Tag: Marathi News

महेंद्रा ओक्सीटॉप कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल
क्राईम

महेंद्रा ओक्सीटॉप कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

चाकण, ता. 9 : वाकी खुर्द येथील महेंद्रा ओक्सीटॉप कंपनीच्या मालकावर फसवणूक व भारतीय ट्रेड मार्क अधिनियमानुसार चाकण (Chakan) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. महेंद्र गोरे (पत्ता. गेट नं 124, जाधव वस्ती, पुणे नाशिक हायवे, वाकी खुर्द, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या महेंद्रा इंटरप्रायजेस ही कंपनी महेंद्रा ओक्सीटॉपचे लेबल लावून उत्पादित करत असलेल्या बाटलीवर फिर्यादी यांची माणिकचंद ऑक्सीरिज सारखे लेबल (अक्षरांची साईज फॉन्ट व अक्षरांची ठेवन कलर) त्याचे मिनरल वॉटर बाटलीवर भारतीय ट्रेड मार्क विभागाची कुठलीही परवानगी न घेता लेबल टिकटवत असे. या बाटलीची बाजारात विक्री करून ग्राहकांची फसवणूक करत आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक डेरे करत आहेत....
जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी
पुणे

जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

पुणे, दि ७ (लोकमराठी) - जुन्नर परिसरात दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर गेल्याचा फायदा घेवुन घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करत ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आकाश प्रकाश विभुते (वय ३२ वर्षे, सुपली, पो. पळशी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, सध्या रा. फुलसुंदर अपार्टमेंट, आनंदवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे या सरईत गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्हात वाढत्या घरफोडयाचे प्रमाण लक्षात घेवुन पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना घरफोड्यांबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे ...
BIOGAS SCHEME : बायोगॅस संयंत्रासाठी शासन देते ऐवढे अनुदान ; येथे करा अर्ज
विशेष लेख

BIOGAS SCHEME : बायोगॅस संयंत्रासाठी शासन देते ऐवढे अनुदान ; येथे करा अर्ज

संग्रहित छायाचित्र केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया ( MNRE) मार्फत राबविली जाते. 100 % केंद्र पुरस्कृत योजना उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी संबंधीतयंत्रणेची लाभार्थी यादी जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध उद्देश : ग्रामीण भागात बायोगॅस (Biogas) संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी बायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप अनुदान वितरण : सर्वसाधारण गटासाठी - रू. 9,000/- प्रति संयत्र अनुसूचित जाती व जमाती - रु. 11,000/- प्रति संयत्र शौचालय ...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त 
राजकारण, मोठी बातमी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला. आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झाला. हळहळू...
तुम्ही डोकं आपटून घ्याल, अशा पद्धतीने दिनेश कार्तिक धावबाद झाला
क्रीडा, ताज्या घडामोडी

तुम्ही डोकं आपटून घ्याल, अशा पद्धतीने दिनेश कार्तिक धावबाद झाला

दिनेश कार्तिक IPL 2023 मध्ये वाईट टप्प्यातून जात आहे. गेल्या मोसमात स्टार असलेल्या डीकेला यावेळी धावा करता आल्या नाहीत. शिवाय, तो यावर्षी विकेटकीपिंगमध्येही चुका करत आहे. आणि त्याची रनिंग बिटवीन द विकेट हा देखील यावेळी चर्चेचा विषय आहे. कार्तिक यावेळीही रनआउट झाल्यामुळे चर्चेत आला आहे. पण लखनौ विरुद्ध, सोमवार 1 मे रोजी त्यांचीही फसवणूक झाली. लखनौविरुद्ध बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि सुरुवातीला हा निर्णय योग्य वाटला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने पॉवरप्लेमध्ये कोणतेही नुकसान न करता बाहेर काढले. मात्र यादरम्यान त्याचा वेग खूपच कमी होता. धावणे खूप हळू असावे.आणि त्यानंतर कोहलीची विकेट पडल्यानंतर सतत हादरे बसत होते. 18 वे षटक संपले तेव्हा परिस्थिती अशी होती की संघाने 6 गडी गमावून 115 धावा केल्या होत्या. वानिंदू हसरंगा आणि दिनेश कार्तिक क्रीजवर होते. शेव...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला पिंपळे सौदागरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला पिंपळे सौदागरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा शंभरावा भाग होता. त्यानिमित्त पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे (Kunda Bhise) यांच्या जनसंपर्क कार्यालयात लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. या कार्यक्रमाला रहिवाशांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. तसेच, भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं...
रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप
पुणे

रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप

पुणे, दि.२८ (लोकमराठी) - हातावर पोट असणाऱ्या अनेक महिलांना मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यातील अनेकींना घरगुती स्वरूपाचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. मात्र, भांडवलाअभावी अनेकांचे स्वप्न हे अपूर्णच राहते.नेमकी हीच गरज ओळखून रमजान ईद निमित्त शेर-ए-अली सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) गटाच्या वतिने गुरूवारी दि.२७ रोजी आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना शिलाई मशिनचे मोफत वाटप केले. व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्मा वाटप तसेच जेवनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वडगावशेरीतील शिवराज शाळेजवळ सोमनाथ नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपण आता स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, या जाणीवेने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि कृतज्ञतेचे हसू फुलले. गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्माचे वाटप महा.राज्य...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिलं होतं, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या पत्रावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. हे पत्र मीच काढलं होतं अशी कबुली देतानाच दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यामुळेच मी रिफायनरीचा प्राथमिक अहवाल मागवला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उद्धव ठाकरे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. मी बारसूचं पत्र दिलं होतं. मी पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? उद्धव ठाकरेंचं एवढं ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडलं? आरेचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? रोज उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादल...
विठाईच्या माध्यमातून वाचन संस्कृतिची जपणूक – कुंदाताई भिसे
पिंपरी चिंचवड

विठाईच्या माध्यमातून वाचन संस्कृतिची जपणूक – कुंदाताई भिसे

उन्नती सोशल फाउंडेशन संचलित विठाई मोफत वाचनालया च्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला पिंपरी, दि, 23 : माहिती व तंत्रज्ञानाच्या (डिजीटल) युगामध्ये पुस्तक वाचन संस्कृती लोप पावताना दिसत आहे. तिची जपणूक करण्यासाठी सर्वांनी पुस्तक वाचनाला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या भागातील वाचक प्रेमींना सहज पुस्तके उपलब्ध व्हावी म्हणून आपण विठाई वाचनालयाच्या माध्यमातून पुस्तक संच उपलब्ध केले. त्याचा शेकडो वाचकांना फायदा होत आहे, असा विश्‍वास उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी व्यक्त केला. पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील उन्नति सोशल फाऊंडेशनच्या विठाई वाचनालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. यावेळीे उन्नतिच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे (Kunda Bhise) यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. लेखिका सौ. अनिता भ...
पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण
पिंपरी चिंचवड

पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण

पिंपरी, दि.२२ (लोकमराठी) - एक महिन्याच्या उपवासानंतर आज ईद अल फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत सामुहिक नमाज अदा केली. मौलाना यांनी ईदची नमाज सर्वांना पढवली ईद निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समस्त समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्‍या. नमाज पठणासाठी शहरातील आबालवृद्ध आणि समाजबांधवांनी मैदान गर्दीने फुलून गेला होता. रिपब्लिक पार्टी अॉफ इंडीया (अ) वाहतुक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजीजभाई शेख म्हटले, ए.बी शेख साहेब यांनी नेहरुनगर कब्रस्थानाला योगदान देऊन. ए.बी शेख साहेब यांच्या हाताने कब्रस्थान उभारण्यात आले.आज ते आमच्या मधी नाहीत त्यांची आठवण म्हणून कब्रस्थानाला काहिच कमी पडू देणार नाही. असे आवाहन त्यांनी केले. ...