कोविड काळात काम करणाऱ्या ६८७ कामगारांना कायम करा : यशवंत भोसले
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोविड काळामध्ये मानधनावर काम करणाऱ्या ६८७ कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, असे आदेश राज्य सरकारने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिले आहेत. अशी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
याविषयी अधिक माहिती देताना यशवंत भोसले यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोरोना काळामध्ये एएनएम, जीएनएम नर्सेस, टेक्निशियन अशा विविध पदांवर मानधनावर कर्मचारी काम करीत होते. या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे असा ठराव पिंपरी चिंचवड महापालिकेने १८ मार्च २०२० रोजी मंजूर केला होता. हा ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. यामध्ये आरोग्य व वैद्यकीय विभागातील विविध पदांचा समावेश होता. या ठरावास शासनाची मंजुरी मिळण्याच्या अगोदरच पिंपरी चिंचवड आयुक्तांनी २०२१ मध्ये नर्सेस व आरोग्यातील तांत्रिक कर्मचाऱ्य...