Tag: Marathi News

पिंपळे सौदागरमधील लिनियर गार्डन बनले दारूड्यांचा अड्डा
पिंपरी चिंचवड, ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागरमधील लिनियर गार्डन बनले दारूड्यांचा अड्डा

पिंपरी : पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील महानगरपालिकेचे प्रसिद्ध लिनियर गार्डन (Linear Garden) दारूड्यांचा अड्डा बनले असून दिवसाढवळ्या तळीराम येथे पार्टी करताना दिसतात. त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याने पोलीस प्रशासनाने या दारूड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वतीने हे प्रशस्त व सुंदर गार्डन विकासीत करण्यात आले आहे. या गार्डनमध्ये महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक येतात. मात्र, दारूड्यांचा येथे वावर वाढला असून दिवसाढवळ्या ते गार्डनमध्ये दारू पिताना दिसतात. दरम्यान, अशा प्रकारचे किळसवाणी दृश्ये पाहून गार्डन मध्ये येणाऱ्या मुलांच्या बाल मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे कायद्याने गुन्हा असून पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी परिसरातील नागरिकांची...
कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांच्या ‘रेखाचित्रे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
साहित्य

कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांच्या ‘रेखाचित्रे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पिंपरी : कवी अनिल यांच्या म्हणण्यानुसार सध्या काव्याच्या प्रांतात भिन्न मतांतरांमुळे गोंधळ आहे. नव समीक्षकांचा 'वाटते पंथ' उदयास आला आहे. मात्र नवकवींनी अशा टिकाकारांकडे लक्ष न देता कविता लिहिल्या पाहिजेत. कारण ज्याच्यापाशी हृदय आहे, तोच माणूस कविता लिहू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, कवी, गझलकार प्रदीप निफाडकर यांनी केले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे प्रा. सौ. रेखा पिटके- आठवले यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभ आणि 'काव्यरेखा' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले, यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर मीडिया कन्सल्टंट गिरीश केमकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. कवी असणं हे सौभाग्याचं लक्षण असतं, असे सांगून निफाडकर पुढे म्हणाले की पाश्चात्य कवी जेराल्ड हॉपकि...
बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा घेण्याचा उद्योग पिंपरी चिंचवडमध्ये सुरू
पिंपरी चिंचवड

बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा घेण्याचा उद्योग पिंपरी चिंचवडमध्ये सुरू

मुख्यमंत्री कार्यालयाने तक्रारदाराच्या पत्राची घेतली दखल पिंपरी : स्मार्ट सिटी, आयटी सिटी, मेट्रो सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहर (Pimpri Chinchwad) नावारूपाला येत आहे. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले असून जमिनीचे खरेदी, विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत. यामध्ये काही लोकांचा बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेण्याचे प्रमाण पिंपरी चिंचवड मध्ये वाढत आहेत. असाच एक प्रकार ताथवडे येथील (सर्वे नंबर १६१ चा ४ आणि ५ क्षेत्र ७० आर) आसवानी असोसिएट्सचे भागीदार श्रीचंद आसवानी (Shrichand Asawani) यांच्या बाबत वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत होत असल्याची माहिती श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना श्रीचंद आसवानी यांनी सांगितले की, आसवानी असोसिएटच्या नावे ताथवडे येथील सर्वे नंबर १६१ मधील ४ आणि ५ मधील जागा ओव्हाळ कुटुंबीयांकडून आम्ही २८/२/२००८ रोजी दस्त नोंदणी क्रमांक १०१२/२/२००८ च्य...
AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता
महाराष्ट्र, मोठी बातमी

AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता

संग्रहित छायाचित्र अहमदनगर : कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक, मुळेवाडी, कोंभळी गावात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध धंद्यांचा पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापर्यंत हप्ता पोहचत असल्याचे सांगितले जात आहे. गावातच हात भट्टी, देशी विदेशी दारू उघडपणे मिळत असल्याने तरूण पिढी त्याकडे आकर्षित होत आहे. तर कौटुंबिक वाद, हिंसाचार वाढला असून बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सामाजिक शांतता भंग पावत आहे. अहमदनगर पोलीस आणि हप्ता वसूली नवीन नाही. या आधी अहमदनगर पोलीसांची हप्ते वसूली चव्हाट्यावर आली होती. अवैध दारू विक्री होणारी (Chande Bk, Mulaywadi, Kombhali) ही गावे कर्जत पोलीसांच्या ...
महेश प्रोफेशनल फोरम पिंपरी-चिंचवड तर्फे आयोजित ‘SAMVID – 2022’ सत्र उत्साहात
पिंपरी चिंचवड

महेश प्रोफेशनल फोरम पिंपरी-चिंचवड तर्फे आयोजित ‘SAMVID – 2022’ सत्र उत्साहात

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरम या पिंपरी-चिंचवड येथे कार्यरत सामाजिक संस्थेद्वारे नुकतेच "SAMVID - 2022" या माहितीपूर्ण सत्राचे आयोजन ऑटोक्लस्टर चिंचवड येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला १५० हून अधिक श्रोत्यांची उपस्थिती होती आणि तिनही प्रमुख वक्त्यांनी उपस्थितांना अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला MPF झोन तीनचे SAMVID झोनल गव्हर्नर श्यामसुंदर भुतडा, SAMVID अतिरिक्त गव्हर्नर सीए विमल करणानी, एमएफसीटीच्या अध्यक्षा- नियुक्त श्रुती करणानी, संस्थेचे अध्यक्ष प्रसन्न राठी, SAMVID संचालक संपत सोमाणी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. SAMVID 2022 मध्ये IOT आणि शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील संधीवर तीन सत्रात चर्चा करण्यात आली. पहिले सत्र शेखर मालाणी यांनी भविष्यातील आयटी तंत्रज्ञानावर दिले. दुसरे सत्र दिनेश भुतडा यांचे अपारंपरिक शिक्षण क्षेत्रावर होते. तिसरे सत्र नितीन बनाईत यांनी...
खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित
पुणे, राजकारण

खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित

पुणे : आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन रविवारी (ता. ३१ जुलै) बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होत आहे. या अधिवेशनाला आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे 'आप' युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खा. संजय सिंग यांच्याबरोबरच दिल्ली विधानसभेचे सर्वात तरुण आमदार कुलदीप कुमार व गोव्याचे आमदार वेंझी वेगस यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे. या अधिवेशनामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांचा सहभाग या काही प्रमुख विषयांवर चर्चा होणार असल्याचे युवा आघाडी उपाध्यक्ष व अधिवेशनाचे समन्वयक संदीप सोनवणे यांनी सांगितले. खा. संजय सिंग यांचे आगमन सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन होणार असून ते 11:15 वाजता बिबवेवाडी येथी...
अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचा रहाटणीत सन्मान
क्रीडा

अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचा रहाटणीत सन्मान

रहाटणी : अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार (Kaka Pawar) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल रहाटणीतील सरपंच फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी हर्षद सदगीर (महाराष्ट्र केसरी), कृष्णा तांबे (मा. चॅम्पीयन्स), युवा कार्यकर्ते देविदास आप्पा तांबे, अभिषेक झगडे, गणेश कापसे, सागर नखाते, साहिल तांबे, निरज भोसले, अंकुश थोरवे, तेजस नखाते उपस्थित होते....
एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून फिरणारा बाबा कांबळे आहेत तरी कोण?
पिंपरी चिंचवड, राजकारण

एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून फिरणारा बाबा कांबळे आहेत तरी कोण?

https://youtu.be/_JpU4RHrFnc रिक्षा सोबत असलेल्या फोटो संदर्भात अजित पवार यांचा बाबा कांबळे यांना फोन पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षा सोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, तो फोटो मुख्यमंत्री शिंदे यांचा नसून पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांना फोन करून 'बाबा तो फोटो तुझाच आहे का?' अशी विचारणा करत व्हायरल फोटो मागील सत्य जाणून घेतले. रिक्षा चालक-मालक, घरेलू कामगार महिला, पथारी, हातगाडी, टपरीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करणारे नेतृत्व बाबा कांबळे यांचे आहे. उपोषण, मोर्चे, धरणे आंदोलन करत महापालिका प्रशासन, राज्य शासनाला धारेवर धरून अनेकांना...
काळेवाडीत मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड, सामाजिक

काळेवाडीत मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी घेतला लाभ

पिंपरी : काळेवाडी (Kalewadi) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी लाभ घेतला. त्यामध्ये चार मोती बिंदूचे रूग्ण सापडले असून त्यांची लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच यावेळी चष्मेही वाटप करण्यात आले. अशी माहिती शिबिराचे संयोजक शेख इरफान अब्दुल रहीम यांनी दिली. डॉ. निलेश चाकणे (Dr Nilesh Chakane), डॉ. पुनित सिंग (Dr. Punit K Singh), रजिया पठाण यांनी नागरिकांची तपासणी केली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, हज्रात पटेल, शकील शेख, साजिद शेख, हाजीमलंग शेख, सामाजिक कार्यकर्ते सुनील तात्या पालकर, श्रीकांत पारखी, शरद राणे, रवी राहते, राजू राहते, अनिल कदम, सुधाकर नलावडे, आशिफ शेख, इकबाल पठाण, अहमद मोमीन, चंद्रजिरी, राजीव पिल्लई, दीपक चव्हाण, मदन पुरोहित, अनिल हातणकर, प्रकाश ताम्हणकर आदी उपस्थित होते. याबाबत इरफान शेख म्हणाले की, एकूण १०१ लोकांनी सहभाग...
हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन
महाराष्ट्र, राजकारण

हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

मुंबई, ता २३ : हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वासही श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, सह प्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभान पवैय्या, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने...