पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला पिंपळे सौदागरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा शंभरावा भाग होता. त्यानिमित्त पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे (Kunda Bhise) यांच्या जनसंपर्क कार्यालयात लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. या कार्यक्रमाला रहिवाशांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. तसेच, भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं...










