विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी
https://youtu.be/KP68TgMma6w
पे अँड पार्किंग विरोधातील आंदोलनाला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचा पाठिंबा
पिंपरी चिंचवड: शहरामध्ये शिस्तीच्या नावाखाली जनतेचा विरोध जुगारून केवळ महसूल गोळा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी " पे अँड पार्किंग " धोरण लागू केले. याविरोधात अपना वतन संघटनेने सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे . तसेच सर्वसामान्य जनतेच्या भावना राजकीय पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधीं समोर मांडण्याचा व पे अँड पार्किंग धोरण चुकीचे आहे हे सांगण्याकरता त्यांच्या स्थानिक कार्यालयावर आंदोलने सुरु केली आहेत.
याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. ३१ जुलै) विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयावर पे अँड पार्किंग च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात करण्या...