Tag: Marathi News

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने गौरव
पुणे

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने गौरव

पुणे, दि.१५ (लोकमराठी) - उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा विशेष पोलीस महानिरीक्षक(IG) कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांच्या वतीने गौरवण्यात आले. गेल्या वर्षभरामध्ये आंबेगाव तसेच जुन्नर तालुक्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.काबाड कष्ट करून सामान्य माणूस हप्ते भरून मोटारसायकल विकत घेत असतात त्यातच अश्या प्रकारे गाड्या चोरीला गेल्याने नागरिक त्रस्त होते. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम राबवून सदर भागामध्ये अश्या गुन्ह्यामध्ये संशयित असलेल्या इसमांची धरपकड स्थानिक गुन्हे शाखे मार्फत करण्यात आली. अखेर मार्च महिन्यामध्ये तब्बल १०/१२ आरोपी पकडून त्यांच्याकडून सुमारे ५०...
अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख यांचा जनतेला स्टॅम्पपेपरवर जाहीरनामा 
राजकारण, पिंपरी चिंचवड

अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख यांचा जनतेला स्टॅम्पपेपरवर जाहीरनामा

चिंचवड, दि. २० फेब्रुवारी २०२३ : आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रबोधन, जनजागृती, आंदोलनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवले आहेत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असताना अनेक मर्यादा येत असल्याने राजकीय भूमिका घेऊन २०५ चिंचवड विधानसभा निवडणूक लढवत आहे. राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देतात. मात्र, या गोष्टींना फाटा देत मी जनतेसाठी जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर लिहून नोटराइज्ड करून जनतेसमोर सादर केला असून यामध्ये मतदार संघातील १२ मुद्दे मांडलेले आहेत. अशी माहिती अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख यांनी सोमवारी (दि. २०) थेरगाव येथे पत्रकार परिषदेत दिली. चिंचवड विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख निवडणूक लढवीत आहेत. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करू...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे शिवरायांना अभिवादन
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे शिवरायांना अभिवादन

पिंपरी, दि. १९ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, जिफिन जॉन्सन व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले की, छत्रपती शिवराय हे एक असे जागतिक विद्यापीठ आहे, की येथे महाराजांना फॉलो करणारे लोक केव्...
लोहगडावर महाशिवरात्र उत्साहात संपन्न
पुणे

लोहगडावर महाशिवरात्र उत्साहात संपन्न

लोणावळा, दि.१९ (लोकमराठी) - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या तसेच, तळेगाव दाभाडे येथील कार्यकर्त्यांच्या वतीने परंपरागत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोहगडावरील महादेव मंदिरात जि. प.सदस्या अलका धानिवले व गणेश धानिवले यांचे वतीने अभिषेक करण्यात आला. लोहगड गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी रांगोळ्या काढून महिलांच्या वतीने शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण करण्यात आले. सुंदर फुलांनी शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिववंदनेने शिवस्मारकावर अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते. शिवघोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमासाठी रायगड मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, प्रकाशराव मिठभाकरे,पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ...
नियोजनबद्ध, सहकारीवृर्त्ती मुर्तीची अनोखी भेट
विशेष लेख

नियोजनबद्ध, सहकारीवृर्त्ती मुर्तीची अनोखी भेट

प्रा. डॉ. किरण मोहिते २००० - ०१ साली स्वामी सदानंद भारती शिक्षण शास्त्र महाविद्यालय श्रीरामपूर येथे BEd ला ऍडमिशन घेतलंल. या महाविद्यालयाच्या वर्गमित्रांनी ६ नोव्हेंबर २०२२ राजी गेट टुगेदर घेण्याच ठरवलं. त्या दिवशी रविवार होता. तब्बल वीस वर्षांनंतर BEd कॉलेजची मित्र भेटणार, गुरुवर्य भेटणार, या उत्सुकतेपोटी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली. नियोजन केले. आठ दिवस अगोदर सरांना फोन केला. “ सर! तुम्हीं आमच्या घरी यायचं! आपण येथूनच दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीने श्रीरामपूरला जाऊ " सर म्हणाले. “ घरी चर्चा करतों अन् सांगतो.” सर आपल्या घरी येणार या आशेने घरी सर्व काही नियोजन केलं. दुसऱ्या दिवशी परत सरांना फोन केला. सरांनी लगेच होकार दिला. मला म्हणाले “ मोहिते मी तुझ्या घरी मुक्कामी येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण श्रीरामपूरला जाऊ ”. ते “मोहिते” या आडनावाने मला हाक माराय...
महाशिवरात्री निमित्ताने वडगाव मावळात भाऊ बहिण भेटीचा कार्यक्रम संपन्न
पुणे

महाशिवरात्री निमित्ताने वडगाव मावळात भाऊ बहिण भेटीचा कार्यक्रम संपन्न

वडगांव मावळ, दि.१८ (लोकमराठी) - मावळ महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने पहाटे पाच वाजता विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त तुकाराम ढोरे अरुण चव्हाण, किरण भिलारे,चंद्रशेखर सोपानराव म्हाळसकर यांचे हस्ते अभिषेक संपन्न झाला व नंतर सकाळी आठ वाजता रूढी -परंमपरेने चालत आलेला श्री पोटोबा महाराज व सांगवी येथील जाखमाता देवी या ठिकाणी पालखी सोहळा नेऊन भाऊ बहीण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले,नंतर तेथील पुजारी भक्त,कैलास खांदवे, शंकर पवार व देवस्थान चे विश्वस्त यांचे हस्ते श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांना इंद्रायणी स्नान करण्यात आले,नंतर देवस्थान चे वतीने जाखमाता देवीला साडी,ओटी,खन,नारळ यांचा मान देण्यात आला.सांगवी मधील भजनी मंडळ व काकडा आरती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व नंतर उपस्थित भाविकांला उपवासाच्या निमित्...
रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत बेल्हेकर यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड

रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत बेल्हेकर यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड (लोकमराठी) - रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली. असे नियुक्ती पत्र बेल्हेकर यांना रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजीजभाई शेख यांनी दिले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवने पक्षाला अभिप्रेत असणारी संघटना उभारली पाहिजे. वाहतूकदारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तत्परता दाखवून सक्रीय रहावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे....
युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
पिंपरी चिंचवड

युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

पिंपरी, दि. १७ : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त चिंचवड-बिजलीनगर येथील मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये वृद्धांना आवश्यक गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र दर्शन सिंग, राष्ट्रीय सचिव प्रदीप सिंधव, प्रदेश महासचिव अनिकेत नवले, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, सरचिटणीस विशाल कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, जिफिन जॉन्सन, मयुर रोकडे, मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुहास गोडसे व कार्यकर्ते उपस्थित होते. मातृसेवा सेनाभावी संस्था निराधार, वृद्ध महिलांचा स...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली 
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

पिंपरी, दि. १४ फेब्रुवारी २०२३ : जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याला आज ४ वर्षे झाली आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, सरचिटणीस विशाल कसबे, विनिता तिवारी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, जिफिन जॉन्सन व कार्यकर्ते उपस्थित होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यामध्ये ४० जवान शहीद झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या हल्ल्याला आता ४ वर्ष झाले आहेत. मा...
राहुरी महाविद्यालयाच्या गौरी सत्यजीत कराळे – तनपुरेंना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे सुवर्णपदक
पुणे

राहुरी महाविद्यालयाच्या गौरी सत्यजीत कराळे – तनपुरेंना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे सुवर्णपदक

राहुरी, दि.१३ (लोकमराठी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एम.ए पदव्युत्तर कला शाखेच्या परीक्षेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील गौरी सत्यजीत कराळे-तनपुरे हिस "श्रीमती नलिनी ठक्कर सुवर्णपदक"प्राप्त झाले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारेयांनी दिली. प्राचार्य डॉ. संभाजी पठारे म्हणाले,आपल्या महाविद्यालयातील गौरी हिचे यश हे सर्वांना दिशादर्शक असून यातून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व आपल्या महाविद्यालयाची यशाची परंपरा अशीच सुरु राहिल. हे मिळालेले सुवर्णपदक महाविद्यालय व संस्थेच्यादृष्टीने अत्यंत गौरवास्पद म्हणावे लागेल. महाविद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेत आपण अव्वल असल्याचे सिद्ध केले. सुवर्णपदकांची मालिका खंडित...