जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद | ॲड अविनाश चिकटे यांची महत्त्वपूर्ण माहिती
भविष्यात अडचणी येऊ नये म्हणून जमीन खरेदी करते वेळी घ्यावयाची काळजी..
अ. पहिला टप्पा - जमीन खरेदी पूर्वी तपासण्याच्या महत्त्वाच्या बाबी—
१. जमिनीचा चालू ७/१२ काढून त्यावर मालकांचे नावे तपसावीत.
२. सदर जमीन विक्री करणार्याच्या नावावर कशी झाली आहे यासाठी किमान ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार नोंदी तपासाव्यात.
३. जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का?
४. जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये बँक,सोसायटी किंवा इतर वित्त संस्थेचा भर आहे का?
५. जमीन हि प्रत्येक्ष मालकाच्याच वहिवाटीत आहे का?
६. जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्येक्ष ताब्यात असलेले क्षेत्र यात तफावत आहे का?
७. सातबारा उतारावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात आलेली विहीर, झाडे इ.बाबत प्रत्येक्ष पाहणी करून खात्री करावी.
८. जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये कुल अथवा अन्य व्यक्तीचे हक्क आहे का?
९. जमिनीच्या व्यवह...










