दिघीत माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक करत जीवे मारण्याची धमकी | पाच जणांवर गुन्हा दाखल
https://youtu.be/OVCyb3jevIc
पिंपरी चिंचवड : बांधकाम सुरू असताना घरावर विटा व सिमेंट काँक्रिट जोरात पडून चिनी मातीची कौले फुटली. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मुलाने शेजारच्या व्यक्तींकडे वरती प्लॅस्टिकचा कागद टाकून द्या, पाऊस येतोय, तुमचे काम झालेवर कौले बदलून द्या. असे सांगितल्याचा राग आल्याने शिवीगाळ करत दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही शुक्रवारी (ता. ३०) दिघीत घडली.
संतोष बबनराव वाळके असे माहिती अधिकार कार्यकर्ता व मुक्त पत्रकाराचे नाव असून त्यांचा मुलगा शुभम याने पोलिसांत फिर्याद दिली.
विष्वाकांत उर्फ गंगाधर कोंडीबा वाळके, ऋत्विक विश्र्वकांत वाळके, निलेश सुरेश वाळके, भरत चंद्रकांत वाळके, व एक महिला अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० नुसार ...