महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त रहाटणीत स्वच्छता मोहीम
रहाटणी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडीयम स्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्तसंयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महात्मा गांधी (Mahatma Gandhi) व लाल बहादूर शास्त्री (Lalbahadur Shastri) यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व आरोग्य निरिक्षक प्रणय चव्हाण, भुषण पाटील यांनी केले. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिम्मित स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन विद्यार्थ्यांना घरी किंवा घराचे परिसरात बंदी असलेले प्लास्टिक गोळा करून ते शाळेत जमा करण्याबावत आवाहन करण्यात आले .
तसेच शाळा परिसराची स्वच्छता करून शाळा ते शिवार चौक ते शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी स्वच्छता मोहिमेचे बॅनर व झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ पिंपरी चिंचवड सुंदर प...