महाशिवरात्री निमित्ताने वडगाव मावळात भाऊ बहिण भेटीचा कार्यक्रम संपन्न
वडगांव मावळ, दि.१८ (लोकमराठी) - मावळ महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने पहाटे पाच वाजता विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त तुकाराम ढोरे अरुण चव्हाण, किरण भिलारे,चंद्रशेखर सोपानराव म्हाळसकर यांचे हस्ते अभिषेक संपन्न झाला व नंतर सकाळी आठ वाजता रूढी -परंमपरेने चालत आलेला श्री पोटोबा महाराज व सांगवी येथील जाखमाता देवी या ठिकाणी पालखी सोहळा नेऊन भाऊ बहीण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले,नंतर तेथील पुजारी भक्त,कैलास खांदवे, शंकर पवार व देवस्थान चे विश्वस्त यांचे हस्ते श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांना इंद्रायणी स्नान करण्यात आले,नंतर देवस्थान चे वतीने जाखमाता देवीला साडी,ओटी,खन,नारळ यांचा मान देण्यात आला.सांगवी मधील भजनी मंडळ व काकडा आरती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व नंतर उपस्थित भाविकांला उपवासाच्या निमित्...










