पिंपरी चिंचवड शहरात मुस्लिम समाजाने राजकीय अस्तित्व निर्माण करावे – अॅड. प्रकाश आंबेडकर
प्रस्थापितांची गुलामी करण्यापेक्षा, नेतृत्वाची क्षमता दाखवून द्या - सिद्दीक शेख
पिंपरी, ता. ७ : स्थानिक पातळीवर मुस्लिमांचे अनेक प्रश्न आहेत. मुस्लिम (Muslim) बांधवानी आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा पिंपरी चिंचवड शहरात मुस्लिम समाजाने स्वतःचेच राजकीय अस्तित्व निर्माण करावे. समाजातील न्यायासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या कर्तृत्वान मुस्लिम तरुणांना पुढे आणून त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी. अशा तरुणांच्या पाठीशी आम्ही आपली ताकद उभी करून परिवर्तन घडवू. असे प्रतिपादन राज्यघटनेचे अभ्यासक व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv Prakash Ambedkar) यांनी येथे केले.
पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शनिवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता मुस्लिम समाजाच्या स्थानिक प्रश्नांविषयी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्य...










