन्थर संघटनेचे महेश सकट, सुनील मोरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलसचिव माननीय डॉ. मुंजाजी रासवे यांनी आंदोलनस्थळी शुद्धीपत्र मिळणे बाबत या विषयास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए. मराठी अभ्यासक्रमातील ग्रामीण साहित्य आणि शोध या ग्रंथातील अण्णा भाऊ साठे यांच्या “फकीरा” या काद...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन 
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

निगडी, ता. ०१ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सजी वर्की, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, प्रदेश सचिव गौरव चौधरी, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विक्रांत सानप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते. समाजसुधारक, समाजप्रबोधनकार अशा विविध पैलूंपैकी जागतिक ख्यातीचे लेखक म्हणून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ओळख आहे. भारतीय भाषेसह जगातील अनेक भाषांमधे त्यांच्या पुस्तकांची भाषांतर झाले आहे. त्यांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास हजारो अनुय...
PIMPRI CHINCHWAD : शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार!
राजकारण

PIMPRI CHINCHWAD : शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार!

भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा नियोजनात पुढाकार ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातील 3 हजार नागरिकांची उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो टप्पा दोन, 'वेस्ट टू एनर्जी’, आणि आवास योजनेच्या लोकार्पण व भूमिपूजन पिंपरी, 31 जुलै : राज्यातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प , सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ हजार घरांची निर्मिती होत आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातून 3 हजार नागरिक तसेच लाभार्थी हजेरी लावणार आहेत. अशी माहिती भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. प...
CHAKAN : चाकण एमआयडीसीची वाटचाल फॉक्सकॉन-वेदांताच्या दिशेने
पुणे

CHAKAN : चाकण एमआयडीसीची वाटचाल फॉक्सकॉन-वेदांताच्या दिशेने

केंद्र आणि राज्य शासनाकडून होतात केवळ विकासाच्या गप्पा विकास आराखड्याची ब्ल्यू प्रिंट निघालीच नाही चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांचा घणाघात चाकण (दि. ३१) : भारत सरकारला जीएसटीच्या रूपाने सर्वात जास्त महसूल मिळवून देणारी एकमेव एमआयडीसी म्हणजे चाकण. शेजारीच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून बिरूद मिरविणारी कॉस्मोपॉलिटिन सिटी म्हणजेच पिंपरी चिंचवड शहर आहे. याच शहरातील बहुसंख्य कमाईदार वर्ग इथेच गलेलठ्ठ पगारावर कार्यरत आहे. म्हणजेच चाकण एमआयडीसीच्या जोरावरच आज सर्वत्र मोठे अर्थकारण होत आहे. त्यामुळे येथील सुविधा देखील 'फाइव्ह स्टार' दर्जाच्या असायला हव्यात. परंतु, येथे विकासाची 'ब्ल्यू प्रिंट' निघालीच नाही. त्यामुळे आजमितीला दुर्दैवाने चाकण MIDC परिसर हा पायाभूत सुविधांच्या बाबतीत अत्यंत मागासलेला भाग आहे, अशी खंत Chakan MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्...
आराध्य संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत मंथन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
शैक्षणिक

आराध्य संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत मंथन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

लोकमराठी न्यूज : गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम दिनांक २९ जुलै २०२३ रोजी ग. दी. माळगुळकर सभागृह येथे यशस्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित देओरे सर, प्रसिद्ध तबला वादक डॉ. अतुल कांबळे व भाग्यश्री पेंधे कांबळे, गजानन अंतुरकर यांच्या उपसथिती मध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील मुलांनी गुरूंचे गुरुपुजन केले. भारतीय शास्त्रीय संगीत संगीतातील प्रचलित राग व त्यावर आधारित गाणी अशी संकल्पना असलेल्या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे स्नेहछाया परिवारतील मुलांनी देखील सुंदर अशी प्रार्थना सादर केली. नंतर गुरुगायन झाले. मंगेश दंडारे व कल्याणी मंगेश दंडारे यांनी गझल व अभंग सादर केले, भैरवी ने कार्यक्रमाचा शेवट झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते, तसेच मुलांचे आजी आजोबा नातलग मित्र परिवार यांनी ह...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती 
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती

पुरोगामी विचाराने समृद्ध युवकांची नव्याने नेमणूक करणार - इम्रान शेख कष्टकरी कामगार वंचित दुर्लक्षित घटक यांच्या मुलांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार पिंपरी, ता. २९ जुलै (लोकमराठी न्यूज) : " शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे. म्हणुन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विद्यमान शहर कार्यकारणी आम्ही बरखास्त करत आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या वरील पदांवरील पदाधिकाऱ्यांना अधिवेशन काळ संपल्यानंतर प्रांताध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोलजी कोल्हे, आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवकची नवीन कार्यकारणी स्थापन करून लवकरच नवीन जबाबदाऱ्या देण्या...
निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
पिंपरी चिंचवड

निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी पिंपरी: निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंत असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण हे एका महिन्यापूर्वीच करण्यात आले होते.सदर डांबरीकरण केलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणी जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंतच्या रस्त्याचे एका महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. परंतू पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. त्यातच या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.खडीवर पु...
बेंगलोरमधील भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचा सहभाग
राजकारण

बेंगलोरमधील भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचा सहभाग

भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनजागृती करण्याचा केला निर्धार लोकमराठी न्यूज : बेंगलोर येथे भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ' बेहतर भारत कि बुनियाद ' या तीन दिवसीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसने आपला सहभाग नोंदविला. या अधिवेशनात भारतातल्या सुमारे ३००० युवकांनी भाग घेतला. भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात सामान्य माणसात जनजागृती करणे, बेरोजगार आणि महागाई विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणे आणि भाजपच्या खोट्या प्रचाराविरोधात लढा देणे या त्रिसूत्रीवर भर देण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. मणिपूर येथील झालेल्या घटनांचा अधिवेशनात तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला असून भारतीय युवक काँग्रेस शोषित, पीडित महिलांच्या मागे ठाम पाने उभे असल्याची ग्वाही या अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आली. भारत जोडो यात्रा हि आयडिया ऑफ इंडियाच्या रक्षणासाठी काढण्यात आलेली अ...