शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : "तळागाळातले लोक शिकून मोठे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. परंतु त्यांनी आता जातीपातीतच अडकून न पडता त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक माणूस म्हणून समाजावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला पाहिजे", अशा आशयाचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांनी केले.
ते काळेवाडी येथील राजवाडा लॉन्स येथे आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील हे होते.
व्हिडिओ पहा https://fb.watch/7mihnlWzG-/
मातंग साहित्य परिषद, महाराष्ट्र ह्या संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी ह्या दोहोंच्या निमित्ताने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. ह्या प्रसंगी पिंपरी येथे संपन्न झालेल्या ८९ व...