पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे शिवरायांना अभिवादन
पिंपरी, दि. १९ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, जिफिन जॉन्सन व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले की, छत्रपती शिवराय हे एक असे जागतिक विद्यापीठ आहे, की येथे महाराजांना फॉलो करणारे लोक केव्...