खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक
सावकार नानासाहेब गायकवाड विरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे आरोपींचा फिर्यादीलाच अडकवण्याचा डाव उघड
पुणे : औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल प्रकरणावर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी आणि खंडणी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे (वय 35, रा. ए/31 हजारे सदन, लुंकड हॉस्पिटलजवळ, दापोडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.
बेकायदेशीररित्या सावकारी पद्धतीने पैसे देवून अवास्तव पद्धतीने व्याज आकारणी करत तसेच खंडणी मागत ती न दिल्यास सामाजिक बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे स्वप्नील बालवडकर (रा. बालेवाडी) यांनी तक्रार केली होती. त्यानूसार वाळके आणि हजारे यांच्या विरोधात चतु:श्रृंगी पोलीस...










